संपूर्ण देशात फक्त नागपुरात साजरा होणारा मारबत उत्सव काय आहे?

संपूर्ण देशात खूप फक्त नागपुरात साजरा होणाऱ्या एक सणाची सद्या चांगलीच चर्चा आहे.  दरवर्षी साजरा होणारा मारबत उत्सव यंदा कोरोनाच्या निर्बंधांमुळे साध्या पद्धतीनं साजरा केला जाणार असल्याचा निर्णय ठरला  आहे…नावाने वेगळा आणि नवीन वाटत असला तरी या सणाला बराच मोठा इतिहास आहे. हळूहळू दीडशे वर्षाकडे या उत्सवाची वाटचाल सुरू आहे.

मारबत या उत्सवाला १४१ वर्षांची परंपरा आहे….पण हा उत्सव सुरु होण्यामागे एक घटना कारणीभूत आहे.

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी काळ्या आणि पिवळ्या दोन्ही मारबतींची मिरवणूक काढली जाते. या दोन्ही मारबतींची वेगवेगळी ओळख आहे. आपण आधी  पिवळी मारबतीबद्दल जाणून घेऊया, लोकांचे रक्षण करणारे प्रतिक म्हणजे पिवळी मारबत.

पिवळी मारबत चांगल्या गोष्टींचे स्वागत करण्यासाठी काढली जाते.

ब्रिटिश राजवटीचा काळ होता जेंव्हा आपली जनता ब्रिटिशांच्या अत्याचाराने त्रस्त होती. इंग्रजांच्या जाचातून स्वतंत्र व्हावं, या भावनेने १८८४ तऱ्हाणे तेली समुदायाने पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. 

पिवळी मारबत उत्सव हा १८८५ पर्यंतचा आहे. म्हणजेच या पिवळ्या मारबतीला १३७ वर्षांचा इतिहास लाभला आहे.  या मारबतीची नागरिक पूजा करतात, नवस बोलतात. मिरवणुकीनंतर दोन्ही मारबतीचं दहन केलं जातं

तर काळी मारबत काढण्यामागे एक इतिहास आहे.

आपला देश इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या अधिपत्याखाली होता.  नागपूरकर राजे भोसले यांच्या राजवटीत त्यांच्याच घराण्यातील बाकाबाई इंग्रजांना फितूर झाली होती. त्यामुळं भोसले राजवटीचा पराभव झाला होता. 

त्यावेळी भोसले घराण्यातील बांकाबाई हिने इंग्रजांशी हातमिळवणी केली होती, त्यामुळं भोसले राजवटीचा पराभव झाला होता. बाकांबाईच्या पतीने देखील या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढली जाते.

तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला ‘बडग्या’ म्हणतात.

त्याचा निषेध करण्यासाठी तसेच अनेक घातक असलेल्या रूढी-परंपरांचे उच्चाटन करणे, वाईट परंपरा, रोगराई, संकटांतून समाजाला मुक्त करण्यासाठी १८८० सालापासून ही काळी मारबत काढण्यात येत आहे.

आपल्याला स्वातंत्र्य मिळून आज कितीतरी वर्षे झालीत परंतु, नागपूरकर  नागरीकांच्या मनात बांकाबाईच्या या कृत्यामुळे झालेली जखम अजुन भळभळतेच आहे.

इंग्रजांना संशय येऊ नये म्हणून तेंव्हा नागपूरकरांनी या काळ्या मारबतीला महाभारताचा संदर्भ दिला होता. कृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतणा मावशीचे प्रतीक म्हणजे काळी मारबत समजले जाते.

एकाच दिवशी काळी आणि पिवळी अशा दोन्ही दोन्ही मारबती एकाचवेळी निघतात.

नागपूर व जवळपासच्या गाव-खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहानग्यांना घेउन येतात.मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात. नागपूरमधली हि एक जत्राच आहे. यंदा मात्र या उत्सवावर कोरोनाचं सावट आहे. तरीही खंड पडू न देता कमी लोकांमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या मारबतीकडे ‘कोरोना… घेऊन जाय गे…मारबत’ असं साकडं या वेळेस घालण्यात आलं आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.