त्यांनी फक्त सॅनिटरी पॅडचा शोध लावला नाही तर जगभरातल्या महिलांचं जगणं सोपं केलं..

मासिक पाळी हा असा विषय आहे. ज्यावर आजही खुलेआम बोलायचं म्हंटल कि, बरेच जण पन्नासवेळा विचार करतात.  मेडिकलमध्ये सॅनिटरी पॅड मागायचं गेलं तर दुकानदार काळ्या पिशवीत नाहीतर पेपरात गुंडाळून देतो. आता हि झाली शहरातली स्थिती देशातल्या दुर्गम भागात जाऊन पाहिलं तर आजही विटाळ म्हणून बायकांना बाजूला बसवलं जात.

हा आता सॅनिटरी पॅड आल्यापासून परिस्थती बऱ्याच प्रमाणात सुधारलीये. त्यात अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या “पॅडमॅन” चित्रपटातून मासिक पाळीत स्वच्छतेच्या संवेदनशील विषयावर जागरूकता पसरवली. यासोबतच अनेक शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंट्रीमधून या मासिक पाळी बद्दल जनजागृती केली गेलीये.

पण काही वर्षांपूर्वीची परिस्थती फार वेगळी होती. पॅडचा दूरदूरचा संबंध नव्हता. महिला या दिवसात साध्या सुती कापडाचा वापर करायच्या. त्यामुळे महिलांशी संबंधित आजार पसरायचे.  पण सॅनिटरी पॅडच्या शोधानंतर महिलांची या कापडापासून सुटका झाली आणि आज महिला आपल्या या खास दिवसातही बाहेर जाऊन काम करतायेत.

या सगळ्या गोष्टींचं श्रेय जातं मॅरी केनरला. मूळची अमेरिकेतली असणाऱ्या मॅरीने जगभरातल्या महिलांचं आयुष्य सुकर केलं पण आपला हा शोध जगापुढं आणण्यासाठी तिला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं.

तर, १७ मे १९१२ रोजी जन्मलेल्या मॅरीचे पूर्ण नाव मेरी बीट्रिस डेव्हिडसन केनर. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात तिचा जन्म झाला. फक्त मॅरीचं नाही तर तिचं सगळं कुटुंब संशोधनासाठी ओळखलं जातं.

असं म्हंटल जात कि, तिच्या वडिलांनी क्लोथिंग प्रेस बनवल्या होत्या, ज्या सुटकेसमध्ये व्यवस्थित फिट होतील, हा पण त्यांनी हा आपला शोध पूर्ण केला नाही.

सोबतच त्यांनी रेल्वे गाड्यांच्या वॉशरचं देखील पेटंट आणलं आणि रुग्णवाहिकांसाठी चाकांसह स्ट्रेचरचा शोध लावला. तसेच  तिच्या आजोबांनी ट्रेनच्या लाइट सिग्नलचा शोध लावल्याचं बोललं जात.

मॅरीने १९३१ मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर हॉवर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला पण पैशाअभावी तिचा अभ्यास पूर्ण होऊ शकला नाही.

मॅरीने सॅनिटरी बेल्टचा शोध लावला. हे बेल्ट मॉइश्चरायझर प्रूफ होते, जे ओलावा शोषून घ्यायचे. पण ३० वर्षांपर्यंत याचा वापर कोणीही केला नाही. कारण याचा शोध लावणारी मॅरी ही आफ्रिकन वंशाची होती.

मॅरीच्या या शोधाचे अनेकांनी कौतुक केले,  बऱ्याचं अमेरिकन कंपन्यांनी तिला चांगला प्रतिसादही दिला, पण ती कृष्णवर्णीय आहे, या एका कारणामुळे  तो नाकारला गेला.

पण तिच्या आयुष्यातील या आव्हानाने समाजात बदल घडवून आणण्याच्या तिच्या दृढ निश्चयाला चालना दिली. 

यानंतर, मेरीने स्वतः पैसे जोडायचं ठरवलं. तिचा फुलांचा व्यवसायही होता, ज्यातून चांगली कमाई होत होती. याच पैसातून तिने आपले पॅड बेल्ड बाजारात उतरवण्याचं ठरवलं.  

1957 मध्ये तिने आपल्या शोधासाठी पेटंट अर्ज केला. पण मोठ्या स्तरावर सगळं उभं करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. म्हणून तिने 1956 ते 1987 दरम्यान घरगुती आणि वैयक्तिक वस्तूंच्या निर्मितीसाठी एकूण पाच पेटंट दाखल केले आहेत. आणि आपला बेल्ट पॅड बाजारात उतरविला. 

लोकांमध्ये हा नवीन शोध पसरायला आणि त्याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी थोडा वेळ लागला. पण हळू-हळू का होईना तिनं आपला हा प्रयत्न यशस्वी करून दाखवला.

त्यानंतर तिने टॉयलेट पेपरचा शोध लावला, जो तिने बहिण मिल्ड्रेड डेव्हिडसनसोबत शेअर केला. एवढंच नाही ती पुढेही नवनवीन गोष्टी बाजारात उतरवू लागली. 

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.