मेहुल चोक्सीला किडनॅप करण्यात रॉच्या एजंटचा सहभाग होता का ?

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरा व्यापारी मेहुल चोकसी याने असा आरोप केला आहे की त्याच्या अपहरणात भारतीय गुप्तचर यंत्रणा म्हणजेच रॉचा सहभाग होता.

त्याने इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत चोक्सीने असा आरोप केला आहे की, रॉ च्या दोन एजंट्स म्हणजेच रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंगच्या दोन एजंटांनी अँटिगा येथून त्यांचे अपहरण केले होते. मुलाखती दरम्यान चोक्सीने गुरमीतसिंग आणि गुरजित भंडाल या दोन व्यक्तींची छायाचित्रेही ओळखली आहेत.

ते दोघेही रॉचे एजंट असल्याचा दावा चोक्सी यांनी केला. चोक्सीने बारबरा जाराबिकाचीही ओळख पटविली आहे, ज्यांच्या घरातून चोक्सीचे अपहरण केले गेले होते.

मुलाखतीदरम्यान मेहुल चोक्सीने दावा केला,

“मला असे वाटते की ज्यांनी मला किडनॅप केलं ते गुरमीतसिंग आणि गुरजित भंडाल हे दोन व्यक्ती रॉ चे एजंट होते. जेंव्हा मी डोमिनिकाला आलो, तेव्हा मी या रॉ एजंट्सबद्दल ऐकले होते. मला तेंव्हा हे हि लक्षात आले की ते याच बेटावर आणि इतर देशामध्ये उपस्थित आहेत. ज्यांनी माझे अपहरण केले ते स्वतःच म्हणाले की ते रॉचे एजंट आहेत. मला अपहरण केल्यावर मला मारहाण देखील केली. ”

मेहुल चोक्सीने पुढे असंही सांगितले की २३ मे रोजी तो बारबराच्या घरी गेला होता. त्याला आणि बारबराला डिनरला  जायचं होतं. बारबराने चोक्सीला घरात बोलावले. तो घराच्या आत पोहोचला आणि सोफ्यावर बसला होता तेवढ्यात तिथे काही लोकं घराच्या आत शिरले. आणि चोक्सीचे दोन्ही हात-पाय पकडून ठेवले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासूनच चोक्सीने त्याच्या अपहरणाच्या अनेक अफवा ऐकत असल्याचा दावाही चोक्सीने केला आहे. त्याला वारंवार असं सांगण्यात यायचं कि,अपहरण करण्यासाठी एक  विमान येणार आहे. त्याच्यावर नजर ठेवली जात आहे आणि त्याला कधीही ठार मारले जाईल.

“जेव्हा भारताने कोविडची लस अँटिगाला पाठविली होती तेव्हा लोकांनी मला सांगितले की ही लस मला  भारतात परत पाठविण्याच्या बदल्यात दिली गेली आहे. मलाही तसाच वाटलं “

मोदींच्या लसीच्या राजकारणामुळे मेहुल चोक्सी भारताच्या ताब्यात येणार?

मेहुल चोक्सिला २६ मे रोजी डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावर अँटिगा आणि बार्बुडा येथून बेकायदेशीरपणे डोमिनिका प्रवेश केल्याचा आरोप देखील होता. भारतातून पळून गेल्यानंतर, चोक्सी २०१८च्या जानेवारी पासून अँटिगा आणि बार्बुडा येथे वास्तव्यास होता.

पण चोक्सिच्या प्रकरणात एक ट्विस्ट हा आहे कि,

आला जेव्हा चोक्सी याने अँटिगा पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अँटिगाचा नागरिक असूनही त्याचे अपहरण करून डोमिनिका येथे नेण्यात आले होते. मेहुलच्या अपहरणात सामील झालेल्या चार जणांच्या ओळखीचा दावाही चोक्सीच्या लीगल टीमने  केला आहे.

बारबरा जाराबिका, गुरमीतसिंग, गुरजितसिंग आणि गुरदीप बाथ अशी या चौघांची नावे आहेत.

मेहुल चोक्सी याच्यावर पंजाब नॅशनल बँकेची १३,५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याचा पुतण्या नीरव मोदीही आरोपी आहे. २०१८ मध्ये चोकसी भारतातून पळाला होता. तेव्हापासून तो अँटिगामध्ये राहत होता. त्याने तेथील नागरिकत्व विकत घेतले होते. नुकतेच त्याने  डोमिनिका गाठले होते.

चोक्सी डॉमिनिकामध्ये पकडला गेला तेव्हा अँटिगा मधून तो क्युबाला पळून जात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्याने माझ अपहरण केले आहे म्हणून आरोप केला आहे. त्याच्या शरीरावर जखमांच्या निशाण देखील आहेत.  काही काळ तुरूंगात काढल्यानंतर आता डॉमिनिकाच्या कोर्टाने  त्याला वैद्यकीय कारणावरून जामीन मंजूर केला आहे. तो पुन्हा अँटिगाला पोहोचला आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.