मार्टिन ल्युथर किंग यांच्यासाठी कोका कोला कंपनीने दिलेला हा अभिमानास्पद लढा !

१९६४ मध्ये मार्टिन ल्युथर किंग यांना वयाच्या ३५ व्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. अटलांटा शहरातील या व्यक्तीचा सर्वोच्च सन्मान झाल्याच्या आनंदात त्यावेळचे महापौर इवान एलन एका कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा आणि त्यासाठी शहरातील काही प्रमुख श्रीमंत लोकांना आमंत्रित करण्याचा विचार केला.

पण, शहरातील या श्रीमंत लोकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास पसंती दर्शवली नाही. याला कारणीभूत होते ते त्यावेळी शहरात असणारी श्वेत आणि अश्वेत नागरिकांची संख्या. होय, श्वेत लोकांची संख्या जास्त असल्याने त्या लोकांना,

कोणत्यातरी अश्वेत नागरिकाच्या पुरस्कार सोहळ्याच्याआनंदात सहभागी होणे तुच्छतेचे आणि कमीपणाचे वाटत होते.

अमेरिकेच्या समाजात रंगभेद इतका फोफावला होत कि तिथल्या लोकांना जर्मन वैज्ञानिक अॅल्बर्ट आइन्स्टाइन यांना नागरिकता देणे अमेरिकेच्या लोकांना शक्य होते पण आपल्याच देशातील मार्टिन ल्युथर किंग यांचा मोठेपणा मान्य करनं शक्य नव्हते.

मार्टिन ल्युथर किंग यांच्यासाठी आयोजिक कार्यक्रम रद्द करावा लागणार या काळजीने महापौर इवान एलन यांनी कोका कोला कंपनीचे माजी अध्यक्ष रॉबर्ट वुडरूफ़ यांना परिस्थिती सांगितली. आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास इतर मोठ्या उद्योगपतींना विनंती करण्याची मागणी इवान एलन यांनी त्यांना केली.

कोका कोला ही कंपनी त्या काळातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जायची. रॉबर्ट वुडरूफ़ यांनी तेव्हा कंपनीचे सीईओ जेपॉल ऑस्टिन यांना एलन यांची मदत करण्यास सांगितले. ऑस्टिन मुळचे दक्षिण आफ्रिकेतील होते आणि त्यांनी वर्णभेद जवळून पहिला होता.

ऑस्टिन यांनी एका पत्रकार परिषदेत घोषणा केली की,

 एटलांटा शहर मार्टिन ल्युथर किंग यांचा सन्मान करू शकत नसेल तर आम्ही कोका कोला ही कंपनी जिला या शहराची ओळख म्हणूनही पाहिले जाते. त्या कोका कोला कंपनीला आम्ही दुसऱ्या शहरात स्थलांतरीत करू.

ऑस्टिन यांच्या या इशाऱ्यानंतर संपुर्ण शहराचा नूर पालटला. मार्टिन ल्युथर किंग यांच्या सन्मानाला असंख्य लोकांनी उपस्थिती दर्शवली. त्यावेळी गर्दी पाहून भारावलेले मार्टिन ल्युथर किंग म्हणाले होते की,

माझ्या शहराने केलेला हा सन्मान मला आयुष्यभर आठवणीत राहील.

आपण दुर्लक्ष करूनही मार्टिन ल्युथर किंग यांनी केलेले भाषण ऐकून अनेक लोक भारावले. त्यावेळी उपस्थित लोकांनी किंग यांच्यासाठी ‘वी शैल ओवरकम (हम होंगे कामयाब) हे गाणेही गायले.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.