एकेकाळी मनमोहन सिंग यांनी जिन्नांचं कपाळ फोडलं होतं…!!!

मोहम्मद अली जिन्ना.

पाकिस्तानचे सर्वेसर्वा मोहम्मद अली जिन्ना. भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या इतक्या वर्षांनंतर देखील हे नाव भारतीय राजकारणात तितकचं हॉट प्रॉपर्टी राहिलं आहे हे विशेष. कधी या नावामुळे अडवाणी आऊट ऑफ फोकस झाले, तर कधी कोणी जिन्नांचा फोटो काढण्याचा प्रयत्न करुन त्यांना नव्यानं चर्चेत आणलं. विषय काहीही असो, भारत- पाकिस्तान आणि देशभक्ती हे मुद्दे आले की त्यामध्ये जिन्ना हे नाव अपरिहार्यपणे येतं.

अशीच एक चर्चा बंगळूरू येथे चालू होती. चर्चा चालू होती ती पत्रकार आणि देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दरम्यान.

बोलता-बोलता विषय निघाला पाकिस्तानचा. त्यानंतर मोहम्मद अली जिन्ना यांचा. मनमोहन सिंग यांनी लगेच मोहम्मद अली जिन्नांचा एक किस्सा सांगितला. तो किस्सा खास बोलभिडूच्या वाचकांसाठी.

मनमोहन सिंग याचं कुटूंब पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात राहत होतं. तेव्हा मनमोहन सिंग याचं वय होतं १३ वर्ष. मनमोहन सिंग हे शिक्षणासाठी लाहोरमधील एका ज्युनिअर कॉलेजमध्ये जात असत. या कॉलेजच्या आवारात ते हॉकी खेळत असत.

हे ही वाच भिडू – 

सन १९४५ सालातली एक संध्याकाळ. मनमोहन सिंग ज्यूनियर कॉलेजच्या मैदानावर हॉकी खेळत होते. या स्टेडियमला लागूनच मोहम्मद अली जिन्नांचा बंगला होता. जिन्ना आपली सिगार पेटवून मस्तपैकी झुरके घेत त्यांच्या बंगल्याच्या समोर थांबले होते आणि मनमोहन सिंग हे हॉकीची  स्टिक घेऊन जोराचा शॉट मारण्याच्या तयारीत होते. मनमोहन सिंग यांनी असाच एक जोराचा फटका मारला आणि तो थेट जिन्नाच्या कपाळावर जाऊन लागला.

डॉ. मनमोहन सिंग यांनी अगदी उत्साहात हा किस्सा पत्रकारांना सांगितला, पण जिन्नांचा कपाळमोक्ष झाल्यानंतर जिन्ना नेमकं काय म्हणाले हे मात्र मनमोहन सिंग यांनी सांगायच टाळलं.

Leave A Reply

Your email address will not be published.