गुप्तहेर खात्याने सांगूनही स्वतःचा जीव धोक्यात घालून मनमोहनसिंग काश्मीर दौऱ्यावर गेले..

देशाचे गृहमंत्री अमित शहा सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्या दौऱ्यात काय घोषणा होणार ? जम्मू काश्मीरसाठी सरकार काय निर्णय घेणार याची चर्चा आहेच. पण अमित शहाच नाही तर देशातला कुठलाही महत्त्वाचा नेता जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेला की त्या दौऱ्याची प्रचंड चर्चा होते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातही हा दौरा चांगलाच गाजला होता आणि त्याचं कारण ठरलेलं सुरक्षा…

भारताचे १४ वे पंतप्रधानपद सांभाळणारे डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कामाप्रती असलेला व्यासंगी व शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असणारी तत्परता आणि विनम्रतेमुळे प्रत्येक व्यक्ती आणि पक्ष त्यांच्याकडे आदराने बघतो. त्यांच्या कार्यकाळातील अनेक धाडसी आणि अभ्यासू निर्णय आपल्याला माहितीच आहेत.

परंतु इतक्या शांत स्वभावाचा व्यक्ती थेट आपला जीव धोक्यात घालून एक धाडसी निर्णय घेतो जो इतर कोणत्याही पंतप्रधानांनी घेतला नसता, असा एक किस्सा २००५ मध्ये घडला घडला होता त्यावेळेस त्यांनी दाखवलेल्या हिंमतीमुळे सगळीच यंत्रणा चकित झाली होती.

त्याचं झालं असं कि, २००५ मध्ये ७ एप्रिल ला श्रीनगरमध्ये एक उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

७ एप्रिल रोजी नियंत्रण रेषा पार करून जाणाऱ्या श्रीनगर मुजफ्फराबाद बससेवेचा उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित केला होता.

आणि त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच ६ एप्रिल ला दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या राज्य पर्यटन केंद्रावर हल्ला केला होता. जवानांनी त्यातल्या दोन दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार मारले असले तरी एक दहशतवादी सुटला होता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान श्रीनगरला जाणार होते, त्यामुळे मोठी रिस्क होती.

आणि महत्वाचं म्हणजे नवीन बससेवेला याच ठिकाणाहून सुरुवात होणार होती, त्यामुळे सुरक्षततेच्या दृष्टीने, राष्ट्रीय संरक्षण आणि गुप्तहेर खात्याच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना ती भेट रद्द करण्याचा सल्ला दिला. परंतु मनमोहनसिंग यांना हा दौरा करायचाच होता.

गृहमंत्री शिवराज पाटील, नारायणन, गुप्तहेर खात्याचे प्रमुख ई.एस.एल नरसिंहन आणि इतर लोकांनीही पंतप्रधानांना हा दौरा रद्द करण्याचा सल्ला दिला.

या दौऱ्यावर पंतप्रधानांच्या बरोबर सोनिया गांधी ही जाणार होत्या, त्यांनाही हा दौरा व्हावा अशीच इच्छा होती म्हणून त्यांनी मनमोहन सिंग यांना म्हणाल्या, “तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे”.

अद्याप मनमोहन सिंह मोठ्या विचारात होते त्यातही त्यांचा तो दिवस खूप धावपळीत गेला.

होता रात्री नऊ वाजता शेवटची बैठक आटोपली. पंतप्रधानांनी हा दौरा रद्द करावा असं सर्वांनी सांगितलं. डॉ. मनमोहन सिंग खिन्नपणे बसले होते. त्यांच्या चेहर्‍यावर संताप आणि चिंता या दोन्ही भावना स्पष्ट उमटत होत्या.

आणि अचानक एका-एकी ते जागेवरून उठले आणि अंगात चैतन्याचा संचार झाल्यासारखे जोरात म्हणाले, “मी श्रीनगरला जाणार”.

७ रेस कोर्स मार्ग मधून बाहेर पडत असलेल्या अधिकाऱ्यांना परत बोलवण्यात आलं. पंतप्रधानांनी सोनीयांना फोन करून आपला श्रीनगरला जाण्याचा निर्णय पक्का झाल्याचं कळवलं.

सोनिया यांनीही डॉक्टर सिंग यांच्या निर्णयाला दुजोरा देत, आपणही बरोबर येणार असल्याचं त्यांना सांगितलं. दुसऱ्या दिवशी सुरक्षा रक्षकांच्या कडक व्यवस्थेत दोघं श्रीनगरला रवाना झाले आणि तिथे जाऊन त्यामुळे ठरल्याप्रमाणे पहिल्या बस ला हिरवं निशाण दाखवलं आणि उद्घाटनाचा कार्यक्रम पूर्ण केला.

श्रीनगरच्या मध्यवर्ती ठिकाणी हा कार्यक्रम चालू होता, कसलाही धोका घडला नाही हे सुदैव म्हणावं लागेल. डॉ. मनमोहन सिंग हे त्यांच्या भाषणात म्हणाले कि, “शांततेच्या लांबलचक मार्गांवरचं हे पहिलं पाऊल आहे”.

डॉ. सिंग यांची ही राजकीय कृती असेल नसेल परंतु जीवावर हल्ला होण्याची भीती असूनही त्यांच्या या  साहसी कृत्यामुळे काश्मीर खोऱ्यात तसंच देशभरात त्यांची प्रतिष्ठा खूप वाढली. 

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.