या संत एक ‘हग’ देऊन डिप्रेशन घालवतात म्हणे !

भारत आध्यात्मिक भूमी आहे. आणि आपल्या याच भूमीला संत महात्म्यांची एक दीर्घ परंपरा आहे. राग, लोभ, मोह, मत्सर, काम, मद या अध्यात्मशास्त्रातल्या षड्रिपूंवर जो विजय मिळवतो तो संत होतो. या संतानी सांगितलेल्या गोष्टींचं आचरण श्रद्धाळू भाविक करतात. आणि आपलं जीवन सुखी करतात.

अशाच एक अलीकडच्या काळातल्या हगिंग संत आहेत माता अमृतानंदमयी.. 

आता तुम्ही म्हणाल हे कसलं नाव आणि हगिंग संत. तर माता अमृतानंदमयी दक्षिणेतल्या खूप मोठ्या फेमस संत आहेत. त्या लोकांना गळाभेट देतात म्हणून त्यांना हगिंग संत म्हंटल जात.

अशा या विलक्षण असणाऱ्या आणि दक्षिणेच्या संत अम्मा यांची विशेष अशी गोष्ट..

तर केरळ राज्यातल्या कोल्लम जिल्ह्यात एक आश्रम आहे. जिथं जगभरातून खूप सारे लोक व्हिजीट करत असतात. कारण काय तर, इथं म्हणे अध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मक विचार मिळतात, आणि ते कसं तर वर तुम्ही वाचल्या प्रमाणे हग करून म्हणजेच गळा भेट देऊन, आलिंगन देऊन.

या आश्रमाच्या सर्वेसर्वा आहेत माता अमृतानंदमयी. साऊथ मध्ये माताजींना अम्मा म्हणायची पद्धतच आहे म्हणून त्या सगळ्यांच्या लाडक्या अम्मा आहेत.

(आलिंगन थोडा अवघड शब्द वाटतोय म्हणून आपण हग या शब्दचाच वापर करू.)

या अम्मा हग देऊन खूप निराळ्या अंदाजात त्यांच्या भाविकांना दर्शन देतात. आता हे आलिंगन म्हणे त्या करकचून देतात. आणि कानात काहीतरी खुसपुसतात. कधी कधी एखाद्या भाविकावर त्यांना जास्तच प्रेम आलं तर त्या प्रेमान त्याच्या डोक्याचं चुंबन घेतात.

एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार अम्माने आजवर ३ करोड लोकांना हग केलंय. आता हग देऊन घेऊन काय होत ? तर अम्मांचे भाविक म्हणतात, अम्मानी हग दिलं की आमच्या मनात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा येते. आमचे सगळे प्रॉब्लेम्स संपतात, कदाचित अम्मा ते प्रॉब्लेम्स स्वतः कडे घेत असाव्यात.

पण या हग देणाऱ्या अम्मांचा प्रवास काही सोप्पा नव्हता. 

तर १९५३ मध्ये भारतातल्या केरळ राज्यात अमृतानंदमयी अम्मांचा जन्म सुधामनी नावाने झाला होता. त्यांचा घरचा मासे विक्रीचा व्यवसाय होता. लहानपणी अम्मांना या व्यवसायात मदत करण्यासाठी शाळा सोडावी लागली. सहा भावंडांमध्ये अम्मा तिसऱ्या नंबरवर होत्या. अत्यंत कनवाळू अशा हृदयाच्या अम्मांच्या आयुष्यात जेव्हा त्या सात आठ वर्षांच्या असतील तेव्हा एक प्रसंग घडला,

त्यांनी आपल्या शेजारच्या गरीब कुटुंबाला गाय आणि बकरीला टाकलेल्या पाल्याचा उपयोग जेवणासाठी करताना पाहिलं. त्यावेळी अम्मांना बघून दुःख झालं आणि त्यांनी ठरवलं कि आपण आपलं संपूर्ण आयुष्य लोकांना आनंद देण्यात घालवायचं. आणि तेव्हाच त्यांना दिव्य अनुभूती प्राप्त झाली.

पण अम्मांच्या घरच्यांना अम्माजींचं वागणं पटत नव्हतं. त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. पण त्या बधल्या नाहीत त्यांनी घर सोडून आपला अध्यात्माचं मार्ग स्वीकारला. त्यानंतर त्यांनी अमृतानंदमयी मिशन ट्रस्टची स्थापना केली. त्यांचे पाहिले शिष्य होते स्वामी अमृत स्वरूपानंद. या दोघांनी मिळून अमृतपुरी नावाचा एक मठ स्थापन केला. पुढं इथं बरेच भाविक येऊ लागले. त्यांची इंजायटी एक हगने निघून जाऊ लागली.

पुढं या ‘हग’ आश्रमाचा बोलबाला झाला. 

या हग देणाऱ्या मठाचा पुढं जगात बोलबाला होऊ लागला. काही परदेशी फिल्म निर्माते या आश्रमाला व्हिजिट करू लागले. अशाच एका जॉन कोनेंन या निर्मात्याने अम्मांवर २००५ सालात दर्शन ‘द एम्ब्रेस’ नावाची फिल्म बनवली. आणि विशेष म्हणजे ही फिल्म कान फिल्म फेस्टीवल मध्ये सुद्धा दाखवण्यात आली. अशात आपले भारतीय दिग्दर्शक मागे का राहतील ? म्हणून बॉलिवूडचा फेमस डायरेक्टर शेखर कपूरने अम्मांवर २०१६ ला एक डॉक्युमेंटरी बनवली होती. या डॉक्युमेंटरीच नाव होतं सायन्स ऑफ कॅम्पॅशन.

अशा या अम्मा खूप दानशूर असल्याने बऱ्याचदा कॉंट्रोव्हर्सी मध्ये सुद्धा अडकल्या होत्या. 

तर अम्मांच्या आश्रमाने कोरोनाच्या काळात आतापर्यंत पीएम केअर फंड मध्ये १० करोड दान केलेत, तर केरळच्या चीफ मिनिस्टर डिस्ट्रेस रिलीफ फंडात ३ करोड दान केले आहेत. यावर बऱ्याच लोकांनी प्रश्न उपस्थित केले.

श्रीनी पट्टाथनम यांच्या पुस्तकात अम्मांविषयी एक दावा करण्यात आला आहे तो म्हणजे, माता अमृतानंदमयी जे चमत्कार जगाला करून दाखवतात ते सगळे फेक आहेत. एवढाच काय तर  २००२ मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) यांच्या मालकिच्या ‘देशभिमानी’ या मल्याळम वृत्तपत्रात अमृतानंदमयी यांच्या विषयी काही दावे करण्यात आले होते.

त्यात म्हंटल होत की, मृत्यूला लक्ष करणारी ध्यानधारणा खोटी आहे. अमृतानंदमयी लोकांना आपल्या भूलथापांना बळी पाडत असल्याने त्यांच्यावर चौकशी लावण्याची मागणी करण्यात आली होती.तर २००७ मध्ये शांतनु गुहा रे यांनी तेहलका वीकली मध्ये अमृतानंदमयी यांच्याविषयी लिहिलं होत कि, त्यांच्या ट्रस्टचा वर्षाचा टर्नओव्हर करोड़ोंच्या घरात आहे.

म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपातून अम्मा पण काय सुटल्या नाहीत. 

आता तुम्ही जर कोरोना काळात अम्माकडून हग घ्यायला जाणार असाल तर थांबा, या कोरोना काळात एंझायटी हाय पिचवर आहे, आणि अशात अम्माच एक हग तुमच्यासाठी खतरनाक ठरू शकत.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.