‘निपाह व्हायरस’ पासून वाचण्यासाठी कुराण वाचा…!!!

 

सध्या केरळमध्ये निपाह व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे. आतापर्यंत जवळपास १६ जणांचे बळी या व्हायरसने घेतले असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील हाय अलर्ट घोषित केलेला आहे. वैद्यकीय तज्ञांना अद्यापपर्यंत तरी या  व्हायरसवर उपाय शोधण्यात यश आलेलं नाही. असं असताना केरळमधील कोझिकोडे येथील सुन्नी नेते नजर फैजी कुदाथयी यांनी मात्र आपल्या अनुयायांना निपाह व्हायरस पासून वाचण्यासाठी कुराण वाचण्याचा अजब-गजब सल्ला दिला आहे. व्हॉटसअँप वरील ऑडीओ मेसेजच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अनुयायांना हा सल्ला दिला आहे.

अध्यात्मिक उपायांच्या आधारे निपाह व्हायरसचा सामना यशस्वीरीत्या केल्या जाऊ शकतो, असा दावा नजर यांनी केला आहे. मुस्लीम धर्मियांनी जर कुराणमधील ३६ व्या अध्यायातील ‘सुराह अल यासीन’ या आयातचे पठन केले आणि शेख अब्दुल कादिर जिलानी यांच्या नावाचा जप १००० वेळा केला तर निपाह व्हायरस पासून संरक्षण होऊ शकतं, असं ते आपल्या मेसेजमध्ये म्हणतात. आपल्या सल्ल्याच्या समर्थनार्थ एक उदाहरण देताना ते सांगतात की दशकभरापूर्वी मलप्पुरममध्ये साथीच्या रोगाचा प्रसार झाला होता, त्यावेळी याच पद्धतीने या रोगाचा सामना करण्यात आला होता.

मल्याळी लोक कोणत्याही आजारांपासून वाचण्यासाठी ‘मनकूस मौलीद’ प्रार्थनेचं पठन करतात.  या प्रार्थनेचं पठन सामूहिकरीत्या करण्यात यावं आणि वैद्यकीय उपचार सुरु असताना देखील त्यात खंड पडू देऊ नये, असंही ते आपल्या सल्ल्यात सांगतात. दरम्यान दुसरीकडे सलाफी विचारधारा मानणाऱ्या मुस्लीम लोकांनी मात्र नजर यांच्या या  सल्ल्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. ही प्रार्थना गैरइस्लामी असल्याचा दावा सलाफी समुदायाने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.