दिल्लीत फडकणारा राष्ट्रध्वज हा नांदेडमध्ये तयार केला जातो

कित्येक वर्षाच्या संघर्षांनंतर आणि कित्येक देशप्रेमींच्या बलिदानानंतर भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 

मोठ्या खडतर संघर्षांनंतर हे स्वातंत्र मिळालं होत… २६ जानेवारी १९३० रोजी लाहोरच्या काँग्रेसचे जे अधिवेशन झाले, त्यातच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. याच अधिवेशनात तिरंगा ध्वजही फडकावण्यात आला. आकाशात अभिमानाने फडकणाऱ्या तिरंग्याकडं पाहून हर एक भारतीयाच्या मनात देशाप्रती अभिमान जागृत होतो…

याच तिरंग्याचा इतिहास तर तुम्हाला माहितीच असेल पण हा तिरंगा कुठे बनतो हे माहिती आहे का ?

दरवर्षी १५ ऑगस्ट असो वा २६ जानेवारीला असो मंत्रालय आणि लाल किल्यावर फडकणारा राष्ट्रध्वज हा मराठवाडा खादी ग्रामद्योग केंद्रात तयार होणारा राष्ट्रध्वज असतो…याचा समस्त नांदेडकरांना फार अभिमान असतो…असायलाच हवा !

आपल्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सुद्धा नांदेडमध्ये तयार केलेला राष्ट्रध्वज फडकतो

खरं तर पूर्ण देशभरात नांदेड आणी कर्नाटकातील हुबळी आणि उत्तर प्रदेशात या तीनच ठिकाणी राष्ट्रध्वज तयार केला जातो….मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या नांदेड केंद्रात राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे या केंद्राने राष्ट्रध्वज तयार करून ठेवले जातात. ग्रामोद्योग समितीच्या नांदेड केंद्रामध्ये तयार केलेला ध्वज एकूण १६ राज्यांमध्ये पाठवला जातो.  राज्यासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण, तामिळनाडू, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब राज्यातही खादी ग्रामोद्योगमध्ये तयार झालेले राष्ट्रध्वज पाठविले जातात. 

खादीच्या कपड्यापासून निर्मिती झालेला राष्ट्रध्वज देशभरात फडकवला जातो. यासाठी नांदेडचे खादी ग्रामोद्योग मंडळ वर्षभर विविध आकारीतील ‘तिरंगी ध्वजा’च्या निर्मितीमध्ये गुंतलेले असते. यातुन नांदेडच्या खादी समितीला एक कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत आहे.

खादी ग्रामोद्योग निर्मिती समितीत जवळपास ५०० कामगार काम करतात अशी नोंद आहे. त्यापैकी बहुसंख्य महिलाच आहेत असं सांगितलं जातं. पण या ५००कामगारांपैकी  प्रत्यक्ष राष्ट्रध्वज निर्मितीमध्ये जवळपास १५० कामगार आहेत. राष्ट्रध्वजाचे कापड, शिलाई, गुंडी, अशोक चक्र हे सर्व येथेच तयार केले जाते. वर्षाला राष्ट्रध्वज विक्रीची उलाढाल चांगल्या प्रमाणात असते पण असं देखील दिसून येतं कि,

खरं तर खादी हे केवळ कापड नसून तो एक राष्ट्रीय विचार आहे, ज्याच्या कडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळते. याच प्रेरणादायी विचारातून निर्माण झालेल्या खादीच्या राष्ट्रध्वजामुळे दिवसेंदिवस खादीला चांगले दिवस येत गेले.

स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेस हीच खादी अनेकांची प्रेरणा बनली होती. स्वातंत्र्योत्तर भारतात महात्मा गांधी जयंती दरम्यान खादीच्या कपड्यांवर दिली जाणारी सवलत, ग्रामपंचायतीच्या निवडणूका असो वा लोकसभा – विधानसभा निवडणूकी दरम्यान नेते, कार्यकर्ते खास करून खादीच्या कपडे घालतात. आणि खादीची मागणी वाढत गेली, आणि खादी कपड्यांची विक्री वाढत गेली. 

नांदेडचं बोलायचं तर….अगदी कोरोनाच्या काळापर्यंत ग्रामोद्योग ठीकठाक चालत होता. पण कोरोना संकटाचा परिणाम या उद्योगावर देखील पडला होता.  राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राचे दरवर्षीच्या तुलनेत साठ टक्के उत्त्पन्न कमी झालं होतं. लॉकडाऊन आणि वाहतूक व्यवस्था नसल्याने देशभरातून राष्ट्रध्वजाची मागणी घटली होती.

खादी ग्रामोद्योग समितीत तयार केले जाणारे राष्ट्रध्वज हे विविध आकाराचे असतात. १४ बाय २१, ८ बाय १२, ६ बाय ९, ४ बाय ६, ४ बाय साडेचार, २ बाय ३ (फूट), १८ इंच, २७ इंच, १२ इंच व कारफ्लॅग अशा आकारात ध्वजाची निर्मिती केली जाते.

मंत्रालयावर दररोज फडकणारा, मंत्र्यांच्या कारवर फडकणारा व राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी व इतर शासकीय कार्यालयांवर फडकणारा राष्ट्रध्वज हा खादी ग्रामोद्योग समितीत तयार केला जातो.

नांदेडच्या खादी ग्रामोद्योग समितीकडून विविध अशा दहा साईजमध्ये राष्ट्रीय ध्वजाचे उत्पादन होते. यात सर्वात मोठ्या साईजचा ध्वज म्हणजे १४ बाय २१ या साईजचा ध्वज तयार होतो. मागील वर्षी या ध्वजाची किंमत १७ हजार ८२० रुपये इतकी होती.  दरवर्षी हजारोंच्या संख्येने ध्वजांची निर्मिती करण्यात येते. यातून बरेच ध्वज शिल्लक राहतात. मागील काही वर्षात खादीला एक कोटी १८ लाख चार हजार २२० इतकी कमाई झाली आहे असं देखील मागचा आकडा आहे.

कोरोनाच्या संकटातून आता आपण हळूहळू वर येत आहोत. हळूहळू उद्योग व्यवसाय देखील पुन्हा नव्याने सुरुवात करतायेत. तशाच पद्धतीने खादी उदयॊग देखील वाढीस यावा यासाठी तसेच  खादीला वाचवण्यासाठी आता  राज्यातील प्रत्येक नागरिकांनी एक ड्रेस खादीचा घ्यावा, जेणेकरून या उद्योगाला चालना मिळेल. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.