म्हणून उभ्या महाराष्ट्राने कापरेकर गुरूजींची माफी मागायला हवी. 

कापरेकर कॉन्संट 

तुम्ही कुठलीही चार अंकी संख्या गृहीत धरा, समजा आपण ४६३७ ही संख्या गृहीत धरू, आता या संख्येतील आकडे एकदा असे मांडा की, संख्या शक्य तितकी मोठी होईल व एकदा असे मांडा की संख्या शक्य तितकी लहान होईल. म्हणजे मोठी संख्या होईल ७६४३ आणि लहान संख्या ३४६७.

आता लहान संख्या मोठ्या संख्येतून वजा करा, तुम्हाला मिळेल ४१६७, आता ही संख्या (४१६७) कापरेकर पद्धतीने मांडून पुन्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा.

(७६४१ – १४६७)

तुम्हाला मिळेल ६१४७ अर्थात कापरेकर कॉन्स्टंट.

तुम्ही जगातली कुठलीही चार अंकी संख्या घेऊन हा प्रयोग करू शकता, त्यांचे उत्तर हे एकतर शून्य येईल किंवा कापरेकर कॉन्स्टंट ६१४७.

हे काम कुणाच आहे माहिती आहे का. नाशिकजवळच्या देवळाली येथे असणाऱ्या शाळा मास्तरच.

अहं त्यांना भेटायला जावं. त्यांच्याबद्दल माहिती करुन घ्यावी म्हणून गुगल पासून देवळाली पर्यन्तजरी तुम्ही गेलात तर तुमच्या हाती फक्त शुन्य मिळेल. तोच शुन्य जो आर्यभट्टने जगाला दिला. भारताने जगाला शून्य दिला याच कौतुक होतं पण महाराष्ट्राच्या मातीने जागतिक पातळीवर पोहचलेल्या कापरेकर गुरूजींना कौतुकाऐवजी फक्त शुन्य दिला हे देखील आपण सांगायला हवं. 

गणितज्ञ म्हणल्यानंतर मोठमोठ्या पदव्या घेतलेला एक हुशार माणूस. जो सुटाबुटात येणार आणि आकडेमोड मांडणार. सो कॉल्ड गणितज्ञांच्या भाषेत कापरेकर गुरूजी यापैकी कशातच मोडणारे नव्हते. डहाणूच्या जवळ एका कारकुनाच्या घरी जन्मलेला एक साधा मुलगा म्हणजे कापरेकर गुरूजी.

त्यांचा जन्म १७ जानेवारी १९०५ चा. पुर्ण नाव दत्तात्रय रामचंद्र कापरेकर. त्यांच्या वडिलांना ज्योतिषविद्येचा नाद होता. त्यातूनच वडिलांकडून त्यांनी आकडेमोड शिकून घेतली होती. आकडेमोडीची आवड निर्माण झाली. कापरेकर गुरूजी पुढे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आले. तिथे त्यांनी रॅग्लर परांजपे अवॉर्ड मिळवला. गणितामध्ये सर्वोत्कृष्ट समजला जाणारा हा पुरस्कार. बी.एस्सी झाली आणि कापरेकर गुरूजी.

नाशिक जवळच्या देवळाली येथे शाळा मास्तर म्हणून रुजू झाले. तिथेच ते आयुष्याच्या शेवटपर्यन्त राहिले. 

कापरेकर गुरूजी काय करायचे तर मोठमोठ्ठे प्रबंध सादर करायचे. त्यांचे काही प्रबंध गणिताच्या जर्नल्समध्ये प्रकाशित झाले. काही छापले गेले नाहीत. पण हार न मानता ते आपले प्रबंध स्वत: छापून घ्यायचे आणि नाशिकच्या विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वाटायचे. गणितासारखाच गणितज्ञ देखील अवघड असावा असा नियम होता. पण कापरेकर साधे होते. त्यांच्या साधेपणामुळे उच्चभ्रूमध्ये त्यांच्या वाट्याला नेहमी अवहेलना येत गेली. 

आज नंबर थियरी म्हणून ओळखली जाते तिचा मुलभूत शोध लावण्याच काम कापरेकर गुरूजींच.  आज त्यांच्या लेखांची गणितज्ञ पारायणे घालत असतात. काहीजणांनी त्यांच्या शोधावर Phd देखील मिळवली. पण कापरेकर गुरूजींच्या वाट्याला यापैकी काहीच आलं नाही. कारण हे सर्व झालं ते त्यांच्या मृत्यूनंतर. 

१९५३ साली स्क्रिप्टा मॅथेमॅटिका या जर्नलमध्ये त्यांचा शोधनिबंध प्रकाशित झाला होता. मार्टिन गार्डनर या प्रसिद्ध गणिततज्ञाने त्यांच्यावर सायटिंफिक अमेरिकन या जागतिक किर्तीच्या विज्ञान मासिकात लेख लिहला होता.

अशी त्यांच्यी किर्ती. त्यांना गणितानंद ही उपाधी देखील देण्यात आली होती. कापरेकर कॉन्सन्ट प्रमाणेच असंख्य शोधांचे जनक म्हणून त्यांच नाव घेतलं जातं. 

अजून एक उदाहरण घेऊन बघू,

संख्या ३७४३

७४३३ – ३३४७ = ८६४०

८६४० – ०४६८ = ८१७२

८७२१ – १२७८ = ७४४३

७४४३ – ३४४७ = ३९९६

९९६३ – ३६९९ = ६२६४

६६४२ – २४६६ = ४१७६

७६४१ – १४६७ = ६१७४

या पद्धतीचा कुठल्याही उदाहरणात कमीत कमी ७ पाय-यांत कापरेकर कॉन्स्टंट येतोच येतो.

कापरेकर नंबर्स म्हणजे काय ? 

हा अशा संख्यांचा समूह आहे ज्यांचा वर्ग केल्यास येणारी संख्यांची बेरीज ही मूळ संख्येइतकी येते, उदाहरण म्हणून ४५ घेऊ, ४५ चा वर्ग येतो २०२५ आणि २०+२५ होतात ४५. अजून एक उदाहरण घेऊ ९ या संख्येचे. ९ चा वर्ग येतो ८१, आणि ८ अधिक १ होतात ९ तसेच ५५ आणि ९९ हे सुद्धा कापरेकर नंबर्स आहेत.

आत्ता मुळ मुद्दा कापरेकर गुरूजींच काय झालं. 

उतारवयात पेन्शनदेखील न मिळाल्याने त्यांना शिकवण्या सुरू कराव्या लागल्या. शिकवण्या घेत घेतच ते गेले. ते कोण होते ते देखील आपणाला कधी कळालं नाही. म्हणूनच म्हणतो उभ्या महाराष्ट्राने किमान एकदा का होईना कापरेकर गुरूजींची क्षमा मागायला हवी. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.