एक डोळा गमावूनही तैमूरच्या आजोबाने वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं…

साल होतं १९६२ चं. भारत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेलेला होता. त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधार होते नरी कॉन्ट्रॅक्टर. १ मार्च १९६२ ला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर बार्बाडोसच्या मॅचच्या दरम्यान त्यावेळचा सगळ्यात वेगवान गोलंदाज चार्ली ग्रिफिनचा एक उसळता बॉल नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यात बसला. यामुळे भारताचा कर्णधार मैदानातच कोसळला. बॉलचा फटका इतका जोरात बसलेला होता कि कान आणि नाकातून रक्त येऊ लागलं.

त्यावेळी सगळेच चिंतेत पडले कि आता पुढं काय ? अशावेळी संघाची धुरा कोण वाहणार असे प्रश्न पडू लागले. त्यावेळी टीमची सूत्र एका २१ वर्षांच्या मुलाला देण्यात आली. हा खेळाडू संघात सगळ्यात जास्त तरुण होता. संघात असलेले सगळेच खेळाडू तेव्हा त्या तरुणांपेक्षा मोठे होते. पुढे चालून हे एकवीस वर्षांचं पोरगं भारताच्या क्रिकेट इतिहासातील एक यशस्वी नेतृत्व बनलं.

तो २१ वर्षांचा तरणाबांड खेळाडू होता मन्सूर अली खान पतौडी. सगळ्यात जगात हा खेळाडू टायगर पतौडी म्हणून फेमस झाला. पुढची ४० वर्षे सगळ्यात कमी वयाचा कॅप्टन म्हणून तो रेकॉर्ड टायगर पतौडी यांच्या नावे होता.

टायगर पतौडी हे शिक्षणासाठी इंग्लंडला गेले होते. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी सक्सेससाठी डेब्यू केला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्याच्या काळातच ते तिथल्या संघाचे कॅप्टन बनले होते. आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच टायगर पतौडी यांच्या वडिलांचं निधन झालं हा त्यांना मोठा धक्का बसलेला होता. त्यामुळे त्यांनी पुढे कधीच आपला वाढदिवस साजरा केला नाही.

वय वर्षे २० असताना टायगर पतौडी यांच्या आयुष्यात अजून एक मोठा आघात घडला. १ ऑगस्ट १९६१ ला एक दिवस कार चालवत असताना समोरून गाडी त्यांच्या कारला येऊन धडकली. मोठा अपघात घडला. या ऍक्सिडंटमध्ये एक काच टायगर पतौडी यांच्या थेट डोळ्यात घुसली. मोठी जखम झाली. एका डोळ्याची दृष्टीच निघून गेली. 

या जखमेमुळे त्यांना बऱ्याच अडचणी येऊ लागल्या. क्रिकेट खेळतेवेळी त्यांना दोन दोन बॉल दिसायचे. सिगारेट पेटवताना लायटर तिसरीकडेच जायचं. पण त्यांनी क्रिकेट खेळणं थांबवलं नाही. १९६१ रोजी त्यांनी क्रिकेटमध्ये डेब्यू केला. मद्रासमधल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत त्यांनी शतक झळकावलं. या नंतर एक वर्षांतच ते भारतीय संघाचे कॅप्टन बनले.

टायगर नावाप्रमाणेच टायगर होते. परदेशात त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ लढाऊ बनला. विदेशात पहिल्यांदा भारताला विजय मिळवून देणारा कर्णधार म्हणून टायगर पतौडी खान यांचं नाव अजरामर झालं. १९६८ मध्ये न्यूझीलंडला हरवून त्यांनी हा पराक्रम केला होता. ४६ पैकी ४० सामन्यांमध्ये ते भारताचे कर्णधार होते. 

आजही टायगर पतौडी यांचं वैयक्तिक रेकॉर्ड विशेष काही नसलं तरी त्यांच्या कॅप्टन्सीखाली भारतीय संघ बलाढ्य बनू लागला होता.

एकदा तर डोळ्याच्या त्रासामुळे त्यांनी भारतीय संघाचं कर्णधारपद सोडायची तयारी दाखवली होती. मात्र तेव्हा भारतीय संघाचे निवड समितीचे अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांनी त्यांना खेळला नाही तरी चालेल पण कर्णधारपद सोडू नका अशी विनंती केली होती.

तत्कालीन भारताचे महान स्पिनर हे आपल्या कारकिर्दीत आणि एकूणच क्रिकेटमधला ग्रेट कॅप्टन म्हणून टायगर पतौडी यांचं नाव घेतात. सगळ्यात कमी वयाचा कर्णधार म्हणून सुद्धा त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला होता.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.