हे संग्रहालय मनमोहन सिंग आणि अडवाणी यांच्या आवाजात फाळणीच्या वेदनांचे स्मरण करणार

देशाला स्वातंत्र्य मिळताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गुलामगिरीतून मुक्त होण्याचा आनंद होता, पण मनात कुठेतरी फाळणीची खंतही होती. जी अजूनही  कायम आहे.  नुकताच 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट फाळणी वेदना दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याचे म्हंटले. फाळणीत बळी गेलेल्या लोकांची आठवणीत हा दिवस साजरी  केला जाईल. 

याचं साखळीत दिल्ली सरकार राजधानी दिल्लीच्या कश्मीरी गेट परिसरात देशाच्या विभाजनावर आधारित संग्रहालय बनवत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांच्या आवाजात येथे फाळणीची वेदना ऐकवली जाईल.

सोबतचं, या संग्रहालयात  फाळणीशी संबंधित गोष्टीही ठेवण्यात आल्यात. ज्यात  भारतातील अमेरिकेचे राजदूत अतुल केशप यांच्या आजी-आजोबांचे कुलूप – चावी आणि न्यायमूर्ती फली एस. नरिमनच्या आजीची साडीही प्रदर्शनात असेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत संग्रहालय उघडण्याची योजना आहे. 

हे संग्रहालय फाळणीनंतरचीही कथा सांगेल की, त्या शोकांतिकेला सामोरे गेल्यानंतर बरेच लोक त्यांच्या मेहनतीने यशस्वी झाले.  संग्रहालयात लोकांना मौखिक इतिहास पाहायला आणि ऐकायला मिळेल. येथे 100 लेख  प्रदर्शित केले जातील.  ज्यात कागदपत्रे, पत्रे,शॉर्ट फिल्मचाही समावेश असेल.

दरम्यान, आजही जेव्हा फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून भारतात आलेली मंडळी त्यांचे किस्से सांगतात तेव्हा प्रत्येकाचे डोळे ओले होतात. असे वाटते की, सगळं काही आत्ताचं घडलयं. 70 वर्षांनंतरही या वेदना जिवंत आहेत. 

या कटू आठवणी लक्षात ठेवून, दारा शिकोह लायब्ररीत दिल्लीच्या विभाजनावर एक संग्रहालय बांधले जाणार आहे.  या ऐतिहासिक वास्तूमध्ये संग्रहालय बांधण्यासाठी पर्यटन मंत्रालय, भारत सरकार आणि कला, संस्कृती आणि भाषा विभाग, दिल्ली सरकार यांचे विशेष सहकार्य आहे.  यात दाराशिकोहच्या जीवनावर आधारित गॅलरी देखील आहे.  ‘द आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ट्रस्टने स्वखर्चाने हे संग्रहालय बांधले आहे. 

खरं तर भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी,  15 ऑगस्ट पर्यंत संग्रहालय तयार होणार होते, परंतु कोरोनामुळे त्याला उशीर झाला. आता ते पुढच्यी वर्षी जानेवारीपर्यंत पूर्ण होईल.  

जगातील सर्वात मोठं आठवणींबद्दलचं एक मोठे संग्रहालय असेल.  सांस्कृतिक अनुभवांचे केंद्र म्हणून या इमारतीचे ‘दास्तान-ए-दिल्ली’ असे नामकरण केले जाईल. इमारतीमध्ये शहराचे विविध पैलू आणि आधुनिक, प्राचीन इतिहास आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वांवर आधारित कथा दाखवल्या जातील. 

ट्रस्टचे प्रमुख किश्वर देसाई यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अमृतसरनंतर दिल्लीत उघडलेले हे तिचे दुसरे संग्रहालय आहे.  हे संग्रहालय ज्यांनी फाळणीचे दुःख सहन केले आहे त्यांना समर्पित आहे.  नव्या पिढीने त्याचा आदर केला पाहिजे.  आता अशी वेळ पुन्हा येणार नाही.  

त्यांनी म्हंटलं की, ज्यांनी वस्तू दान केले आहे किंवा दानात  दिल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांबद्दलही इतिहास लिहिला जाईल.  

भारतातील अमेरिकेचे राजदूत अतुल केशप यांनी संग्रहालयाला एक कुलूप आणि चावी दान केली आहे.  जे त्यांच्या  आजोबा चौधरी भवानी दास अरोरा आणि आजी चिंकोबाई सचदेवा यांची आहे.  1947 मध्ये फाळणीपूर्वी त्यांचे आजोबा मुजफ्फरगढ, जिल्हा मुल्तानजवळील विष्णुपुरा गावात राहत होते.  तेथून ते ट्रंकमध्ये काही सामान घेऊन पळून गेले होते. त्यालाचं हे कुलूप लावले होते. 

1947 ते 1955 पर्यंत त्यांचे आजोबा पानिपतच्या मॉडेल टाऊनमध्ये त्यांचे घर बांधून राहिले. अतुल केशप यांनी काही दिवसांपूर्वी दारा शिकोहचे ग्रंथालय असलेल्या इमारतीला भेट दिली, जिथे संग्रहालय बांधले जाणार आहे.  येथे त्यांनी लॉक आणि चावी संग्रहालयाच्या सहसंस्थापक मल्लिका अहलुवालिया यांना दिल्या.  तसेच न्यायमूर्ती फली एस नरिमन यांनी आजीची साडी दान करण्याचे आश्वासन दिले आहे.  नीमराना हॉटेल व्यवसायीक अमन नाथ यांनी वडिलांची पाकिस्तानातून पळून जाताना सोबत आणलेली सूटकेस देणार असल्याचे सांगितले.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.