एमआयएम, आप नंतर आता मायावतींवर भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप होतोय
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्याला साजेशी अशीच या निवडणुकीची तयारी होती. आता वरकरणी जरी समाजवादी पार्टी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मेन फाइट दिसत असली तरी आमचाच मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाचं सुद्धा म्हणणं आहे. आता यातही प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय फक्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांनीच घेतलाय.
मायावती तर या फ्रेम मध्ये कुठे दिसतच नाहीत. किंबहुना मायावती भाजपची बी टीम म्हणून काम करत असल्याचं उत्तरप्रदेशातले राजकीय तज्ञ म्हणतं आहेत. पण ते कसं ?
एक तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख पक्षांचे जाहीरनामे आले मात्र मायावती यांनी त्यांच्या बसपा पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार नाही अशी भूमिका घेतली. याबाबत मायावती सांगतात की, त्यांचा पक्ष इतर राजकीय पक्षांप्रमाणे निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करत नाही कारण त्यांचा ‘मोठे दावे करण्यापेक्षा सत्तेत आल्यावर कृती करण्यावर’ जास्त विश्वास आहे.
दुसरं म्हणजे पश्चिम युपी मध्ये मायावतींनी भाजपसाठी अनुकूल अशी भूमिका घेतल्याचं दिसलं.
आता विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाची टक्केवारी बघता शेतकरी आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम झाल्याचं स्पष्ट दिसतंय. मागच्या वेळी पश्चिम पट्ट्यात 58 पैकी 53 जागा जिंकलेल्या भाजपच्या खात्यातील संख्या इथं यंदा कमी होणार असं दिसत. गेल्या निवडणुकीत भाजपला मुजफ्फरनगरमधील 2013 च्या दंगलीचा फायदा उठवत ध्रुवीकरण करण्याचा शक्य झालं होतं. त्यावेळी जाट शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या पट्ट्यात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण झाली.
यावेळी मात्र शेतकरी आंदोलनामुळे शेतकऱ्यांनी मुस्लिम यांच्यातील पारंपारिक युती पूर्ववत झाली. त्यामुळं तिथं हिंदुत्वाचा मुद्दा रेटून मतदारांना मारून टाकण्याची भाजपची खेळी चालणार नव्हती.
आता या सगळ्या पार्श्वभूमीवर असं म्हटलं जातंय की मायावती भाजपच्या बी टीम म्हणून काम करतात. आता ते कसं ?
तर मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष मागच्या निवडणुकीत महत्त्वाचा घटक होता. यावेळी मात्र पश्चिम पट्ट्यात त्यांची पिछेहाट झालेली दिसते. यावेळी मायावतींनी स्वतःला प्रचारापासून हेतूपुरस्पर दूर ठेवलं. त्या भाजपची बी टीम बनण्याची भूमिका पार पडत असल्याचं उत्तर प्रदेश मधले बरेच राजकीय तज्ञ सांगतात. या पट्ट्यात मायावतींच्या बसपने अनेक मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवले. यामागे मुस्लिम मतांमध्ये फूट पडावी आणि अर्थातच त्याचा भाजपला फायदा व्हावा असा डाव असल्याचे मानलं जाताय.
पण याआधी सुद्धा भाजपला मदत करण्याची उघड भूमिका मायावतींनी घेतली होती …
म्हणजे ऑक्टोबर २०२० मध्ये मायावतींनी प्रसंगी भाजपला मतदान करु पण सपाची खोड जिरवू असं विधान केलं होत. पण त्याआधी लोकसभा निवडणुकीत मोदींचं आव्हान रोखण्यासाठी मायावती अखिलेश यादवांसोबत युती करणार होत्या.
त्याच झालं असं होत कि जेव्हा अखिलेश यादव आणि मायावती लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आले तेव्हा बुआ-बबुआची ही जोडी काय कमाल करेल अशी चर्चा सुरु झाली होती. पण मोदींच्या लाटेत या जोडीचं पानिपत झालं आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच या दोघांमध्ये चांगलंच बिनसलं. ज्या भाजपला रोखण्यासाठी त्यांनी आपलं शत्रुत्व मागे ठेवलं होतं. त्याच भाजपबद्दल मायावतींची भाषा पूर्ण बदलली.
मायावतींनी भाजपला मदत करु असं म्हटल्यावर त्यावर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनीही निशाणा साधला होता. मायावती सतत भाजपलाच मदत होईल अशा गोष्टी करत असतात यावर हे शिक्कामोर्तब असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमधून सुचवलं होत.
हे हि वाच भिडू
- मायावतींचा पक्ष जाहीरनामाच प्रसिद्ध करत नाही कारण यांचा पॅटर्नच वेगळाय
- चीनला टक्कर देण्यासाठी सरकारने सैनिकांना दिलेली हि खतरनाक रायफल अशी आहे
- पुण्याच्या प्रभात फिल्मला टक्कर देण्यासाठी कोल्हापुरात जयप्रभा स्टुडिओ उभा राहिला