कसाबला फाशी देणार हे मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पतीला देखील कळू दिलं नव्हतं.
आपल्या महारष्ट्रात असे अनेक IAS, IPS ऑफिसर आहेत ज्यांच्याकडे पाहून आजही अभिमान वाटतो. त्यांनी केलेल्या कामगिरीचा आणि धाडसाची आठवण नेहेमीच काढली जाते. त्यातल्याच एक म्हणजे IPS अधिकारी मीरा बोरवणकर होय.
लेडी सुपरकॉप अशी ओळख असलेल्या मीरा बोरवणकर या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस पोलीस अधिकारी होत्या. यांनी महाराष्ट्राची पहिली महिला पोलीस आयुक्त बनून त्यांनी इतिहास रचला होता.
संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना लेडी सुपरकॉप म्हणून ओळखलं जातं.
IPS ऑफिसर मीरा बोरवणकर या २०१७ मधेच रिटायर्ड झाल्या आहेत. पण त्यांच्या कारकीर्द अजूनही आठवणीत आहे. मीरा बोरवणकर या मूळच्या पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील आहेत. त्यांचे वडील ओ. पी. चड्ढा बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स (BSF) मध्ये होते. तर त्यांचे पती अभय बोरवणकर रिटायर्ड IAS आहेत.
त्या IPS बनल्यानंतर त्यांची पोस्टिंग महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरात झाली ज्यात मुंबईतील त्यांची पोस्टिंग खूप महत्वाची ठरली, मुंबईतील अंडरवर्ल्डमधील गुंडाराज संपविण्यासाठी त्यांचा रोल महत्त्वाचा राहिला आहे. महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस पोलीस अधिकारी असण्याच्या रेकॉर्ड व्यतिरिक्त आणखी एक विक्रम म्हणजे मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख झाल्या तेव्हा हे पद मिळवणाऱ्या त्या पहिला महिला अधिकारी होत्या.
१९८१ मध्ये त्या आयपीएस परीक्षा पार करून मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागात त्या डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर त्यांची गाठ तिथल्या उच्चभ्रू वर्गातील संघटीत गुन्हेगारीशी पडली. तसेच त्यांनी अंडरवर्ल्ड दुनियेवर कठोर कारवाई केली.
तसेच त्यांनी मोस्ट वॉंटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या आणि छोटा राजनच्या अनेक गुंडांना जेलमध्ये पाठवले होते.
दहशतवाद्यांना फाशीची साक्ष देणाऱ्या भारतातील एकमेव महिला आयपीएस अधिकारी बोरवणकर यांच्या ३६ वर्षांच्या कारकीर्दीतील दोन सर्वात आव्हानात्मक आणि वादग्रस्त प्रकरण म्हणजे २०१२ मध्ये अजमल कसाबची फाशी आणि २०१५ मध्ये याकूब मेमनला देण्यात आलेली फाशीची शिक्षा.
अजमल कसाब ज्या जेलमध्ये होता आणि त्याला फाशी दिली तेंव्हा त्या जेलच्या त्या महासंचालक होत्या.
हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला फाशीवर चढवताना तेथे आयपीएस मीरा चढ्ढा-बोरवणकर हजर होत्या. त्याबद्दल त्या एका मुलाखतीमध्ये सांगतात कि, मुंबई हल्ल्यात आपण आपले शूर अधिकारी गमावलेत, त्यामुळे पोलिस कर्मचारी तर प्रचंड रागात होते. ते कसाबला मारून टाकू इच्छित होते. पण कसाब मार्फत पाकिस्तानचे अनेक कट समोर येणार होते, त्यामुळे सर्वांनी समजूतदारपणा दाखवला.
कसाब मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आयटीबीपीच्या ताब्यात होता जेव्हा त्याला फाशीसाठी पुण्यात स्थानांतरित करण्याची गरज होती. त्याला एस्कॉर्ट करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाला निवडले होते. वाटेत त्याच्यावर हल्ला होऊ शकतो अशी भीती होती कारण काही शत्रुराष्ट्रांना २६/११ च्या ऑपरेशनची योजना बाहेर येऊ नये असे वाटत होते. महामार्ग पोलिसांना सतर्क करण्यात आले की रात्री व्हीआयपी सेक्युरिटी असणार आहे. त्यानंतर कसाब ला पुण्यात आणले गेले. कसाबला एका दिवसासाठी येरवडा येथे ठेवण्यात आले होते, ज्यामुळे माहिती लीक झाल्यामुळे तणाव आणखी वाढला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एका प्रसारमाध्यमाला कसाबच्या मुंबईतून बदली झाल्याची माहिती मिळाली आणि त्याने राकेश मारिया (माजी मुंबई पोलीस आयुक्त) आणि आर आर पाटील सरांशी संपर्क साधला होता, पण माध्यमांना हे माहिती नव्हती कि, कसाब ला फाशी देण्यात येणार आहे.
कसाबला फाशी देताना तुमच्या मनात काय विचार होते? असे त्यांना विचारलं असता ते म्हणाले कि, मला काही खूप मोठेपणा वेगेरे वाटत नव्हता. एखाद्याला फासावर लटकावणे ही अत्यंत क्लिष्ट कायदेशीर प्रक्रिया असते. ही प्रक्रिया तुम्हाला, तुमच्या टीमला पिळवटून टाकते. आणि माझ्यासाठी कसाब हा दहशतवादविरोधी आपल्या कमकुवत तयारीचा प्रतिक होता.
मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पतीला देखील हि गोष्ट कळू दिली नव्हती.
याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितले कि, अजमल कसाबच्या प्रकरणात सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे कसाबच्या फाशीबाबत गुप्तता पाळणे. माजी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील सर याबद्दल खूप ठाम होते. अजमल कसाबच्या फाशीमध्ये गुप्तता प्रायोरिटी होती. त्यामुळे मी माझ्या नवऱ्याला सुद्धा माहित होऊ दिलं नाही कि मी कसाब ला ठेवण्यात आलेल्या जेलची संचालक आहे, ते आयएएस- प्रशासकीय अधिकारी असून देखील त्यांना मी फाशी देण्याची गोष्ट देखील शेअर केली नव्हती. कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी मी माझा मोबाईल बंद केला होता. माझ्या नवऱ्याला, मुलांना काय घडत आहे याची कल्पना नव्हती”.
याकूब मेमन प्रकरणात फारशी गुप्तता पळाली गेली नाही तेंव्हाच्या घडामोडी संपूर्ण देश पाहत होता”.
तसेच मुंबईच्या जेलमध्ये याकूब मेमनला फाशी दिली त्यावेळी मीरा बोरवणकर तिथेच होत्या.
मुंबईच्या जेलमध्ये पाकिस्तानी दहशतवादी याकूब मेमनला फासावर लटकावले होते त्यावेळी मीरा बोरवणकर तिथेच उपस्थित होत्या. तेंव्हा त्या महाराष्ट्र राज्याच्या एडीजीपी (जेल)-ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस होत्या.
त्यांच्या अशाच अनेक उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत १९९७ मध्ये त्यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले. मीरा चढ्ढा-बोरवणकर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावरून २०१७ मध्ये निवृत्त झाल्या.
हे हि वाच भिडू :
- ९/११ चा दहशतवादी हल्ला संपूर्ण जगाच्या राजकारणाची दिशा बदलून गेला.
- समीर कालिया दहशतवादी असेल असं त्याच्या शेजाऱ्यांना देखील कधी वाटलं नाही..
For your information Mr.Abhay Borwankar is not retired IAS. He resigned from the service in the year 1987. Take the proper information and then write the article
Yakub meman ko nagpur me fashi hui.. Mumbai me nahi..