वैष्णोदेवीच्या घटनेप्रमाणेच महाराष्ट्रातही चेंगराचेंगरीची सर्वात भयंकर घटना घडली होती

नवीन वर्षाचची पहाटच एका दुर्घटनेने सुरु झाली ती म्हणजे, वैष्णो देवी मंदिर परिसरात झालेली चेंगराचेंगरीची घटना. 

करोडो भाविकांचं श्रधास्थान असणाऱ्या वैष्णो देवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली आणि त्यात १२ लोकांचा मृत्यू झाला तर १५ पेक्षा जास्त लोकं जखमी झाले अशी माहिती मंदिर संस्थाननं दिली….ही दुर्घटना नेमकी कशी काय घडली?  याबाबत जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “दर्शनासाठी रांगेत असलेल्या भाविकांमध्ये बाचाबाची झाली. काही जणांनी धक्काबुक्की केली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि दुर्दैवानं भाविकांना आपला जीव गमवावा लागला”.

हे झालं वैष्णो देवी मंदिराची दुर्घटना, अशा घटना घडण्याची हि काही पहिलीच वेळ नाही. दुर्दैवानं  अनेक घटना घडल्यात पण त्यात महाराष्ट्रात घडलेली मांढरदेवी दुर्घटना मात्र कुणीच विसरू शकणार नाही. 

महाराष्ट्रात घडलेल्या घटनांमधील मांढरदेवीच्या यात्रेत घडलेली हि सर्वात भयंकर दुर्घटना म्हणून  मानली जाते..

आपल्याकडे मुळातच सण-वार जास्त आहेत. त्यानिमित्ताने अनेकवेळा उत्सवाच्या ठिकाणी तसेच मंदिराच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. अशा ठिकाणी होणारी अलोट गर्दी अनेकदा अशा अपघाती घटना घडण्यास कारणीभूत ठरते.

त्याच्याशीच संबंधितली हि घटना २५ जानेवारी २००५ रोजी वाईच्या मांढरदेवी यात्रेदरम्यान झाली होती. वाईपासून नजीक असलेल्या मांढरदेवीच्या डोंगरावर दरवर्षी जानेवारीत उत्सव असतो. नवस फेडण्यासाठी हजारो भक्तगण या ठिकाणी हजेरी लावत असतात. वाईपासून नजीक असलेल्या मांढरदेवीच्या डोंगरावर दरवर्षी जानेवारीत उत्सव असतो.  १५ दिवस चाललेल्या या जत्रेत राज्यभरातून सुमारे तीन लाख भाविक जमले होते, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले होते. नवस फेडण्यासाठी हजारो भक्तगण या ठिकाणी हजेरी लावत असतात. पौर्णिमेनिमित्त म्हणजेच घडलेल्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची वर्दळ होती. 

पौष पौर्णिमेनिमित्त जमलेल्या या भाविकांची संख्या सुमारे तीन ते चार लाख होती. मंदिराकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर एकाच वेळी हजारो भाविक मंदिरात जाण्याचा, तसंच मंदिरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. अशा गर्दीत एका ठिकाणी एका दुकानदाराचं व भाविकाचं भांडण सुरू झालं. तिथे भाविकांची गर्दी जमली. याच वेळी एका दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे भाविकांमध्ये घबराट पसरून पळापळ सुरू झाली. 

चेंगराचेंगरी होण्याला एक कारण म्हणजे, मांढरदेवीला फोडलेल्या नारळातील पाण्याचे लोट वाहिले. दीपमाळेला वाहिलेले तेल त्यात मिसळले आणि यामुळे पळापळ करत असल्यामुळे घसरण निराम झाली होती.

त्या पळापळीत चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविक गुदमरले, खाली पडून गर्दीकडून तुडवले गेले आणि सुमारे ३०० जणं मृत्युमुखी पडले, तर शेकडो जखमी झाले. 

मृतांमध्ये अधिकतर लहान मुले आणि महिलांचा समावेश होता. जखमींवर उपचाराची पुरेशी व्यवस्थाही जवळपास नसल्याने काही जखमींना कसंबसं चार बसेसमधून जिल्ह्यातील निरनिराळ्या रुग्णालयांत पाठविण्यात आलं. हजारो भाविक गर्दीत हरवलेल्या आपल्या कुटुंबीयांचा नातेवाइकांचा असाहाय्यपणे शोध घेत होते. त्यांच्यासाठी मदतयंत्रणा उपलब्ध नव्हती. 

त्यातच स्थानिक गुंडांनी मृतांच्या, जखमी व्यक्तींच्या अंगावरील दागिने लुटून माणुसकीला काळिमा फासला होता. 

मात्र हि कुप्रसिद्ध घटना घडायला भाविकांची श्रद्धा नाही तर अंधश्रद्धा कारणीभूत ठरली होती. जादूटोणा आणि काळी जादू. या मंदिराच्या आवारात एक झाड आहे. असंख्य झाडांवर मारलेले खिळे, टांगलेल्या बाहुल्या आणि लिंबे, दुसऱ्याचे वाटोळे व्हावे आणि त्याची श्रीमंती आपल्याकडे यावी, या इच्छा प्रकट करणाऱ्या झाडावर लटकवलेल्या शेकडो चिठ्ठया दिसून यायच्या.  मंदिरात चार-पाच हजार बकऱ्यांचा नवस फेडण्यासाठी बळी ही नेहमीची बाब असायची. त्यामुळे तिथे कमालीची अस्वच्छता असायची, रक्ताचे पाट वाहायचे..हि एवढी गंभीर घटना घडली तरी त्यानंतर देखील तिथे अशा नवसं फेडण्याच्या घटना घडतच राहिल्या..

मांढरदेवी दुर्घटनेमुळे तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी, यात्रा-जत्रांमध्ये, जिथे लक्षावधी भाविक एकत्र येतात अशा ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थांच्या अभावाचा मुद्दा ऐरणीवर आला. राज्य शासन आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवलं गेलं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. या घटनेनंतर राज्य शासनाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पावलं उचलली मात्र तरीही सार्वजनिक ठिकाणांची गर्दी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणारे अपयश यामुळे अशा ठिकाणी गडबड-घोटाळा झाल्यास चेंगराचेंगरी होऊन काही जणांचा बळी जाणे अशा घटना घडतच आहेत. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.