मार्च एंड येतोय…ही कामं पटकन आटपून घ्या

आता आपल्यापैकी अनेक जण शाळेत जायला लागलेत. जवळपास प्रत्येक घरात एक डिग्रीवला झाला आहे. पण एवढं शिकून आपल्यापैकी बरेच जण एका गोष्टीत अडाणी आहेत ते म्हणजे आर्थिक साक्षरता.  म्हणजे हेच बघा की इतक्या दिवस आपण मार्च एन्ड बद्दल ऐकत होतं.   नोकरी करणारे तसंच छोटे मोठे व्यावसायिक आणि उद्योजक हे मार्च एंडच्या गडबडीत असतात हे आपण बघत आलोच. पण ह्या मार्च एंडचा आपल्या वैयक्तिक आयुष्यात कसा फरक पडतो हे बघितला का. 

तर आता हेच की तुमच्या  ३१ मार्चची  चेकलिस्ट काय असली पाहिजे..

१. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही इन्वेस्ट करायला हवं.

कशासाठी तर, टॅक्स वाचवण्यासाठी. तुमचं इन्कम किती आहे हे कागदावर लिहायला हवं. आणि मग 80 c अन्डर अजून बचत करण्यासाठी किती इन्वेस्ट करावे लागतील ह्याचा अंदाज घ्यायला हवा. जर का तुम्ही ऑलरेडी प्रोव्हीडंट फंडमध्ये पैसे गुंतवत असाल किंवा नॅशनल पेन्शन स्कीम, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या ठिकाणी पैसे गुंतवत असाल तर तरी देखील ३१ मार्च पर्यंत कमीत कमी कॉन्ट्रीब्यूशन करा.

समजा तुमचं PPF अकाऊंट, तुमच्या नावावर/ मुलांच्या नावावर/ पार्टनरच्या नावावर असेल तर प्रत्येक वर्षी ते अकाऊंट निद्रिस्त होऊ नये म्हणून कमीत कमी ५०० रुपये तरी त्यावर भरत रहा. अकाऊंट जरी Dormant (निद्रिस्त) झालं तरी ते पुन्हा ऍक्टिव्ह नक्कीच करता येऊ शकतं परंतु त्यासाठीही तुम्हाला ५०० रुपये भरावे लागतात आणि त्यानंतर ते पुन्हा ऍक्टिव्ह करता येतं.  तसंच जर तुमचं NPS वर अकाऊंट असेल तर त्यावरही तुम्हाला दरवर्षी ५०० रुपये भरणं गरजेचं आहे.

२.  तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करून घ्या.

तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणं आता सरकारने अनिवार्य केलं आहे, आणि आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करण्याची डेडलाइन आहे ३१ मार्चची. जर तुम्ही ते लिंक केलं नाहीत तर तुमचं PAN कार्ड येणाऱ्या काळात निष्क्रिय म्हणजेच इनओपरेटीव्ह होण्याची शक्यता आहे. परिणामी जिथे जिथे पॅन कार्ड अनिवार्य आहे तिथे ते व्यवहार तुम्हाला करता येणार नाहीत.

३. तुमचं KYC बँकेकडे अपडेट करा.

KYC पूर्ण असायला हवं. KYC तुम्ही ३१ मार्च पर्यंत अपडेट करू शकता. KYC अपडेट करण्यासाठी तुम्हाला बँकेत तुमची रीसेंट इन्फॉर्मेशन अपडेट करावी लागेल. त्यात तुमचं पॅन कार्ड असेल तुमचं ऍड्रेस प्रूफ असू शकेल, हे सगळं बँकेत लवकरात लवकर सबमीट करा जेणेकरून तुमचं KYC अपडेट होईल.

४. सॅलरीचे डिटेल्स

आधी तुम्ही जिथे कामाला होतात ते सॅलरीचे डिटेल्स, तुम्ही आता जिथे कामाला आहात त्या ठिकाणी सबमीट करा. यामुळे काय होईल तर तुमचं प्रॉपर टॅक्स डिडक्शन होण्यास मदत होईल. जर तुम्ही हे टाळत असाल तर कदाचित तुम्हाला ITR फाइल करताना नुकसान सोसावं लागू शकतं.

५. तुमचे एक्स्पेंस प्रूफ सबमिट करा

पाचवा मुद्दा तो म्हणजे, तुमच्या एक्स्पेंस चे प्रूफ सबमिट करा. तुम्ही तुमचं संपूर्ण वर्षाचं पॅकेज जर बघितलं तर त्यामध्ये.. मग हे House Rent Allowance आणि New Travel Assistence वाले योग्य प्रूफ नसल्यास तुम्हाला यावरही टॅक्स द्यावा लागू शकतो. जर तुम्ही हे डॉक्युमेंट्स वेळेत जमा केले नाहीत आणि एक्स्ट्रा टॅक्स कट झाला तर तुम्ही या एक्स्ट्रा टॅक्ससाठी रिफंड क्लेम करू शकता.

६. ECS

सहावा मुद्दा आहे ECS विषयीचा. ECS ची आपण वेगवेगळ्या कारणांसाठी डेबिट फॅसिलिटी वापरत असतो. ECS आणि तुमचं वर्षभराचं बँक स्टेटमेंट क्रॉस चेक करत राहणं अत्यंत गरजेचं आहे.

७. ऍडव्हान्स टॅक्स फायलिंग .

ऍडव्हान्स टॅक्स फायलिंग संदर्भातला. Income Tax Law Of India नुसार जो व्यक्ति डिडक्शन झाल्यानंतर १०,००० हून अधिक टॅक्स भरणार असेल, तो १५ मार्चच्या आधी चार इंस्टॉलमेंट्स मध्ये  ऍडव्हान्स टॅक्स भरू शकतो.

आता हयात एक इंट्रेस्टिंग फॅक्ट अशी की, ३१ मार्च ला जरी तुम्ही advance tax भरला तरी तो advance tax च असतो. सीनियर सिटीझन्स जे बिझनेस करत नाहीत त्यांनी advance tax भरला नाही तरी चालतो.

जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पगार मिळतोय आणि तुमच्या पगारातून टॅक्स डिडक्ट होतोय तरी देखील तुम्हाला रेंटवर मिळणाऱ्या उत्पन्नावर, कॅपिटल gains वर advance टॅक्स भरावा लागेल त्याची व्यवस्थित माहिती घ्या.

८. इन्कम टॅक्स पेंडिंग आहे का नाही ते तपासा 

आठवा मुद्दा म्हणजे income tax पेंडिंग आहे का नाही ते चेक करा. झीरो इन्कम टॅक्स का होईना भरत रहा. यालाच Nil रिटर्न सुद्धा म्हणतात. Record साठी महत्वाचं. तुम्ही आजवर इन्कम टॅक्स भरत आला आहात, परंतु ह्यावर्षी Taxable Income च नाही, तरी सुद्धा Nil Return फाइल करा.

तर चेकलिस्टमधील ८ मुद्दे चेक करा आणि हि सगळी कामं आटपून घ्या..

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.