मर्द को दर्द होता हैं, अर्थात पुरुषांच #metoo

मागच्या वर्षी महाराष्ट्रात अवनी वाघिणीला पकडण्यासाठी जोरदार मोहिम चालू होती. डोक्यात आयड्या आली की ती जंगलात मांडायची असा सगळा कारभार. यात एकाच्या डोक्यात आलं आपण हनी ट्रॅप लावू. म्हणजे काय करायचं वाघाच्या मुत्राचे शिंतोडे पसरायचे. त्याच्या वासावर वाघीण येणार मग आण नेम धरायचां. ठरलं. पाहीजे त्या ठिकाणी वाघाचं मुत्र आणून शिंपडण्यात आलं. हनी ट्रॅप लावलां, वाघीण तिकडं फिरकलीच नाही. पण तिथ वाघ असता तर. एखादं कुत्र मांजर सापडावं तसा तो अलगत सापडला असता. 

माणूस असो का वाघ घावणार म्हणजे घावणार.. 

आत्ता विषय #metoo चा. तर सन्मानपुर्वक सांगतो #metoo महिलांकडून चालवली गेलेली सर्वात चांगली मोहिम आहे. निसंशय. पण असच काहीतरी पुरूषांकडून का होत नाही. काय पुरूषांना असले अनुभव येत नाहीत का? आणि आले तर त्याला सांगू वाटत नाही का ? आणि सांगितलं तरी कोण ऐकत नाही का ?

प्रश्न खूप आहेत. सगळ्यांची उत्तरे आजच शोधू की,

तसा आजचा दिवसही चांगलाच आहे कारण आज जागतिक पुरूष दिन आहे म्हणे !

तर सुरवात आमच्या गावापासून. खूप वर्षांपुर्वीची केस. गावातली एक सुशिक्षीत फॅमेली. पैसे पण पोटभर. पण पोराचं स्वत:च अस काहीच नव्हतं. त्यात त्याच्या समाजात मुली कमी आहेत असा एक ठराव होताच. शोधाशोध केली पण लग्न काय ठरत नव्हतं. मग काय केलं तर कर्नाटक गाठलं. एका मध्यस्थाच्या मदतीनं कर्नाटकातलं स्थळ जमलं. पोराकडचे म्हणाले, “फक्त पोरगी आणि नारळ”. बस्स. बाकीचं जे काय असेल ते आम्ही घालतो. 

दहा पंधरा तोळ घातलेली नववधु घरात आली. दूसरा दिवसं उजाडला तेव्हा अंगावरच दहा पंधरा तोळ आणि घरातलं पाच पन्नास तोळ गायब. सोबत नववधु देखील गायब. शोधाशोध झाली. पोरगी म्हणाली फसवणूक केली म्हणून मीच तक्रार करणार. घटस्फोट दे. पटत नाही वगैरे वगैरे. सगळं कस एका रात्रीत झालं… 

पोरगी तर गेलीच होती शिवाय ती घरची सदस्य झालेली होती. कायदेशीर तो दरोडा नव्हता. तीचच सोनं होतं. घटस्फोटापासून सगळे सोपस्कार झाले असतील पण पुढं पोराचं लग्न झालं नाही ते नाहीच… 

आत्ता #metoo चा आणि याचा काय संबध?, तर दरवेळी फक्त शारिरिक संबध म्हणून फसवणूक कशी होणार? शारिरिक सोबत मानसिक, आर्थिक, सामाजिक जे जे आहे ते सगळं #metoo मध्ये यायलाच पाहीजे.

लग्नात फसवणुक झालेले, प्रेमात फसवणुक झालेले, खोटे आरोप झाल्यानंतर मार खाल्लेले कित्येक जण #metoo चे शिकारचं आहेत. 

आठवतय का खूप वर्षांपुर्वी हरियाणातल्या दोन बहिणींनी एका मुलाला अश्लिल वर्तन केलं म्हणून फोकळला होता. सोशल मिडीयावर तो व्हिडीओ जोरदार गाजला होता. नंतर त्या मुलींनी अशाच गोष्टी खूप जणांबरोबर केल्या होत्या. त्यांच्याकडून पैसै उकळले होते वगैरे वगैरे बाहेर आलं. ते वाचलं असण्याची शक्यता तशी कमीचं. मुद्दा फक्त इतका राहतो की कुठल्या मुलीवर अतिप्रसंग होत असेल तर लगेच तिच्यावर संशय घेवू नये, मुद्दा फक्त इतकाच आहे त्या मुलाला, त्या पुरूषाला फक्त एकदा तरी विचाराव ? 

बाबा रे हे काय करतोयस.. नेमकां काय प्रकार झाला.. 

तीच फसगत प्रेमात देखील. घरातले तयार नसतील तेव्हा सैराट होतो. मुलाचे मित्र अशावेळी मुलाला काय विचारतात माहित आहे का ? पोरगी पलटणार नाही न. दरवेळी भावाला बंदुक दाखवणारी आर्चीच असेल अस काही नसतं. कित्येक प्रकरणांनी पोलिस स्टेशनामध्ये वेगळा डाव खेळलाय. पळून गेलेल्या जोडप्यापैकी कधी अस झालं नाही की मुलगा म्हणाला माझ्यावर जबरदस्ती झाली.

नेहमी मुलं मुलींना पळवून नेतात हे गृहितक असतं. जोडपं सापडलं की पोलिसांपुढे जबाब असतो. अचानक मुलगीचं स्टेटमेंट येत जबरदस्तीने घेवून गेला. झालं पोरावर डायरेक्ट ३७६ कलम लागतं. कायदेशीर भाषेत तो बलात्कार असतो…! 

जसे बलात्कार करणारे विकृत पुरूष आहेत तसेच अशाही केसेस मध्ये अडकलेले पुरूष आहेत.बरं दरवेळी गंभीर केस पाहीजे, ड्राम पाहीजे असच काही नसतं. दोन्हीकडून संमतीपत्र असणाऱ्या मुलांची देखील वाट लागते. 

त्याच खास उदाहरण म्हणजे विवेक ओबेरॉय. 

ना घरका ना घाटका ! हा प्रकार विवेकचा झाला. आत्ता संमती दोन्हीकडून होती म्हणा. पण आजपर्यन्त बिचाऱ्याबरोबर सलमान बोलत नाही. आत्ता गावातली पोरं आठवां. किती जणं एकमेकांसोबत अशाच प्रकरणामुळे बोलायचे बंद झाले असतील. राहता राहिला मुद्दा आर्थिक #metoo चा. तर त्यावर एकच उपाय गल्लीतल्या रिचार्ज वाल्याकडे जा आणि विचारा कुठला मुलगा किती रिचार्ज मारतो? आणि तो कुणाच्या मोबाईलवर.. चांगल असत वो ते फक्त सोडून गेलं की रिचार्जचे पैसे परत मागता येत नाहीत. 

टिप –  आज पुरूषदिन आहे. सोबत पुरूषदीन देखील आहेच. किमान आजच्या दिवशीतरी बोलून द्या वो ! 

हे ही वाचा – 

2 Comments
  1. Amrut says

    Khar ahe bhava .

Leave A Reply

Your email address will not be published.