पंजाबातले गटतट मोडून कॅप्टन यांना मुख्यमंत्री करण्यात सातव यांचा सिंहाचा वाटा होता..
सध्या पंजाबच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आधी सत्ताधारी काँग्रेसमध्येचं नवज्योत सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात कुरबुर सुरु होती. त्यांनतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी डायरेक्ट राजीनामा दिला. त्यानंतर चरणजीत सिंह चन्नी हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून समोर आहे. आणि आता सिद्धूनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. या सगळ्याचं प्रकारामुळे पंजाब काँग्रेसची भांडण चव्हाट्यावर आलीये.
तस पाहायचं झालं तर हे प्रकरण येत्या आगामी निवडणुकांमुळे सुरु आहे. नाहीतर गेले कित्येक वर्ष काँग्रेसची पंजाबमध्ये व्यवस्थित घडी बसली होती. कॅप्टनच्या नेतृत्वात नाही म्हंटल तरी सगळं सुरळीत सुरु होत.
पण तुम्हाला माहितेय पंजाबमध्ये काँग्रेसची हीच घडी एका महाराष्ट्रीयन माणसं बसवली होती. तो माणूस म्हणजे राजीव सातव.
आता राजकारणात कौटुंबिक वारसदारांनी यादी काही नवीन नाही. त्यातलंच एक नाव म्हणजे राजीव सातव. राज्य मंत्री रजनीताई सातव यांचे पुत्र . पुण्यातील महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून राज्य किंवा केंद्रीय सेवेत जाण्याचा प्रयत्न चालवला होता. पण दोन हजार साल उजाडताच ते नव्या वळणावर आले. पुणे सोडून त्यांनी कळमनुरी येथे स्थायिक होण्याचा निर्णय घ्यावा लागला.
राजीव रूढ अर्थाने रजनीताईंचे राजकीय वारसदार आहेत पण दिल्ली पर्यंतचा यशस्वी पल्ला गाठण्यासाठी त्यांनी स्वतःची भक्कम राजकीय पायाभरणी केली.
काय मंत्र्याच्या मुलाने थेट आमदारकीची निवडणूक लढवावी अशी प्रथा असलेल्या त्या काळात राजीव यांनी राजकारणात पहिले पाऊल टाकताना व सोड गटातून पंचायत समितीची निवडणूक लढविण्याचा निर्णय स्वतःच्या पातळीवर घेतला.
आधी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेत येताच थेट सभापतीची संधी, दोन वर्षांनी महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश आणि त्यानंतर लोकसभा. गल्ली ते दिल्ली असं या वाटचालीला म्हणता येईल.
कळमनुरी सारख्या मागास दुर्लक्षित तालुक्यातील हिंगोली जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करत असताना आणि याच माध्यमातून सभापतीपद सांभाळत असताना तरुण नेत्याला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची त्यावेळी एका नव्या प्रयोगात पाहण्याचा संधी मिळाली. हा प्रयोग काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या थेट नियंत्रणाखाली सुरू होता. तोवर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांची निवड त्यावेळेच्या प्रभावशाली नेते यांच्या शिफारसीने केली जात असे. पण राजीव सातव यांना या पदासाठी कार्पोरेट क्षेत्रात जशी मुलाखत घेतली जाते, तशी मुलाखत द्यावी लागली. राहुल गांधी व त्यांच्या चमूने जवळपास सव्वाशे जणांमधून राजीव सातव यांचे नाव नक्की केलं होतं.
अंतिम मुलाखतीत राहुल यांनी त्यांना तुम्हाला कोणता नेता आवडतो असा प्रश्न विचारला होता, त्यावर राजीव सातव यांचे उत्तर होते, शरद पवार. यावर त्यांनी खुलासाही केला कि, पवार यांची कार्यशैली, त्यांचा लोकसंग्रह, प्रत्येक काम वेळेवर करण्याविषयी त्यांची दक्षता या गोष्टींनी त्यांना प्रभावित केले आहे
२००८ मध्ये मुलाखतींचा सोपस्कार पूर्ण झाल्यावर तब्बल तीन महिन्यानंतर राजीव यांच्या निवडीची आणि नियुक्तीची घोषणा झाली. तेव्हापासून त्यांना राहुल यांच्या निकटच्या वर्तुळात प्रवेश मिळाला. प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी ओबीसी प्रवर्गातील मराठवाड्याच्या होतकरू तरुणाला संधी मिळाली.
जमिनीवर पाय ठेवून काम करणाऱ्यांमध्ये राजीव सातव यांची गिनती होते. २००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सातव यांनी वेगवेगळ्या मतदारसंघात युवकांना संधी देण्याचा आग्रह दिला. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाला त्यांच्यासोबतच निलेश पारवेरकर, यशोमती ठाकूर, प्रशांत ठाकूर असे तरुण आमदार मिळाले.
त्याच्या या कामामुळे राहुल गांधी यांचा त्याच्यावरचा विश्वास दृढ होत गेला आणि पुढे २००९ च्या अखेरीस त्यांच्या नावाचा विषारी अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुरु झाला. तेव्हा देशभरातले १० कार्यकर्ते या स्पर्धेत होते. पण राजीव यांच्या प्रदेश पातळीवरील कार्याची नोंद घेत शेवटी पक्षाने त्याने त्यांच्यावर ही नवी मोठी जबाबदारी सोपवली. २०१० च्या मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांची अधिकृत नियुक्ती झाली आणि तेथून ३६ वर्षाच्या एका महाराष्ट्रीय युवकाला काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात पदार्पण करण्याची संधी मिळाली.
राजीव सातव यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. प्रत्येक राज्याचा दौरा करताना तिथली आवश्यक ती राजकीय माहिती, संदर्भ या बाबतीत स्वतःला अद्ययावत केले. त्यांनी पाच वर्षे ही जबाबदारी सांभाळली. यानंतर २०१४ च्या लोकसभा निवणुकीत ते हिंगोली मतदारसंघातून विजयी झाले. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघत असताना नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि हिंगोलीत राजीव स्तव या दोघांनीच काँग्रेस पक्षाची लाज राखली होती.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या इतर कोणत्याही नेत्यांपेक्षा कार्यबाहुल्याच्या बाबतीत व्यग्र असलेले तरुण नेते म्ह्णून राजीव सातवयांचेच नाव येईल. हे पाहताच पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर गुजरातमधील विधानसभा निवणुकीची महत्वाची जबाबदारी सोपवली होती.
त्याआधी पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार निवड समितीचे ते एक सदस्य होते. एकाबाजूला अकाली दल- भाजप युती, दुसऱ्या बाजूला केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने निर्माण केलेली हवा या सगळ्यात पंजाबमध्ये सत्ता परिवर्तन घडवण्यासाठी सक्षम आणि निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार देण्याची जबाबदारी या समितीवर होती.
हि जबाबदारी सातव आणि त्यांच्या बाकी दोन सदस्यांनी समर्थपणे सांभाळली. या निवडणुकीत काँग्रेसला ११७ पैकी ७७ जागा मिळाल्या.
पंजाब राज्याच्या इतिहासात काँग्रेसला पहिल्यांदाच एवढे घवघवीत यश मिळाले असेल. अँटी इंकम्बन्सीच फाईल काँग्रेसने तिथे उठवला. त्यावेळीच मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या विरोधात त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जाणीवपूर्वक उभे करण्याचा प्रयोग सातव यांचाचं. कारण कॅप्टन अमरिंदर सिंग आणि अकाली दलाचे चांगले संबंध होते आणि त्यामुळे कॅप्टन फुटतील अशी कुरबुर तिथं होती. आणि जेव्हा अमरिंदर सिंग मुख्यमंत्री झाले तेव्हा सगळ्या चर्चाना पूर्णविराम मिळाला.
हे ही वाचं भिडू :
- जसे सोनिया गांधींसाठी अहमद पटेल त्याप्रमाणे राहुल गांधींसाठी राजीव सातव महत्वाचे होते..
- मुंडेंच्या मृत्यूनंतरची पोटनिवडणूक रजनी पाटलांच्या पतींमुळे बिनविरोध होऊ शकली नाही
- पंजाबमध्ये धर्माच्या आधारावर जिल्हा,काय आहे यामागचे राजकारण