चिमण्यांना मारण्याचे आदेश दिले आणि चीनवर पर्यावरणीय आपत्ती आली.

मानवजातीच्या इतिहासात पर्यावरणीय आपत्ती येणे अगदी सामान्य गोष्ट वाटत असली तरी…

१९५८ मध्ये चीनमध्ये आलेल्या एका पर्यावरणीय आपत्तीची तुलना कोणत्याच संकाटासोबत आपण करू शकत नाही, ते संकटच आगळे-वेगळे होते आणि त्या संकटाला सर्वस्वी मनुष्य जात कारणीभूत होती.

नेमकं काय संकट होतं ?

पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे नेते माओ त्से तुंग यांनी देशातील सर्व चिमण्या मारून टाका असा  आदेश दिला. त्यांनी ठरवले की चीन चिमण्यांसारख्या पक्ष्यांना उपद्रवी पक्षी घोषित करत हा अजब आदेश दिला होता. याचं कारण काय तर माओला वाटले की चिमण्या खूप धान्य खातात आणि सर्व चिमण्या मारल्या जाव्या जेणेकरून देशातील धान्य मोठ्या प्रमाणात वाचेल असा तर्क त्यांनी लावला.

माओ त्से तुंग यांच्या मते, चिमण्या चीनच्या आर्थिक विकासाच्या मार्गात अडथळा आणत होत्या.

पण त्याच्या पुढच्या तीन वर्षांत, देशावर पर्यावरणीय संकट आले आणि चीन आर्थिक संकटामध्येहि अडकला आणि या दुष्काळात उपासमारीमुळे ४५ दशलक्ष लोक मरण पावले.

माओ झेडोंगने चीनमधील जीवन आधुनिक आणि सुधारित करण्याच्या प्रयत्नात अनेक मोठ्या मोहिमा हाती घेतल्या होत्या. या मोहिमांपैकी एक कीटकांची मोहीम होती, १९५८ ते १९६२ दरम्यान ग्रेट लीप फॉरवर्डचा म्हणजेच सर्व चिमण्या मारून टाकणे हे या मोहिमेचा भाग होता. पक्ष्यांची संख्या कमी करण्यासाठी लोकं एकत्र आले. वेगवेगळ्या मार्गाने या चिमण्या मारण्याचा कार्यक्रम हाती घेतला.

मोहिमेचा परिणाम म्हणजे चिमण्या जवळपास नामशेष झाल्या.

चीनमध्ये १९५८ मध्ये किती चिमण्या होत्या याची माहिती उपलब्ध नाही. पण त्या मोहिमेत ६०० मिलिअन चिमण्या मारल्या गेल्या होत्या. मात्र हि मोहीम राबवताना त्यांना हे लक्षात आले नाही कि याचे परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागणार आहेत.

यासाठी चीनी लोकांना फार काळ वाट पहावी लागली नाही, अगदी २-३ वर्षांत त्यांना याचा परिणाम भोगावा लागला होता.

लक्षात आले की पिकांच्या शेतात कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामागे साधे कारण होते कि, उपद्रवी कीटकांना भक्ष्य करणाऱ्या चिमण्या तर चीनने मारून टाकल्या त्यामुळे तेथील शेतीवर टोळधाडांचे संकट आले होते. या टोळधाडांची शिकार करणाऱ्या चिमण्याच अस्तित्वात नव्हत्या.

या संकटावर जेंव्हा संशोधन केले तेंव्हा कळलं कि, चिमण्या ह्या प्रतिउत्पादक होत्या. चिमण्या फक्त धान्य खात नाहीत, तर त्या धन्यांना मोठ्या प्रमाणात खाणाऱ्या कीटकांना देखील खातात. 

या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील धान्य उत्पादन कोलमडले आणि मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. लोक खाण्यासाठी गोष्टी संपल्या आणि लाखो उपाशी राहिले. लोकसंख्या वाढत होती आणि दुसरीकडे दुष्काळ देखील. आणि मग लोकांनी त्यांच्या मार्गात जे जे येईल ते ते सर्व काही खाल्ले. या दुष्काळात  मृत्यूची अधिकृत संख्या १५ दशलक्ष होती चीन सरकारकडून जाहीर झाली होती.

तथापि, काही विद्वानांनी तर असा अंदाज व्यक्त केला आहे की, हे मृत्यू ४५ ते ७८ दशलक्षांपर्यंत होते.

५० वर्षांहून अधिक काळानंतरदेखील चीनमध्ये महान दुष्काळ हा एक निषिद्ध विषय आहे. लोक इतर लोकांना खाऊ लागले, अन्नासाठी हजारो लोकांची हत्या झाली असे उल्लेख केले गेले. टॉम्बस्टोन या पुस्तकात, चिनी पत्रकार यांग जिशेंग यांनी ३६ दशलक्ष लोकांच्या मृत्यूचा अंदाज लावला आहे. त्याच्या या पुस्तकावर चीनमध्ये त्वरीत बंदी घालण्यात आली आहे, का तर त्याने तेथील घाणेरडं वास्तव जे सांगितलं होतं !

माओने चिमण्यांना मोहीम संपवण्याचे आदेश दिले होते पण अश्या परिस्थितीनंतर त्याला चिमण्यांचे महत्व कळले. आणि नंतर पक्षी वाचवा मोहीम वेगेरे चावली. या मोहिमेचे उद्दीष्ट कृषी उत्पादन वाढवणे होते, परंतु ग्रेट लीप फॉरवर्ड दरम्यान, तांदळाचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले होते.

कदाचित माओ त्से तुंगला निसर्गावर विजय मिळवायचा होता. तथापि, त्याच्या याच उथळ व निसर्गाच्या विरोधात जाणाऱ्या धोरणांमुळे दुष्काळ पडला ज्यामध्ये लाखो लोकांचे प्राण गेले.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.