अमर अकबर अँथनीचा दिग्दर्शक कादर खानची स्क्रिप्ट फाडून गटारीत फेकणार होता..

कादर खान म्हंटल कि आपल्या डोळ्यांसमोरं येतो यो खळखळून हसवणारा दिग्गज अभिनेता. त्यांनी वेगवेगळ्या जॉनरच्या अनेक चित्रपटांत काम केलं. पण त्यांचा कॉमेडी जॉनर लोकांना जास्तच भावला. दरम्यान,  ते जितके चांगले कलाकार होते तितकेच चांगले लेखकही होते. त्यांनी  बऱ्याच सुपरहिट चित्रपटांचे  डायलॉग लिहिले, जे आजसुद्धा लोकांच्या तोंडावर आहेत.

जसं कि, अग्निपथचा सुपरहिट डायलॉग ‘विजय दीनानाथ चौहान…’, नसीब मधला “जिंदगी तो खुदा कि रेहमत हे, जो नही समजा उसके जिंदगी पे लानत हैं” मुकद्दर का सिकंदर मधलं ‘ज़िंदा हैं वो लोग जो मौत से टकराते हैं. मुर्दों से बदतर हैं वो लोग जो मौत से घबराते हैं’ हे त्यांनी लिहिलेले आहेत.

कादर खानने जवळपास २५० पेक्षा जास्त चित्रपटांत डायलॉग लिहिलेत. ज्यात कुली नंबर १,  धर्म-वीर, गंगा जमुना सरस्वती, अमर अकबर अँथनी, लवारिस, शराबी, अग्निपथ, सरफ़रोश, ख़ून भरी मांग, आतिश, हिम्मतवाला सारख्या चित्रपटाचा समावेश आहे. मात्र,तरीसुद्धा एकदा या दिग्गज अभिनेत्याची स्क्रिप्ट गटारात फेकण्याविषयी बोललं होत.

तर तो असा काळ होता, जेव्हा बॉलिवूडचे शोमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिरेक्टर मनमोहन देसाई यांच्यासोबाबत कादर खान यांनी बऱ्याच चित्रपटांत काम केलं होत.  या दोघांची जोडी असली कि चित्रपट सुपरहिटच असणार असं म्हंटल जायचं. पण जेव्हा मनमोहन देसाई आणि कादर खान यांची पहिल्यांदा भेट झाली होती, तेव्हा देसाईंनी त्यांच्यासोबत काम करायला साफ  नकार दिला होता. कारण  ते एक मुस्लिम होते.

तर झालं असं होत कि, प्रोड्यूसर हबीब नाडियाडवाला यांनी मनमोहन देसाई आणि कादर खान यांची मिटिंग करून दिली होती. त्यावेळी मनमोहन देसाई आपला चित्रपट ‘रोटी’साठी डायलॉग रायटर शोध होते. मनमोहन देसाई जेव्हा त्यांच्याशी भेटले तेव्हा त्यांनी कादर खान यांच्यासोबत काम करण्यास डायरेक्ट नकार दिला होता. त्यांनी म्हंटल कि,

‘हे बघ भाई, मुस्लिम लेखकांसोबत काम करताना मला प्रॉब्लेम होतो, कारण  उर्दू माझ्या डोक्यात शिरत नाही.’

कादर खानला त्यांचा हा तर्क विचित्रंच वाटला. पण कादर सुद्धा हार मानणाऱ्यातले नव्हते. त्यांनी मनमोहन देसाई यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा त्यांचं बोलणं ऐकून मनमोहन म्हणाले कि, ‘पहिल्यांदा काम बघेल, मला चांगल वाटलं तर ठीक, नाहीतर  स्क्रिप्ट  फाडून गटारात फेकून देईन.’

कादर खानने सुद्धा हे चॅलेंज स्वीकारलं आणि म्हंटल कि, जर चांगलं काम वाटलं तर ?  यावर मनमोहन देसाई म्हणाले ‘मग मी तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरलं. ‘

या चॅलेंज नंतर मग इतिहासच बनला 

काही दिवसांनंतर कादर खान काही सीन लिहून त्यांच्या जवळ गेले. मनमोहन देसाईंनी सगळे सीन वाचले. एकानंतर एक सीन वाचता वाचता ते त्यात हरवूनच गेले. शेवटचं पान वाचल्यानंतर त्यांनी कादर खानला एक झप्पीच दिली आणि म्हंटल आपण सोबत काम करू. 

जेव्हा मनमोहन देसाईंनी त्यांना फीजबद्दल विचारलं तेव्हा कादर यांनी आपल्या  हिशेबानं २५००० रुपये मागितले. यावर देसाई म्हणाले, ‘मी तुला १ लाख २५ हजार रुपये देईल.  कादर खान यांना विश्वासच  बसत नव्हता. ते आनंदात परत जात असताना मनमोहन यांनी त्यांना एक पोर्टेबल टीवी सेट आणि सोन्याचं ब्रेसलेटसुद्धा दिलं. यानंतर कादर खान आणि मनमोहन देसाई यांचं जे नातं जुळलं, ते मनमोहन देसाईंच्या शेवटच्या श्वासापर्यंत तसेच राहिलं.  या जोडीने  बॉलिवूडला धर्मवीर, गंगा जमुना सरस्वती, कुली, देश प्रेमी, सुहाग, परवरिश आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमर अकबर अँथनी सारखे अनेक चित्रपट दिले जे आजही प्रेक्षकांच्या मनामनात घर करून राहिले आहेत.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.