गुजरातला फाईट देऊन मराठवाड्याच्या केशर आंब्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली

मराठवाड्याची ओळख असलेला आणि आपल्या अवीट गोडीसाठी प्रसिद्ध असलेला केशर आंब्याची गोडी संपूर्ण महाराष्ट्राने चाखली आहे. 

मराठवाड्यात जवळपास वीस हजार हेक्‍टरवर केशर आंब्याच्या बागा आहेत. औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, बीड, जालना जिह्यात केशर आंब्याच्या बागांचा विस्तार आहे. अनेक शेतकरी केशरची निर्यात करतात. मराठवाड्याच्या या केशरने हक्काचे मार्केट काबीज केले असले तरी त्याचे अधिक दर्जेदार व जास्त उत्पादन व्हावे, केशरचा खास ब्रँड तयार व्हावा यासाठी एक सकारात्मक गोष्ट घडली आहे….

ती म्हणजे याच मराठवाड्याच्या केशर आंब्याला ‘जीआय’ मानांकन मिळालं आहे. आणि विशेष म्हणजे केशर आंब्याला ‘जीआय’ मानांकन मिळाल्याबद्दल पोस्ट ऑफिस ने स्पेशल कव्हर वर स्टॅम्प मुद्रा तयार केली आहे. ही गोष्ट मराठवाड्यासाठी मोठ्या भूषणाची आहे.

विशिष्ट खास चव, रंग आणि आकारामुळे या आंब्याची गोडी देशाबरोबरच विदेशातही लागली असून परदेशात देखील मोठ्या प्रमाणात निर्यात होत असतो. आता हा आंबा टपाल विभागाच्या विशेष लिफाफ्यावर म्हणजेच स्पेशल कव्हरवर झळकले आहे.

केसर आंब्याच्या जातीला त्याच्या विशिष्टतेसाठी भारत सरकारकडून ‘मराठवाडा केसर आंबा’ असा जीओ टॅग या केशर आंब्याला दिला आहे. आणि याचाच सन्मान करण्यासाठी आणि त्याला प्रसिद्धी मिळण्यासाठी भारतीय डाक विभागाने विशेष लिफाफा काढलाय आणि त्यावर या केशर आंबा झळकावला आहे. 

२००४ पर्यंत मराठवाड्याच्या औरंगाबाद तसेच बीड जिल्ह्यात केशरची मोठ्या प्रमाणात लागवड होत  होती.  त्या नंतर बदलत्या हवामानाच्या परिणामाबरोबरच दुष्काळाच्या झळांनी केशर आंबा लागवडीला ब्रेक लागला होता. लागवडीखालील क्षेत्र न वाढल्याने आणि सतत नैसर्गिक आपत्तीने केशरच्या बागा असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला, परिणामी संघाचा कार्यविस्तार थांबला होता.

पण आता मराठवाड्याच्या केसरला जीआय मानांकन मिळाल्याने याचा विस्तार वाढण्याची शक्यता आहे.

आत्ता यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केशर आंब्याला जीआय टॅग मिळाला तो एका व्यक्तीच्या पुढाकारामुळे ! ते म्हणजे ॲड. प्रा. गणेश हिंगमिरे हे होय. 

हिंगमिरे यांनी या केशर आंब्याला जीआय मानांकन मिळवून देण्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं,

आपल्या भारतातील जीआय मानांकन मिळालेले पदार्थाचे आपण सतत फॉलोअप घेत होतो, त्यांच्याशी आपला पत्रव्यवहार चालू होता.  २०१५-१६-१७ या काळात या पदार्थांचे रजिस्ट्रेशन झाले या दरम्यान आम्ही सतत केंद्र सरकार सोबत पत्रव्यवहार चालू ठेवला होता.

गेल्या तीन महिन्यांमध्ये घोलवड चिकू आणि मराठवाड्याचा केशर आंबा या दोन्ही गोष्टींना जीआय मानांकन मिळाले. तसेच भारत सरकारच्या पोस्ट ऑफिसला सांगितले कि, जीआय मानांकन मिळालेल्या पदार्थांना प्रसिद्ध करा आणि प्रमोट करा. थोडक्यात जी आय बाबत प्रमोशन करण्याबद्दल लोकांना अजूनही माहितीच नाही.

३० मे ला लंडनला आणि दुबईला हे दोन्ही पदार्थ एक्सपोर्ट झालेत.

या सर्व प्रक्रियेला जवळपास दोन दशके पूर्ण होत आहेत. सुरुवातीला या पदार्थांची ओळख पटवली गेली. त्या नंतर त्यांची नोंद केली आणि मग त्याला प्रमोशनसाठी समोर आणले. त्यातलाच एक भाग म्हणजे हे कव्हर पेज वरील केशर आंब्याची स्थान !

हा अट्टहास यासाठी कि,  तुम्ही सर्वसामान्य नागरिक आहात आणि तुमच्यासमोर हे पोस्टाचे कव्हर पेज आले तर तुम्हाला या मराठवाड्याच्या केशर आंबा बद्दल माहिती मिळेल आणि अशाप्रकारे भारतभर आणि विदेशात देखील केशर आंब्याची माहिती पोहोचेल.

केशर आंब्याच्या या नोंदी मध्ये  मराठवाड्यातले ८ जिल्हे घेतले होते आणि त्यामुळे त्या आठही जिल्ह्यांसाठी, “मराठवाड्याचा केशर आंबा” म्हणजे अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.

२०१३-१४ ला याबाबत अप्लिकेशन करणे सुरू केले. २०१७ ला ग्रॅण्ड मिळाले. २०१८ नंतर केंद्र सरकार सोबत अनेक बैठका झाल्या आणि मग त्यांच्या परवानगीनंतर या केशर आंब्याच्या गोष्टीला दिशा मिळाली. थोडक्यात या गोष्टीमुळे केशर आंब्याची ब्रँड व्हॅल्यू वाढणार आहे. लोकांना या आंब्याची महती कळणार आहे.

मराठवाड्याला थोडक्यात चांगले दिवस येणार आहेत कारण आंब्याच्या एक्सपोर्ट मुळे भारताला चांगला रेव्ह्यून्यू मिळणार आहे.

हिंगमिरे यांनी सांगितल्यानुसार, या केशर आंब्याच्या पाठपुरावा दरम्यान अनेक अडचणी आल्या होत्या, त्यापैकी एक म्हणजे गुजरात मधील गिर केशर म्हणून आंबा आहे. त्या आंब्याला त्याला जीआय मिळालं होतं. त्यामुळे मराठवाड्याचा केशर आंब्याला जी आय मानांकन मिळवताना हीच अडचणी आली.

केशर आंब्याचे पहिले प्रेझेन्टेशन दिल्लीत झालं तेव्हा सरकारने ते स्वीकारलं नव्हतं. त्यानंतर मुंबईला बोलवण्यात आलं तिथे देखील हे प्रेझेन्टेशन स्वीकारलं नाही आणि मग शेवटी गुजरात मधील गिर आंब्याचा आणि मराठवाड्याचा केशर आंब्याचा तुलनात्मक अहवाल दिला गेला. गुजरात गीर केशर आंब्याला गोडवा कमी आहे कारण तो समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात येतो आणि तुलनेने मराठवाड्याचा केशर आंब्याला गोडवा जास्त आहे.

गुजरात गीत केसर आंबा जरी वैशिष्ट्यपूर्ण असला तरी मराठवाड्याचा केशर आंबा तुलनेने वेगळा आहे.

हे मानांकन मिळण्यासाठी हिंगमिरे यांनी तब्बल तीन वर्ष लढाई लढली आहे.  दोन्ही केशर आंब्यातील फरक स्पष्ट करायला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागला. यामध्ये त्यांना मराठवाड्याच्या केशर आंब्याला अनेक जुने संदर्भ  मिळाले. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सक्रीय असलेल्या महानुभव पंथाच्या अनेक ग्रंथांमध्ये मराठवाड्याच्या केशर आंब्याचा संदर्भ मिळाले आणि त्या संदर्भांनी येथील केशर आंब्याचा इतिहास स्पष्ट करायला मोठी मदत झाली.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.