काही वेळातच विमान क्रॅश होवू शकत हे माहित असूनही वाजपेयी झोपून राहिले कारण.

अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व. त्यांच्या या व्यक्तिमत्वामुळेच भारतीय राजकारणात ते एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले होते. त्यामुळेच विरोधी पक्षांमध्ये देखील त्यांच्याविषयी आदराची भावना बघायला मिळत असे.

भारतीय राजकारणातला शेवटचा सर्वात प्रभावी वक्ता असं जर अटलजीविषयी म्हंटलं तर ते वावगं ठरत नाही. कमालीची उत्स्फूर्तता हा अटलजींना लाभलेला गुण. या गुणामुळेच ते जेव्हा विरोधकांवर टीका करायचे त्यावेळी लोकांसहित विरोधक देखील ती टीका तितक्याच सहजतेने स्वीकारायचे. जितकी त्यांची भाषणे दमदार होती तितकेच ते हजरजबाबी म्हणून देखील प्रसिद्ध होते.

त्यांच्या हजरजबाबीपणाचा असाच एक किस्सा !

अटल बिहारी वाजपेयींच्या हजरजबाबीपणाचा असाच एक किस्सा जो वरिष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी आपल्या ‘हार नहीं मानूंगा’ पुस्तकात लिहलाय.

अटल बिहारी वाजपेयींची सभा हिमाचल प्रदेशात नियोजित करण्यात आली होती. निवडणुकांचा हंगाम होता आणि प्रचारसभेसाठी अटलबिहारी संबोधित करणार होते.

हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे जाण्यासाठी एका छोट्या विमानातून हा प्रवास सुरू झाला. त्या वेळी वाजपेयी याच्यासोबत वरिष्ठ पत्रकार आणि राज्यसभेचे माजी खासदार बलबीर पुंज देखील होते. विमानाने धर्मशाळेच्या दिशेने उड्डाण घेतलं. काही काळातच वाजपेयी विमानातच झोपून गेले.

प्रवासादरम्यान अचानक को पायलट पाठीमागे आला आणि बलभीर पूंज यांना विचारू लागला की, आपण यापुर्वी कधी धर्मशाळेला आला आहात का? आपण आकाशातून धर्मशाळा ओळखू शकता का?

पायलटने असा प्रश्न करताच पुंज म्हणाले,

“तुम्ही अस का विचारत आहात”?

तेव्हा को पायलट म्हणाला,

आमचा ट्रॅफिक कंट्रोल सोबतचा  संबंध तुटला आहे. विमानात धर्मशाळेचा नकाशा आहे मात्र तो खूप जूना आहे. त्यामुळे खाली दिसणारी जागा ही धर्मशाळेचीच आहे का याची माहिती मिळत नाही. इमर्जेन्सी लॅण्डिंग करायला लागणार असून आम्हाला खालचं ठिकाण धर्मशाळाच आहे याची माहिती हवी आहे.

इतक्यात वाजपेयी जागे झाले, त्यांनी पुंज यांना काय झालं विचारताच त्यांनी वाजपेयींना पुर्ण परस्थिती सांगितली आणि म्हणाले, तुम्ही धर्मशाळा ओळखू शकाल का ?

यावर वाजपेयी म्हणाले,

“अगर जागतें हुए क्रैश होगा तो बहुत तकलीफ होंगी इसलिए फिरसें सो जाता हूं, सोतें वक्त मरनां चाहूंगा, कम दर्द होंगा !!!

असे म्हणून अशा अवस्थेत देखील वाजपेयी निवांतपणे झोपून गेले.

आज अटलबिहारी वाजपेयी आपल्यात नाहीत. साक्षात मृत्यू समोर असताना आपल्यासारख्या माणसांनी काय केलं असत आणि वाजपेयींनी काय केलं याचा हा किस्सा वाचला की लक्षात येत वाजपेयी नावाचं रसायन काहीतरी औरचं होतं !

आओ फिर से दिया जलाएँ, भरी दुपहरी में अंधियारा.

सूरज परछाई से हारा, अंतरतम का नेह निचोड़ें.

बुझी हुई बाती सुलगाएँ, आओ फिर से दिया जलाएँ.

हम पड़ाव को समझे मंज़िल, लक्ष्य हुआ आंखों से ओझल.

वतर्मान के मोहजाल में, आने वाला कल न भुलाएँ.

आओ फिर से दिया जलाएँ

  • अटलबिहारी वाजपेयी.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.