आर्यन खानच्या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा राष्ट्रवादीचा निघाला ?

आर्यन खान प्रकरण जसं सुरु झालं तसं बातम्यांची सुरुवात हि आर्यन खान च्या ड्रग्स प्रकरणामधल्या नव्या नव्या ट्विस्टने होतेय…रोज नवाब मलिक पत्रकार परिषद घेणार आणि नवा बॉम्ब टाकणार. आता काय बॉम्ब आणि फटाके फक्त मलिकच वाजवतील का..तर यात आता आणखी एका व्यक्ती ची भर पडली ती व्यक्ती म्हणजे भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज होय…!

मोहित कंबोज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणाची वेगळी बाजू मांडून एकच खळबळ उडवून दिलीये.

शनिवारी मुंबईतील पत्रकारपरिषद घेत त्यांनी काही खुलासे केलेत,  तर मग मोहित कंबोज यांनी आज काय बॉम्ब टाकलाय बघूया…तर त्यांचं असं म्हणन आहे कि, आर्यन खानसह क्रुझवरील इतर लोकांना एनसिबीच्या जाळ्यात अडकवण्यामागे मास्टरमाईंड आहे तो म्हणजे सुनील पाटील नावाचा व्यक्ती ज्याने यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे.  तुम्ही म्हणाल असेल कुणी तरी हा सुनील पाटील पण नाही त्यांचे बरेच मोठे कनेक्शन असल्याची माहिती सामोर आली आता ती कितपत खरी आणि कितपत खोटी ते स्वतः सुनील पाटील सांगतील..

आर्यन खान प्रकरणात याच सुनील पाटीलने महत्त्वाची भूमिका बजावली असं सांगितलं जातंय…

दुसरा ट्विस्ट म्हणजे… 

मोहित कंबोज यांच्या मते हा सुनील पाटील राष्ट्रवादी चा माणूस आहे, तसेच तो  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पूत्र ऋषिकेश देशमुख यांच्या जवळचा मित्र आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या मंत्र्यांशीही सुनील पाटीलचे जवळचे संबंध आहेत, असा दावा कंबोज यांनी केला.  

त्यांनी त्या दिवशीचा घटनाक्रम सांगितलाय कि, १ ऑक्टोबरला सुनील पाटीलने सॅम डिसोझाला फोन केला होता. मुंबईत क्रुझ पार्टी होणार आहे आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्या २७ लोकांची यादी  माझ्याकडे आहे असं सुनील पाटीलने सॅम डिसोझाला सांगितलं होतं. तसेच मला एनसीबीच्या अधिकाऱ्याशी बोलायचे आहे, असेही सुनील पाटीलने सांगितले. सॅम डिसोझाने सुनील पाटीलचा एनसीबीचे अधिकारी व्ही.व्ही. सिंग यांच्याशी संपर्क साधून देण्याचे मान्य केले.

त्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तुमच्याकडे कोणती माहिती आहे, अशी विचारणा केली. तेव्हा सुनील पाटील याने त्याचा सहकारी के.पी. गोसावी याच्याकडे क्रुझ पार्टीशी संबंधित माहिती असल्याचे सांगितले. पाटीलने सॅमला गोसावीचा नंबरही पाठवला आणि किरण गोसावीच सर्व कारवाई करणार असल्याचं सांगितलं. 

तर याचा अर्थ असाय कि, हा सगळा कट सुनील पाटील यानेच रचला होता. सुनील पाटील हा महाराष्ट्रातील कोणत्या मंत्र्याच्या इशाऱ्यावर हे सगळे काम करत होता, असा सवाल मोहित कंबोज यांनी उपस्थित केलाय.

कोण आहे हा सुनील पाटील ?

सुनील पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून ते मुळचे धुळ्याचे असल्याचं सांगण्यात येतंय. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचा कार्यकर्ता आहे. म्हणजेच गेली २० वर्ष झालं त्यांचा आणि राष्ट्रवादीचा सबंद आहे असं मोहित कंबोज यांनी सांगितलं. तसेच त्यांनी याचाही दावा केलाय ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे मित्र आहेत. 

इतकंच नाही तर अनिल देशमुखांच्या ईडी प्रकरणातही पाटीलचं नाव आहे, असा दावा देखील त्यांनी केला आहे. 

सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होते असा आरोप देखील केला जातोय.  दिल्लीत बसून सुनील पाटील  बदल्यांचं रॅकेट चालवत असतात. त्या बदल्यांमधून मिळालेला पैसा ते त्यांच्या जवळच्या  मंत्र्यांना द्यायचे. मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्यांच्या पार्ट्या चालत असतात. महाराष्ट्रभर त्यांचं हे बदल्यांचं रॅकेट पसरलं होतं. पण जसं सरकार बदललं तसं ते गायब झाले.  त्यांचं सरकार आलं कि ते पुन्हा सक्रिय झाले असं मोहित कंबोज यांनी स्पष्ट केलंय. 

हे ही वाच भिडू:

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.