मंदाकिनीचा तो सीन आणि त्याचा वाद यावर राज कपूरने दिलेलं उत्तर सगळं प्रकरण शांत करून गेलं..

नुकताच सोशल मीडियावर हेमांगी कवी या मराठी अभिनेत्रीने बाई, बुब्स आई ब्रा हे प्रकरण वर काढलं. यावर बरेच वाद- प्रतिवाद घालताना लोकं आपल्याला दिसली. कमेंट सेक्शनमध्ये तर यावर चांगलीच चर्चा झडत होती. न्यूडिटी आणि त्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन यावर अनेक वर्षांपासून चर्चा होत असतात. असाच एक अनुभव राज कपूर यांच्या वाट्याला आला होता त्याबद्दलचा हा किस्सा.

बॉलिवूडचा शो मॅन म्हणून राज कपूर हे ओळखले जातात. त्यांनी बॉलीवूडला दिलेले सिनेमे आणि त्याबद्दलच्या आठवणी अनेक लोकांच्या मनात घर करून आहे. एक सिनेमा राज कपूर यांनी बनवला होता राम ‘तेरी गंगा मैली…. १९८५ साली हा सिनेमा रिलीज झाला. राजीव कपूर आणि मंदाकिनी या जोडीला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. सिनेमा चांगलाच चालला.

मंदाकिनीचा हा पहिलाच सिनेमा होता. आपल्या अदाकारीने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. या सिनेमातला झरनेवाला सिन म्हणून गाजलेला सीन जितका प्रसिद्ध व्हायला लागला तितकाच तो वादग्रस्त सुद्धा होऊ लागला होता.

मंदाकिनी या सीनमध्ये पूर्ण भाव खाऊन गेली होती. या सिनेमासाठी अगोदर डिंपल कपाडियाने ऑडिशन दिली होती. पण स्क्रीन टेस्ट मध्ये राज कपूर यांनी डिम्पल कपाडियाला रिजेक्ट केलं.

राज कपूर यांना नवीन चेहरा हवा होता जो प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. मंदाकिनी अगदी या सिनेमासाठी परफेक्ट होती आणि राज कपूर यांनी तिला घेऊन हा अजरामर सिनेमा बनवला. नंतर मात्र मंदाकिनीला लोक प्रश्न विचारू लागले कि तो झरनेवाला सिन देऊन तुला पश्चाताप वाटतो का ? यावर मंदाकिनीने उत्तर दिल होतं कि

मुळीच नाही, उलट हा सीन करताना मी स्वतःला नशीबवान समजत होते.  या सीनमुळे माझी चर्चा झाली आणि मी भरपूर चाहते कमावले. काही लोकं कौतूक करतात तर काही लोकं नाव ठेवतात. या सीनमुळे लोकांचं अफाट प्रेम मला मिळालं. पण राज कपूर सारख्या इतक्या उच्च दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाली हे मी माझ भाग्यच समजते. 

या सिनेमात न्यूडिटी, इरॉटिक सीन याबद्दल राज कपूर यांनासुद्धा विचारण्यात आलं होतं कि इतकं उत्कट प्रकारे सीन का टाकले असावे. राज कपूर यांनी दिलेलं अगदी समर्पक उत्तर होतं.

अशा घटना विदेशात होतात त्यावर आपल्यातलं कोणी काही का बोलत नाही. जर फॅड्रीको फॅलिनी [ इटलीचा महान फिल्ममेकर ] त्याच्या अमारकॉर्ड सिनेमात न्यूड महिला दाखवतो त्याला तुम्ही आर्ट म्हणता, तो सिनेमा अनेक मोठमोठे मानाचे अवॉर्ड मिळवतो. आणि जर मी अशा गोष्टी हाताळायला लागलो तर मला शोषण वैगरे करतो असं म्हणतात.

राज कपूर यांचा मुद्दा ऐकून त्यांच्याविरोधात चाललेल्या कॉंट्रोव्हर्सी थांबल्या. पाश्च्यात्य कल्चरमध्ये या गोष्टींकडे आर्ट आणि सौंदर्य म्हणून बघितलं जात आणि आमच्या भारतात इतकं काही सुंदर आहे आणि लोकं त्यावरून मला विरोध करतात या वाक्यामुळे राज कपूर हुशार आणि जागतिक सिनेमा किती बारकाईने बघायचे यावरून लक्षात येतं.

पुढे अनेक वर्ष हा सिनेमा चालत राहिला, अजूनही कधीमध्ये टीव्हीवर लागतो. राज कपूर यांनी आपल्या दिग्दर्शनातून मंदाकिनी ज्या प्रकारे उभी केली ती दीर्घकाळ विसरणं अशक्य आहे. पुढे दाऊद आणि मंदाकिनी प्रकरणही चालूच राहिलं. पण राज कपूर यांनी केलेलं विधान खूप काही सांगून गेलं होतं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.