अश्वत्थामा प्रमाणेच MDH वाले बाबा अमर आहेत या विश्वासाला २०२० ने तडा दिलाय..

सकाळ सकाळी आमच्या मास्तरांनी फोन केला आणि म्हणाले ते MDH वाले बाबा गेले, बघा त्यांच्यावर काय स्टोरी करता का. माझा पहिला प्रश्न होता चेक करा खोटं असेल. झालेलं अस की काही वर्षांपूर्वी देखील अशीच बातमी आलेली.

लोकसत्ताने MDH वाले बाबा गेले म्हणून बातमी लावली. त्यानंतर रात्रीच्या दरम्यान MDH वाले बाबा गेल्याची बातमी खोटी होती म्हणून दूसरी बातमी त्यांनीच लावली. त्यानंतर रविवारच्या अंकात सोशल मिडीया अफवा पसरवते म्हणून तिसरी बातमी देखील त्यांनीच लावली.

अशा सगळा कारभार असताना कुणाचा विश्वास बसणाराय…

अजूनही वाटतय ही फेक न्यूज असेल. नाही म्हणायला आज्याचं वय ९८ वर्ष. ९८ वर्ष वय असणारा माणूस गेला असं सांगितलं तर सहज पटू शकतं पण इथं तो चान्स नाही. महाभारतातला अश्वत्थामा आणि इकडं MDH वाले बाबा दोघंही अमरपट्टा घेवून आलेत यावर आमचा दांडगा विश्वास होता.

अगदी परवाचं म्हणलं, कोरोना काळात देखील आजोबा टिकून राहिलेत. यांच्यावर एक स्टोरी केली पाहीजे. टायगर जिंदा हे म्हणून..

पण २०२० वर्ष हे सपशेल गंडलेलं वर्ष आहे, त्याने टायगरला पण सोडलं नाही. खरच MDH वाले बाबा गेले म्हणे… 

भारतीय मसाला उद्योग क्षेत्रातील आद्य आजोबा म्हणून त्यांना ओळखलं जायचं. त्यांच्या कंपनीचे ब्रँड अंबेसेडर तेच होते. त्यांच्याच नावावर MDH खपायचं.

MDH चा अर्थ महाशयन दि हट्टी.

धर्मपाल गुलाटी यांनी MDH कंपनीची स्थापना १९५३ साली दिल्लीतल्या चांदणी चौकात भाड्याने गाळा घेवून केली.  पुढं १९५९ साली अजून किर्ती नगरमध्ये मोठ्ठी जागा घेतली आणि बिझनेस वाढवलां.

पण इतकी सोप्पी ही गोष्ट नव्हती. आजोबांचा जन्म झालेला तो सियालकोटला. थोडक्यात आजोबा पाकिस्तानी. फाळणीनंतर ते भारतात आहे. आत्ता कामाधंद्यासाठी काहीतर करायचं म्हणून त्यांनी कधी गोळ्या बिस्किट विकली तर कधी टांगा चालवला.

अमृतसरला स्थानिक झालेल्या गुलाटीच्या वडिलांनीच त्यांना दिल्लीचा रस्ता दाखवला.

दिल्लीत आल्यानंतर या माणसाने पहिले काही दिवस टांगा चालवला. पुढे तो भावाला चालवायला दिला. नंतर किमान आठ दहा वेगवेगळे व्यवसाय केले. काहीच जमत नाही म्हणून मरायच्या अगोदर एखादी मसाल्याची कंपनी तर काढू या विचाराने या माणसाने मसाल्याची कंपनी काढली. तिचच नाव MDH.

शेवटचा ट्राय म्हणून सुरू केलेल्या MDH कपंनीचा टर्नओव्हर किती माहितेय?

हे का सांगाव लागत कारण पुढच्याकडे कित्ती पैसा आहे यात आपल्याला खरा इंटरेस्ट असतोय. असला पण पाहीजे. तर १५०० रुपयात सुरू झालेला व्यवसाय (हे त्या काळातले १५०० रुपये आहेत) आत्ता कोटींच्या घरात आहे. चार लाख फक्त घावून विक्रेत आहेत. १५ वेगवेगळ्या मसाल्यांच्या कंपन्या आहेत आणि ६० च्या वरती वेगवेगळ्या देशात त्यांचे प्रॉडक्ट विकले जातात.

भारत स्वतंत्र झाला तेव्हा गुलाटी महाशय २५ वर्षांचे होते. थोडक्यात काय तर ऐन तारुण्यात त्यांनी नेहरूंना लाल किल्यावर झेंडा फडकवताना बघितल.

पन्नास वर्षाचे असताना त्यांनी बांग्लादेश तयार होताना बघितला. साठीत त्यांनी इंदिरा गांधीची हत्या अनुभवली.  राजीव गांधींचे कॉम्प्युटर, वाजपेयींची पोखरण चाचणी, मनमोहन काळातले घोटाळे एवढंच काय तर मोदींची नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक, एयर स्ट्राईक हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर घडत गेलं.

भारताच्या सगळ्या पंतप्रधानां बघण्याचं अजब गजब काम त्यांच्या नावावर आहेच की.

मागच्या वर्षी त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हा गडी थाटात राष्ट्रीपती भवनात गेला आणि आपल्या पायावर उभं राहून पुरस्कार स्वीकारला.

D1w7 kVUgAA1tUe

तसं बघायला गेलं तर त्यांच्या मृत्यूच्या अफवा अधूनमधून येतच राहायच्या.

मागच्या वर्षी तर चक्क लोकसत्ता, टाईम्स सगळ्यांनी धूमधडाक्यात बातमी लावली मालक गेले. अरे गेल्या तीन पिढ्या ज्या माणसाला आम्ही म्हाताऱ्या अवस्थेत बघतोय तो माणूस कसा जावू शकतो असच सगळ्यांना वाटलं.

तेव्हा मालक भजन गातं नाचत होते. खरं सांगतो नव्वदीतला टायगर जेव्हा भजन गात नाचत होता तेव्हा फ्यूजा उडल्या होत्या. आपल्या मृत्यूच्या बातमी त्याने रितसर कोल्ल होतं. कोरोना सारखं संकट येऊन सुद्धा गुलाटी आजोबा खंबीर होते, अजून आठ दहा पंतप्रधान बघायचं आहे याचा विश्वास देत होते. पण कोरोना नाही पण हार्ट अटॅकने त्यांना गाठलं.

आणि यावेळी दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूची बातमी खरी ठरली.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.