तिने दाऊदला फ्रेन्डझोनमध्ये टाकलं होतं. 

तू जिस की खोज में आया है, वो जिस ने तुझ को बुलाया है

परबत के पीछे है झरने के नीचे है, आजा रे आजा रे अब आ भी जा

तू आ भी जा ओ ओ ओ ओ आ भी जा

कोहरी सी चादर लपेटे हूँ, पानी में खुद को समेटे हूँ

बाहों के घेरे में मन के बसेरे में, आजा रे आजा रे अब आ भी जा

तू आ भी जा ओ ओ ओ ओ आ भी जा

आह्हा वरती जे लिहलय ते वाचून तात्काळ युट्यूब उघडू वाटलं असेल. पण थांबा त्याहून अधिकच इथे आहे. ते वाचून निवांत “राम तेरी गंगा” मधलं ते गाण पाहू शकताय. तसही साहित्यिक भाषेत सांगायच तर लेखकानं अस लिहावं कि डोळ्यासमोर चित्र उभा राहिलं पाहीजे. इथ मात्र हे काम राजकपूरनं तडिस नेलं. राजकपूर हे गाणं अस काही शुट केल की आजही साठीत असणारे लोकं हर हर गंगे म्हणून शांतपणे डोळे मिटू शकतात. 

असो, तर राजकपूरला कित्येक वर्ष मिडीया विचारत राहिली की, ते अश्लिल गाणं कस करु वाटलं. हाच प्रश्न मंदाकिनीला देखील विचारायचे. हे गाणं कस काय शूट केलं. दोघेही विषय बदलायचे. पण राजकपूर एकदा म्हणाला. इटालियन फिल्ममध्ये असा शॉट असला तर तो कलात्मक आणि मी केला तर तो अश्लिल. ह्याला काय अर्थाय. मग लोकांनी राज कपूरला पण असले प्रश्न विचारणं बंद केलं. इतिहास पुढे गेला आणि भारतीय फिल्ममध्ये त्यातल्या त्यात क्रांन्तीकारी सीन येवू लागले. पण असा सीन अजूनही नाही. त्याच दिवशी निम्या भारताला कळालं होतं हे असही असू शकतं. हे निम्मे लोकं म्हणजे लग्न न झालेले कार्यकर्ते होते. 

तरिही पुन्हा एकदा असो,

आजचा मुळ विषय आहे ती मंदाकिनी आज काय करते. कुठे असते. संसार करुन कोणाबरोबर सेटल झाली? इत्यादी. 

मंदाकिनीच मुळ नाव यास्मिन जोसेफ. तिचे वडिल ब्रिटीश आणि आई मुस्लीम. मग मंदाकिनी झाली अॅंग्लोइंडियन. अॅग्लोइंडियन असल्याचा एकमेव फायदा झाला तो तिचे निळे डोळे. ती दिसायला सुंदर होतीच. राज कपूर तेव्हा असाच एक क्रांन्तीकारी सिनेमा घेवून यायच्या विचारात होता. त्या फिल्मसाठी त्यांनी डिंपल कपाडियाला फायनल केलेलं. पण ती स्टोरी होती एका शहरी बाबू आणि डोंगरदऱ्यात रमणाऱ्या मुलींची. डिंपलपेक्षा नवा चेहरा असेल तर लोकांना खऱ्या अर्थाने डोंगरात हरवलेली वाटेल म्हणून त्यांनी ऑडिशन घेतली. मंदाकिनीला फायनल केलं.आणि त्यांनीच सिनेमाच्या क्षेत्रात तिला नाव दिलं मंदाकिनी. 

सिनेमा रिलीज झाला आणि भारतातल्या ७८ टक्के खॉटच्या खाली फोटो असण्याचा बहुमान मंदाकिनीने पटकावला. मंदाकिनी लोकांच स्वप्न होतं. अशी मुलगी जी धबधब्याखाली बोलवतेय. शक्यच नव्हत पण भारी वाटणं या एका थिमवर आपलं सगळं चालू असतं. 

झालं मंदाकिनी हिट झाली. एका पार्टीत दाऊदला भेटली. गाठीभेटी वाढल्या. तेव्हा दाऊद हा फक्त डॉन होता. तो अजून दहशतवादी व्हायचा होता. अशातच एकदिवस दाऊदचे आणि तिचे मॅच बघताना फोटो बाहेर आले. सगळीकडे चर्चा सुरू झाली मंदाकिनीने दाऊदसोबत लग्न केलं. शेवटी अशा मुलींना एखादा डॉनच उचलून घेवून जावू शकतो त्यामुळे आपल्याइकडच्या लोकांना फस्ट्रेशन यायची तशी गरजच नव्हती.

ती डॉन बरोबर फिरत होती. डॉन तिला सिनेमे मिळवून देण्यासाठी हातभार लावत होता. एक दिवस डॉनने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून खरे रंग दाखवून दिले. पोलिसांनी डॉनला दहशतवादी डिक्लेर केलं. तेव्हा मंदाकिनी देखील अडचणीत आली. बंगलूरमधल्या एका फार्महाऊसवर ती लपून राहिली. पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा ती म्हणाली,

“लोकांना तस वाटतं पण वी आर जस्ट गुड फ्रेन्ड”.

तिने दाऊदला फ्रेन्डझोनमध्ये टाकलं, वास्तविक हा सर्वात मोठ्ठा धक्का होता. दाऊदसारख्या माणसाला फ्रेन्डझोन करणं म्हणजे चेष्टा नाही. 

दाऊदला फ्रेन्डझोन केलाय म्हणल्यावर पोलिसांनी तिला क्लिनचीट दिली असावी. या सगळ्या घटना घडल्या त्या 1995 साली आणि ती म्हणाली माझं तर 1990 सालीच लग्न झालय. 

तिने लग्न केलय हे जितकं आश्चर्यकारक होतं त्याहून इंटरेस्टिंग कुणासोबत केलय हे होतं. तिने तिच्या नवऱ्याच नाव सांगितलं. डॉ. कागूर रिनप्योचे. डॉ. कागूर रिनप्योचे हा माणूस कोणाला लक्षात यावा अस काहीच त्याच्यात नव्हतं पण त्याचा लहानपणीचा फोटो पाहिल्यावर माणसं म्हणाली, अरे हा तर मर्फी बॉय.

मर्फी रेडिओच्या जाहिरातीमध्ये ज्या मुलाचा फोटो छापून यायचा तो माणूस झाल्यानंतर तिने त्याच्यासोबत लग्न केलं. एका लहान मुलाने मंदाकिनीला अलगत घेवून जावं असा प्रकार होता. याच्यापेक्षा आपण काय वाईट होतो म्हणून त्याच ७८ टक्के माणसांचा कॉन्फिडन्स वाढला आणि प्रकरण शांत झालं.

त्यानंतर तीच्याबद्दल अधूनमधून छापून यायचं. ती सध्या अंधेरीत राहते. तिचा नवरा मर्फी बॉय असण्यासोबत बौद्ध भिक्षु देखील होता. त्यानंतर तो दलाई लामांच्या सोबत होता. तिबेटियन मुक्तीसाठी तो झटत असतो. आणि आज आपलं क्लिनिक चालवतो. मंदाकिनी देखील नवऱ्याला मदत म्हणून तिबेटी औधष केंद्र चालवते. त्याचसोबत योग वैगेरे शिकवते. 

मंदाकिनीच स्टोरी बघितल्यानंतर मुलींच्यातला काही वर्ग आठवतो, ज्या खूप चांगल्या असतात. त्या कधीच आपल्यासोबत येवू शकत नाहीत. कॉलेजचा एखादा डॉन मुलगा तिच्यासोबत फिरतो आणि वेळ आल्यावर ती संसार करणाऱ्या माणसासोबत कुठेतरी लांब जावून सरळ, साध आयुष्य जगते. चालायचं भिडू हितं दाऊद फ्रेन्डझोन झाला तिथ आपलं काय वाईट म्हणायचं.    

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.