आता महाराष्ट्राची मास्क मधून सुटका होणार वाटतंय….

गेले दोन वर्ष झालं अवघी दुनिया मास्कमध्ये वावरतेय. पहिल्या लाटेत लोकांनी कोरोना विषाणू ला घाबरून मास्क लावला तर दुसऱ्या-तिसऱ्या लाटेत मास्कच्या संबंधित असणाऱ्या निर्बंधांना आणि दंडाला घाबरून लोकांनी मास्क लावले….गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीचं संकट सर्व देशांवर आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मास्क घालणं बंधनकारक असल्याचं सरकारकडून सांगण्यात आले होते. पण आता बास्स्स म्हणत वैतागून काही लोकं बिना मास्क चे दिसतायेत…आता त्यांच्यावर कोणतीही कारवाई होईल असं तरी सद्याच्या एका बातमीवरून वाटतंय..

ती बातमी म्हणजे, मंत्रिमंडळ बैठकीत मास्क वापराचे निर्बंध दूर करण्याचा विषय निघाला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, त्या देशातील निर्णय राजकीय आहेत. आपण मात्र याविषयी शास्त्रीय चिकित्सा करून निर्णय घेणार आहोत. आपण टास्क फोर्ससोबत यावर चर्चा करू, त्यांचे मत जाणून आपण पुढे जाऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

बाहेरील देशांमध्ये मुखपट्टी वापराचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातही मास्कचे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. 

थोडक्यात घाईगडबडीने मास्क मुक्त महाराष्ट्र करण्यापेक्षा त्यावर शास्त्रीय चिकित्सा करून निर्णय घेऊन असं मुख्यमंत्री म्हणाले. 

या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा सूर पाहता राज्यातील मास्क वापराचे निर्बंध इतक्यात तरी दूर होण्याची शक्यता नाही, असंही म्हणलं जातंय. 

महाराष्ट्र किंव्हा भारत सोडला तर, हे हि बघणं महत्वाचं आहे कि,  जगातील अनेक देशांमध्ये मास्कचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, कोणते-कोणते देश आहेत ते बघूया…

ज्या देशांमध्ये वेगाने लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तिथली जनता मास्कच्या निर्बंधांतून मुक्त झाली आहे.  संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना मास्क न घालण्याची परवानगी देणारा इस्रायल  हा जगातील पहिला देश ठरला होता. इस्रायल देशाने अत्यंत वेगवान लसीकरण मोहीम राबवली आणि तेथील नागरिकांना   मास्कमुक्त केले पण कोरोनाची दुसरी लाट आली अन विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे,रुग्ण संख्या वाढू लागल्यानं तिथं पुन्हा मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याशिवाय इंग्लंड, अमेरिका, न्यूझीलंड, हंगेरी या देशांमध्ये देखील मास्कची सक्ती काढून टाकली आहे.

भूटानमध्ये अवघ्या २ आठवड्यात ९० टक्केहून अधिक लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालं. भूटान हा भारत, चीन यांच्या सीमेलगतचा देश असून सुद्धा, कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून या देशात केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या देशातही मास्क घालण्याची सक्ती नाही.

ओमीक्रॉन व्हेरिएंटमुळे इंग्लंडमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली होती. पण नंतर तेथील कोरोना परिस्थिती कंट्रोलमध्ये आल्यानंतर आता इथे सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क लावण्याची गरज नाही असं देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केले होते.  

 भारतात /महाराष्ट्रात मास्कवरचे निर्बंध खरंच काढले जातील का ?

इतर देशाप्रमाणे भारतात तसेच महाराष्ट्रातदेखील कोरोनाचे संक्रमण हळूहळू कमी होतांना दिसतेय. तिसरी लाट ज्या वेगाने सुरू झाली होती ती तितक्याच वेगाने आता कमी होत असल्याचं चित्र दिसतंय.आणि याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीतदेखील जगातील काही देशांनी मास्कवरील बंधनं हटवलं आहेत, त्याच पद्धतीने राज्यातल्या मास्कच्या निर्बंधांबाबत चर्चा झाली. 

संपूर्ण देशात लसीकरण मोहीम कशी वेगाने सुरू होईल याचे प्रयत्न केले जातायेत, तसेच राज्यात देखील वेगाने लसीकरण पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याची आकडेवारी बघायची झाली तर, राज्यात आतापर्यंत १४ कोटी ६९ लाख ५७ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. यात ६ कोटी ३ लाख १२ हजार २४० नागरिकांना दुसरा तर ८ कोटी ५९ लाख १७ हजार ३७ नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. आता रुग्ण संख्या कमी होतेय, मृत्यूंची संख्या अगदीच कमी आहे, परिस्थिती जशी पहिल्या लाटेत होती तितकी गंभीर नाही.

या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन आपण एका महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, त्यामुळे राज्यातील जनतेचीही मास्कच्या वापरातून सुटका करण्याची चर्चा सुरू आहे.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भारतातही कोट्यवधी लोकांचे लसीकरण पूर्ण झालंय. अशावेळी कठोर निर्बंध आणि मास्कच्या बंधनातून काही देशांनी मुक्तता केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मास्कपासून सुटका होऊ शकते असा विचार सद्या तर चर्चेत आहे.

तसं तर भारतात ५ वर्षांखालील मुलांना मास्कची शिफारस करण्यात येत नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलंय. याशिवाय ६-११ वयोगटातील मुलं पालकांच्या थेट देखरेखीखाली सुरक्षित आणि योग्य पद्धतीनं मास्क वापरू शकतात. तसेच १२ वर्षांवरील  व्यक्तींनी मास्क घालावेत, असंही आरोग्य मंत्रालयानं गाइडलाईनमध्ये स्पष्ट केलं आहे. जेंव्हा ओमीक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन तज्ञांच्या गटाद्वारे या मार्गदर्शक सूचनेत बदल केले होते…आता परिस्थिती नियंत्रणात येतेय म्हणजे पुन्हा एकदा राज्यातील मार्गदर्शक सूचनेत बदल केले जातील, कदाचित मास्क फ्री राज्य केलं जाऊ शकते…

पण जो पर्यंत राज्याचा आणि आरोग्य मंत्रालयाच्या तशा सूचना येणार नाहीत तोपर्यंत कोणत्याही अफवांना बळी न पडता मास्क वापरणे बंद करू नका !

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.