हे आहेत तुळशीचे औषधी गुणधर्म

तुळस कुणाच्या घरात नाही असं घर कदाचित सापडणार नाही. सकाळच्या पूजेपासून ते थेट तुळशीच्या लग्नापर्यंत आपल्याकडे तुळशीला खूप महत्व आहे. आताच्या जगात आपल्याला ऑक्सिजन कमी पडायला लागलं म्हणून देखील आपण तुळशीची बग तयार करतो. तिला आता आधुनिक नाव देण्यात आल आहे ते म्हणजे ऑक्सिजन पार्क”. पण या व्यतिरिक्त देखील तुळस खूपच महत्वाची आहे. तुळशीच हे महत्व आपल्याला कळाल्यानंतर आपल मेडिकलला जाण कायमच बंद होऊ शकत.

दमा, अस्थमा असल्यास तुळशीचा रस खडीसाखर घालून घेतल्यास उपयोग होतो. त्यात थोडी मिरी पावडर, लवंग पावडर आणि अडुळसा घातल्यास उत्तम. खडी साखरेऐवजी मधातून घेतल्यास कफ विकारात अतिशय चांगला उपयोग होतो. भूक लागत नसल्यास चार चमचे तुळशीचा रस थोडी खडीसाखर घालून घेतल्यास भूक लागते. पोटात दुखत असल्यास तुळशीच्या रसात थोडा लिंबाचा रस घालून घेतल्यास पोटदुखी थांबते. तुळशीची पाने वाळवून त्याची पावडर करून सर्दीने डोके दुखत असल्यास तपकिरीप्रमाणे ओढल्यास डोकेदुखी थांबते.

ज्यांना जेनेटिक विकार आहेत म्हणजे ज्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक काही बदल होऊन विकार झाले आहेत त्यांना कपाळावर तुळशीच्या खोडाचा गंध लावल्याने फायदा होतो.

वेंकटेश्वरा विद्यापीठ आणि इतर काही संशोधकांच्या अभ्यासानुसार तुलस हीच एक वनस्पति अशी आहे की जी “ओझोन” बाहेर टाकते. सध्या होत असलेल्या ग्रीन हाउस इफेक्ट नुसार पृथ्वीवर आलेल्या सूर्य प्रकाशातील थर्मल इन्फ्रारेड किरण भयानक प्रदूषणामुळे जास्त प्रमाणात धरून ठेवले गेल्याने पृथ्वीचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि त्यामुळे बर्फ़ाच्छादित पर्वतावरील बर्फ वितळून हे पाणी समुद्रात मिसळून समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आणि फ्रीज सारख्या उपकरणांमुळे अर्थात त्यात वापरल्या गेलेल्या CFC सारख्या रसायनांमुळे वातावरणाच्या वरील ओझोनचा थरही विरळ होत चालला आहे.

आपण अंगावर जे बॉडीस्प्रे मारतो त्यामुळे शरीराभोवतीचा ओझोन कमी होतो. या सर्वांवर बिन खर्चिक आणि सोपा उपाय म्हणजे तुळस लावणे.

तुळशीला सकाळी माय भगिनी पाण्याचे अर्घ्य देऊन नमस्कार करून प्रदक्षिणा करतात. त्यामुळे पाण्यातून परावर्तीत झालेल्या सूर्यप्रकाशातील ७ रंग त्या स्त्रीच्या शरीरावर पडून तिला त्याचा फायदा होतो.

तुळशीतून उडणारे यलो ओईल हे हवा शुद्धही करते आणि डासांना पळवून सुद्धा लावते. तुळस ही कफ विकारावर अत्यंत उपयोगी आहे. शिवाय सौंदर्यवर्धक सुद्धा आहे.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.