डॉ. मनमोहन सिंग यांचा CV पाहिला तर कळेल ते किती उच्चशिक्षित पंतप्रधान होते

भारताचे आजवरचे सर्वात जास्त शिकलेले पंतप्रधान कोण असतील ? अर्थातच नाव समोर येतं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग.

भारतीय प्रजासत्ताकचे १४ वे आणि पहिले शीख पंतप्रधान अशी इतकीच त्यांची ओळख मर्यादित नसून ते एक तल्लख अर्थतज्ञ, महान विद्वान आणि विचारवंत असणारे मनमोहन सिंग. जवाहरलाल नेहरूंनंतर १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे पंतप्रधान.

डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. डॉ. सिंग यांनी १९४८ साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. 

पुढं १९५८ साली त्यांचा विवाह जालंधरच्या सरदार छत्तर सिंग यांच्या कन्या गुरुशरण कौर यांच्याशी  झाला. लाइमलाईट पासून दूर राहणाऱ्या गुरुशरण भारतीयांच्या कमीच माहितीतल्या. या दाम्पत्याला तीन मुली झाल्या. उपिंदर, दमन आणि अम्रित. आणि या पोरींनी पण नेहमीच लाइमलाईट पासून दूर राहणंच पसंद केलं. 

मनमोहन सिंग हे किती शिकलेत ?

त्यांचं शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेलं आहे.  पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९५४ मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. १९५७ साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली.

१९६२ मध्ये त्यांनी नफिल्ड कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल. पूर्ण केले. त्यानंतर ते भारतात परतले आणि १९६६ – १९६९ या काळात संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेसाठी काम करण्यासाठी गेले. याचदरम्यान म्हणजेच १९६९ मध्ये मनमोहन सिंग दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रोफेसर बनले. 

१९७१ मध्ये ते सरकारी नोकरीत आले….

१९७२ मध्ये मनमोहन सिंग यांची श्री ललित नारायण मिश्रा यांनी विदेश व्यापार मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली. १९७६ मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक होते.

याचदरम्यान ते वित्त मंत्रालयात सचिव होते.  मनमोहन सिंग १९७६ ते १९८० या कालावधीत रिझर्व्ह बँकेचे संचालक होते. सोबतच भारतीय औद्योगिक विकास बँकेचे संचालक होते.

१९८०- १९८२ मध्ये मनमोहन सिंग नियोजन आयोगावर होते. 

१९८२ मध्ये त्यांची माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९८५ पर्यंत मनमोहनसिंग RBI चे गव्हर्नर म्हणून कार्यरत होते.

१९८५ ते १९८७ या काळात मनमोहन सिंग नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. १९९१ मध्ये ते केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनले आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षही बनले.

१९८७ ते १९९० या कालावधीत मनमोहन सिंग दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून कार्यरत होते. १९९१ मध्ये ते केंद्रीय लोक आयोगाचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले.

१९९१ मध्ये मनमोहन सिंग यांनी राजकारणात प्रवेश केला…

१९९८ मध्ये ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. भाजपच्या सरकार मध्ये २००४ पर्यंत मनमोहनसिंग राज्यसभेतील विरोधी पक्षनेते राहिले.

२००४ मध्ये यूपीएचं सरकार आलं. आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी मनमोहन सिंग यांना भारताचे पंतप्रधान म्हणून घोषित केलं. तोपर्यंत मनमोहन सिंग लोकसभेचे सदस्यही झाले नव्हते. त्यांचा अनुभव आणि राजकारणातली स्वच्छ प्रतिमा म्हणूनच भारतातील जनतेने त्यांना मनापासून स्वीकारले. 

२२ मे २०१४ रोजी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि पदभार स्वीकारला. भारताचे १४ वे पंतप्रधान बनले होते.

पंतप्रधानपदापर्यंतची कारकीर्द आपण पहिलीच… त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातली कामगिरी देखील बघूया… 

मनमोहन सिंग यांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी देश अत्यंत वाईट आर्थिक परिस्थितीतुन जात होता. मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक देशांना भेटी दिल्या. सत्तेत येताच त्यांनी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पाठिंब्याने व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी काम केले.

त्यांनीच सर्वप्रथम ‘लायसन्स राज’ नावाची योजना बंद केली, लायसन्स राज नावाच्या योजनेअंतर्गत कोणत्याही व्यापाऱ्याला व्यवसाय बदलण्यापूर्वी सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. या योजनेचा फायदा अनेक खाजगी कंपन्यांना झाला, ज्याचा फायदा देशाच्या आर्थिक स्थितीलाही झाला.

जीडीपी ग्रोथ रेट बघायचा तर, वर्ल्ड बँकेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जेव्हा मनमोहन सिंग सत्तेत आले, तेव्हा भारताचा जीडीपी वाढीचा दर होता ७.९ टक्के.  २००७ मध्ये भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ९% ने वाढले.  त्यामुळे भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विकसनशील अर्थव्यवस्था बनली.

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजना सुरू करण्यात आली. या कार्याचे जगभर कौतुक झाले आणि त्यांच्या कार्यकाळात शैक्षणिक क्षेत्रात बरीच सुधारणा झाली. मागासलेल्या जाती आणि समाजातील लोकांना उच्च शिक्षण देण्यासाठी सरकारने यशस्वी प्रयत्न केले.

२००६ मध्ये मनमोहन सिंग यांनी मनरेगा योजना आणली होती. यातून गावागावात अनेकांना रोजगार देण्यात आला.

२००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) स्थापन करण्यात आली.

२००९ मध्ये, ई-गव्हर्नन्स आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली, ज्या अंतर्गत लोकांना राष्ट्रीय ओळखपत्र देण्याची घोषणा करण्यात आली. 

२००८ मध्ये जागतिक मंदीचा फटका सगळ्या जगालाच बसला, शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाली, बेरेजगारीचा टक्काही वाढला. भारताची अर्थव्यवस्था कोसळणार असा अनेकांचा अंदाज होता. मात्र तेव्हा मनमोहन सिंग यांनी आवश्यक ती पावलं उचलली. मंदीचा अंदाज घेऊन सरकारनं आपली आर्थिक सज्जता राखली. दुसऱ्या बाजूला उपभोगाचा स्तर कायम राहावा म्हणून खर्चही वाढवला आणि रिझर्व्ह बँकेनं तातडीनं आपली आर्थिक धोरणं बदलल्यामुळं भारताला २०११-१२ पर्यंत मंदीचा चांगल्या प्रकारे सामना करता आला.

मनमोहन सिंग यांनी त्यावेळी घेतलेल्या धाडसी पण अभ्यासपूर्ण निर्णयाचं अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही कौतुक केलं होतं.

मनमोहन सिंग यांची कामगिरी आणि त्यांना मिळालेले पुरस्कार पाहूया,

पंतप्रधान पदावर यायच्या आधीही त्यांच्या कारकिर्दीची दखल म्हणजे,

१९५४ : मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठमधून अर्थशास्त्रात मास्टरकी केलं तेंव्हा  केल्याबद्दल  चंदीगडमध्ये प्रथम आले तेंव्हा त्यांना उत्तरचंद कपूर पदक प्रदान करण्यात आले होते.

१९५५ : मनमोहन सिंग यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राईट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

१९५६: मनमोहन सिंग यांना केंब्रिज विद्यापीठात अॅडम स्मिथ पुरस्कार मिळाला.

१९८२: मनमोहन सिंग यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सचे मानद फेलो म्हणून निवड झाली

१९८५ : मनमोहन सिंग यांची इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली

१९८६ : मनमोहन सिंग यांना N.C.E.R.T. द्वारे नॅशनल फेलो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन प्रदान करण्यात आले.

१९८७ : मनमोहन सिंग यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.

१९९३ : मनमोहन सिंग यांना युरोमनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१९९३ : मनमोहन सिंग यांना एशिया मनी पुरस्कार मिळाला.

१९९४ : मनमोहन सिंग ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनचे मानद फेलो म्हणून निवडले गेले.

१९९४: मनमोहन सिंग यांना वर्षातील सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणून एशिया मनी पुरस्कार मिळाला

१९९४ : मनमोहन सिंग यांची सेंटर फॉर एशिया इकॉनॉमी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स अँड सोसायटी मध्ये डिस्टिंग्विश्ड फेलो म्हणून निवड झाली.

१९९४ : मनमोहन सिंग यांची ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजचे मानद फेलो म्हणून निवड झाली.

१९९५ : मनमोहन सिंग यांना १९९४-९५ साठी इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार मिळाला.

१९९६ : मनमोहन सिंग दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे मानद प्राध्यापक.

१९९७ : मनमोहन सिंग यांना टिळक स्मारक ट्रस्ट, पुणे तर्फे लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९९७ : मनमोहन सिंग यांना न्यायमूर्ती के. एस. १९९६ साठी हेगडे फाउंडेशन पुरस्कार

१९९७ : मनमोहन सिंग यांना निहोन केइझाई शिंबुन इंक. द्वारे प्रादेशिक वाढीसाठी निक्केई आशिया पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९९९: मनमोहन सिंग यांना एच.एच कांची श्री परमाचार्य पुरस्कार मिळाला.

१९९९: मनमोहन सिंग यांना राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमी नवी दिल्लीचा फेलो मिळाला.

२००० : मनमोहन सिंग यांना W.LG द्वारे अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. उर्फ अण्णासाहेब चिरमुले ट्रस्टची स्थापना युनायटेड वेस्टर्न बँक लिमिटेड, सातारा, महाराष्ट्र यांनी केली आहे.

२००४ : भारतीय संसद गटाने मनमोहन जी यांना संसदीय पुरस्काराने सन्मानित केले.

२०१० : फाउंडेशन ऑफ अपीलने मनमोहन यांना वर्ड स्टेटमेंट पुरस्काराने सन्मानित केले.

मनमोहन सिंग यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा…

भारताला जागतिकीकरणाकडे नेण्याचे श्रेय मनमोहन सिंग यांना जाते. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर पुस्तके लिहिली आहेत जी या क्षेत्रातील आधारस्तंभ मानली जातात.  त्यांनी लिहिलेले ‘चेंजिंग इंडिया’ हे पुस्तक ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केले आहे. मनमोहन सिंग यांनी १८ डिसेंबर २०१८ रोजी या पुस्तकाचे प्रकाशन केले.

2003 : Recovery Rates from Distressed Debt – Empirical Evidence from Chapter 11 Filings, International Litigation, and Recent Sovereign Debt Restructurings

2003 : Are Credit Default Swaps Spreads High in Emerging Markets-An Alternative Methodology for Proxying Recovery Value

2004 : Counterparty Risk in the Over-The-Counter Derivatives Market

2004 : Collateral, Netting and Systemic Risk in the OTC Derivatives Market

2004 : Chile: Institutions and Policies Underpinning Stability and Growth (Occasional Paper (Intl Monetary Fund))

2004 : Chile: Institutions and Policies Underpinning Stability and Growth

2004 : Deleveraging After Lehman–Evidence from Reduced Rehypothecation

2004 : The Use (and Abuse) of CDs Spreads During Distress

2005 : मध्ये The Sasia Story Told by Madanjeet Singh

2005 : Counterparty Risk, Impact on Collateral Flows and Role for Central Counterparties

2006 : The (Sizable) Role of Rehypothecation in the Shadow Banking System

2006 : Vaccine Adjuvants and Delivery Systems

2007 : Learn to Speak and Write Italian

2007 : Use of Participatory Notes in Indian Equity Markets and Recent Regulatory Changes

2011 :  Growth Finance: Essays in Honour of C. Rangarajan

2011 : Making OTC Derivatives Safe – A Fresh Look

2011 : Development of Vaccines: From Discovery to Clinical Testing

2011 : Shadow Banking: Economics and Policy: 12

2012 : Novel Immune Potentiators and Delivery Technologies for Next Generation Vaccines

2013 : Development of Vaccines

2013 : Velocity of Pledged Collateral: Analysis and Implications

2013 : Biological Drug Products: Development and Strategies

2013 : Collateral and Monetary Policy

२०१३ The Changing Collateral Space

2014 : Financial Plumbing and Monetary Policy

2016 : Untold Story of Arvind Kejriwal: Story of a Common man

2014 : Collateral and Financial Plumbing

2015 : Limiting Taxpayer ?Puts an Example from Central Counterparties

2015 : Novel Approaches and Strategies for Biologics, Vaccines and Cancer Therapies

2015 : Lyophilized Biologics and Vaccines: Modality-Based Approaches

2015 : Anand Sahib – English Translation and Transliteration: Sikh Religion Prayer, Holy Scriptures

2015 : In Ghost’s Den

2015 : Managing the Fed’s Liftoff and Transmission of Monetary Policy

2016 : Collateral and Financial Plumbing 2nd Impression

2016 : Collateral and Financial Plumbing: 2nd Impression

2017 : Demonetisation: The Economists Speak

2018 : A girl in dream (Part-1)

2018 : Changing India

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.