कर्ज काढून गाडी घेणारे ते देशाचे एकमेव पंतप्रधान होते.

जय जवान, जय किसानचा नारा देणारे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. आज लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. कालचा दिवश भारतासाठी ताश्कंद करार आठवणारा असतो आणि आजचा दिवस लाल बहादूर शास्त्री यांच्या आठवणी आठवणारा.
लाल बहादूर शास्त्री आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचे किस्से हे फक्त भारतीय म्हणून आपणाला आवडणारे किस्से म्हणून मर्यादीत नाहीत तर ते भारतीय लोकशाहीला समृद्ध करणारे किस्से आहेत.
पंतप्रधान म्हणून कसं असावं याहून अधिक ते एक माणूस म्हणून कस असावं हे सांगणारे अधिक आहेत.
आज शास्त्रींजींची जयंती.
खरतर त्याचं आडनाव देखील शास्त्री नव्हतं. त्यांनी आपल्या आडनावावरुन जात ओळखली जावू नये म्हणून फक्त लालबहादूर नाव वापरलं. त्याचं खर आडनाव कोणतं याचा शोध आम्ही देखील घेणार नाही ते फक्त त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच. त्यांना काशी विद्यापीठाने शास्त्री अशी पदवी देवू केली. तेच त्यांनी आयुष्यभर वापरलं.
लालबहादूरजींच्या प्रामाणिकपणाचे काही किस्से खास तुमच्यासाठी.
लाल बहादूर शास्त्रींनी जेव्हा जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
लालबहादूर शास्त्री हे भारताचे रेल्वेमंत्री होते. तेव्हा भारतातील सर्वात मोठ्ठी रेल्वे दुर्घटना झाली. या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारत त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला. तेव्हा नेहरू संसदेत संबोधित करताना म्हणाले, “शास्त्रीजी जबाबदार आहेत म्हणून हा राजीनामा स्वीकारला जात नाही तर पदाचे उत्तरादायित्व सिद्ध करत असताना प्रत्येकाला आपल्या जबाबदारीच भान असावं व त्यातून संसदेची चौकट दृढ व्हावी म्हणून हा राजीनामा स्वीकारला जात आहे.”
याच दुर्घटनेबद्दल संसदेत चर्चा करत असताना लालबहादूर शास्त्री म्हणाले होते की,
“माझ्या कमी उंचीमुळे आणि नम्र स्वभावामुळे अनेकांचा असा समज आहे की मी कठोर निर्णय घेवू शकत नाही. मला वाटतं मी शाररिक बाजूने मजबूत नाही देखील पण एक नक्की मी मानसिक बाजूने नक्कीच मजबूत आहे”.
लालबहादूर शास्त्रींजींचं बालपण.
माणसं मोठ्ठी झाली की त्यांच्या बालपणाच्या सुरस कथा सांगितल्या जातात. आज अनेकांच्या लहानपणाच्या सुरस कथा रंगवुन सांगितल्या जातात. कदाचित शास्त्रीजींच्या कथा देखील तशाच असू शकतीलही पण यातून तो माणूस काय होता हेच समजतं हे देखील आपणाला मान्य करावं लागेल. अशातलीच एक कथा म्हणजे शास्त्री लहान होते. साधारण सहा वर्षाचे. तेव्हा ते आपल्या मित्रांसोबत आंबे तोडण्यासाठी एका बागेत गेले. तिथल्या रखवालदाराने त्यांना पकडलं तेव्हा शास्त्री म्हणाले, मला वडिल नाही म्हणून तुम्ही मलाच पकडलं… त्यावर रखवालदार म्हणाला,
“वडिल नसले की जबाबदारी वाढते”
तेव्हापासून शास्त्री जबाबदारीने वागायचे अस सांगितलं जातं. हि गोष्ट किती खरी किती खोटी याहून अधिक महत्व आपल्या बालपणाबद्दल असं मिथक रचलं जावू शकतं अशा प्रकारेच लालबहादूर शास्त्री वागले.
कर्ज काढून गाडी घेणारे एकमेव पंतप्रधान.
पंतप्रधान पदावर असताना त्यांना शासकिय गाडी होती. ती तहसिलदाराला देखील असते. आपण पाहतो तहसिलदाराच्या मिसेस अथवा त्यांच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी देखील शासकिय गाड्यांचा सर्रास वापर केला जातो पण शास्त्री त्यातले नव्हते. एकदा त्यांच्या मुलानेच शासकिय गाडीचा वापर केला. तेव्हा शास्त्रींनी नोटीस जाहिर केली. मुलाने शासकिय गाडीचा केलेला वापर हा चुकिचा ठरवून आपल्या खिश्यातून डिझेलची रक्कम शासकिय खात्यामध्ये भरली.
लालबहादूर शास्त्रींनी लग्नामध्ये फक्त चरखा घेतला होता. हुंडा घेण्याच्या प्रकारात कदाचित त्यांनी केलेली ती एकमेव चूक असावी. त्यांनी आपला मुलगा म्हणून नोकरीत मुलाला दिलेली बढती रद्द ठरवली होती. अस सांगितल जातं कि पंतप्रधान म्हणून ते कारभार संभाळत असताना त्यांच्या घरी कोणीच नोकर माणूस नव्हता. त्यांच सर्व काम ते स्वत: आणि त्यांची पत्नी करायच्या. असा इतका साधा आणि सरळ माणूस भारतासारख्या देशाला पंतप्रधान म्हणून लाभला याचं आश्चर्य वाटतं.
लालबहादूर शास्त्रींना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन !
हे ही वाचा –