एक दिवसाचा वकील.

आबा माझे लॉ चे क्लासमेट. मी तासगावचा असल्याने आमच्यात जवळीक निर्माण झाली. त्या वेळी ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोदमधून त्यांनी सावळज जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते कॉंग्रेस उमेदवाराचा पराभव करुन निवडून आले. वकृत्व स्पर्धेतून पुढे आलेल्या आबांनी जिल्हा परिषदेतही चळवळ्या आणि आंदोलक म्हणून ओळख निर्माण केली. 

एकीकडे राजकिय कारकिर्द घडत असताना तिकडे त्यांच्या वकिलीचा अभ्यासही सुरूच होता. १९८२ मध्ये त्यांनी सांगलीतील एन.एस. लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली.मात्र त्यांचा ओढा राजकारणाकडे होता. वकिलीची प्रॅक्टिस करण्यात त्यांना फारसा रस  नव्हता.तरिही आम्ही आग्रह केल्यानंतर त्यांनी वकिली करण्याचा निर्णय घेतला. सनद घेतली. त्यांना कोणीतरी काम सुरू करण्याचा रविवारचा मुहूर्त सांगितला. आत्ता रविवारी तर न्यायालये बंद होती.

मग खटला लढवायला उभा राहणार कुठे ? 

तरिही काळा कोट आणि टाय घालून आम्ही सांगली न्यायालयाच्या आवारात गेलो. आवारातून एक फेरफटका मारला आणि वकिली संपली. 

त्यानंतर त्यांनी त्यांचे साडू व नागजचे वकिल सुभाष शिंदे यांना कोट दिला तर जी.एस. माळी या दूसऱ्या सहकाऱ्याला टाय दिला. ज्यांना कोट दिला ते पुढे सरपंच झाले त्यांनी देखील वकिल म्हणून न्यायालयाची पायरी कधी चढली नाही तर ज्यांना टाय दिला ते देखील कोठेही खटली चालवायला उभे राहिले नाहीत. 

अॅड. तुकाराम कुंभार तासगाव. (adv.kumbhar@gmail.com)

Leave A Reply

Your email address will not be published.