MORDE CHOCOLATE फॉरेनचा ब्रँड नाही; हे चॉकलेट अस्सल मराठी आहे..

जगात दहापैकी नऊ लोकांना चॉकलेट आवडते. चॉकलेट हे जगातील सर्वात जास्त आवडत्या स्वीट ट्रीटपैकी एक पदार्थ आहे. जे चॉकलेट शौकीन असतात त्यांना चॉकलेटचे ब्रँड माहिती असतात. तुम्ही खात असलेला आईस्क्रीम कोन आणि त्याच्यावर असलेलं घट्ट चॉकलेटचं आवरण किंवा मोठमोठ्या हॉटेलांमध्ये स्वीट डिश मध्ये मिळणारं डार्क चॉकलेट हे सगळं महाराष्ट्रातून पुरवलं जातं.

आज तुम्ही कुठलाही चॉकलेटशी रिलेटेड असलेला पदार्थ खात असाल तर त्यात सगळ्यात मोठा वाटा हा मंचरच्या मोर्डे चॉकलेट कंपनीचा किंवा मोर्डे फूड्सचा आहे. आजवर तुम्ही जो चॉकलेटचा पदार्थ खाल्ला असेल तो मोर्डेचा फूड्सचा असतो. मोर्डे फूड्स हि आजच्या घडीला संपूर्ण भारताला चॉकलेट पुरवणारी एकमेव कंपनी आहे. 

हि कंपनी कशी सुरु झाली, कोणी सुरु केली याबद्दल आपण जाणून घेऊया. प्रचंड जिद्दीतून आणि प्रेरणादायी अशी हि यशोगाथा आहे. मोर्डे फूड्सने तयार केलेलं परिपूर्ण चॉकलेट हे त्यांच्या कष्टाचं प्रतीक आहे ज्याचा शेवट गोड आणि आनंद देऊन जाणारा आहे.

१९८३ मध्ये चंद्रकांत मोर्डे यांनी हा व्यवसाय थाटायचा विचार केला. फूड मॅनेजमेंटमध्ये चंद्रकांत मोर्डे यांनी पदवी मिळवली होती. पुणे जिल्ह्यातील मंचर या त्यांच्या मूळ गावी त्यांनी चॉकलेटचा एक छोटासा प्लांट उभा केला. या उदयॊगासाठी त्यांनी त्यावेळी ५ लाख रुपये भांडवल लावलं होतं. कोकोआ आणि कॅडब्यूरियस इंडिया या नामवंत ठिकाणी ते चॉकलेटचे विविध डेरीव्हेटीव्ह्ज तयार करायला शिकले होते.

कॅडबरीस इंडिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम मध्ये त्यांना प्रोफेसर म्हणून नोकरी लागली. तब्बल १० वर्षांहून अधिक काळ ते शिकत होते. पुढे पदवी पूर्ण झाल्यावर त्यांनी प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं आणि आपल्या व्यवसायाला सुरवात केली. त्याद्वारे त्यांनी बी २ बी चॉकलेट आणि कोकोआ यांची निर्मिती करून बाजारातील प्रतिष्ठित कंपन्यांना मागे टाकलं. त्यामुळे त्यांनी सुरु केलेल्या मोर्डे फूड्सचा पाया भक्कमपणे रचला गेला.

ज्यावेळी त्यांनी शिक्षण पूर्ण केलं तेव्हा त्यांच्या वडिलांनी हा बिझनेस सिरियसली घ्यायला सांगितलं. कारण त्यावेळी मार्केटमध्ये स्पर्धा करणारी केवळ एकच कंपनी होती ती होती साठे चॉकलेट. केरळ मधून कोकोआ आणून त्यापासून त्यांनी चॉकलेट निर्मिती सुरु केली. कोकोआची पावडर हि फक्त केरळात मिळते हे त्यांना कॅडबरीमध्ये कामाला असताना समजलं होतं. 

कंपनी सुरु केल्यानंतर त्यांनी सुरवातीची तीन वर्ष फक्त अनुभव घेतला. लोकांना चॉकलेटची चव कशी वाटते, किचनमध्ये चॉकलेट कधी वापरतात आणि कोणत्या कंपनीचं चॉकलेट वापरतात, मोठमोठ्या हॉटेलांमधल्या आचार्यांपर्यंत ते पोहचले. त्यांना इंपोर्टेड चॉकलेटचा पुरवठा केला. १९८६ मध्ये त्यांना दिल्लीमधली डिलरशिप मिळाली. आणि त्यांची चॉकलेटं जाणार होती मुंबईच्या ताज आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये.

हळूहळू ओळख वाढून कंपनीचं प्रोडक्शन दुप्पट झालं. भारतातल्या महागातल्या महाग हॉटलेमध्ये मोर्डे फूड्सचं चॉकलेट असतं. पार्ले, ब्रिटानिया, आयटीसी, ताज ग्रुप, मॅरियट, ओबेरॉय, अशा मोठमोठ्या ब्रॅंड्समध्ये वापरल्या चॉकलेटची जीवनदायिनी म्हणून मोर्डे फूड्स काम करते. मोर्डे फूड्स सांगतात कि आम्ही कधी विचारही केला नव्हता कि आमचं प्रोडक्ट इतकं लोकप्रिय होईल. 

अलीकडच्या काही वर्षांमध्ये दिसून आलं कि विविध प्रसंगी चॉकलेट वापरलं जातं, तसेच चॉक्लेटमुळे ताण कमी होतो आणि ते आरामदायी असतात. मोर्डे फुड्सचे संचालक हर्षद मोर्डे म्हणतात कि,

जागतिक स्तरावर चॉकलेटची सर्व्हिस देण्याचं कार्य  आम्ही गेली ३७ वर्षांपासून करत आहोत. अशा काळातही चॉकलेट हा जादूचा घटक आहे ज्याने प्रत्येक घरांमध्ये आनंद वाढवला आहे.

मोर्डे फूड्स अशा क्षेत्राशी संबंधित आहे जिथे चॉकलेट्सची गरज पडते मग ते डार्क चॉकलेट, चॉकलेट, फिलिंग्ज, क्रीम, कोकोआ, चॉकोपेस्ट आणि चॉकोडिप्स असो अशा सगळ्या व्हरायटी मोर्डे फूड्स उपलब्ध करून देतात.

मधल्या काळात व्होकल फॉर लोकल हा एक ट्रेंड सुरु झाला होता त्याच्याही आधी मोर्डे फूड्सने हा ट्रेंड थेट अंमलात आणला होता. मंचरमधील स्थानिक लोकांना मोर्डे फूड्सने रोजगार निर्माण करून दिला. जवजवळ मंचरमधील ९०% स्थानिकांना त्यांनी काम दिलं. विश्वास, जबाबदारी आणि गुणवत्ता यांचा परफेक्ट मेळ म्हणून मोर्डे फूड्सची ख्याती आहे.  

आज जे आपण चॉकलेट खातो त्यात एका मराठी माणसाचा मोठा वाटा आहे. मोर्डे फूड्स प्रचार प्रसार जास्त करताना दिसत नसली तरी ते प्रचंड लोकप्रिय आहेत.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.