पुरूषांना देखील होवू शकतो ब्रेस्ट कॅन्सर, वाचा काय असतात लक्षणे..

पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होतो. असं म्हटल्यावर आपला त्यावर पटकन विश्वास बसणार नाही. एखादा सहज का होईना पण म्हणू शकतो की पुरुषांना स्तनच नसतात मग कसा काय ब्रेस्ट कॅन्सर होईल?

किशोरावस्थेतच्या आधी मुलानं आणि मुलीनं मध्ये ब्रेस्ट टिशू सम-प्रमाणात असतात. पण नंतर महिलांमध्ये फिमेल हार्मोन्स वाढत असतात त्यामुळे त्यांच्या ब्रेस्टची वाढ होत असते. तसेच काही प्रमाणात हे टिशू पुरुषांमध्ये ही असतात.

पण स्त्रियांच्या मानाने पुरुषांमध्ये हे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्यांच्यात ब्रेस्टची वाढ होत नाही पण पुरुषांमध्ये असणाऱ्या ब्रेस्ट टिशू मुळे पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते. 

हि शक्यता महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरच्या १ टक्के असते. २०१७ मध्ये अमेरिकन सेंटर सोसायटीने दिलेल्या आकड्यानुसार १९९० पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे आढळून आले होते त्या पैकी ४८० पुरुषांचा मृत्यू झाला होता. भारतात पुरुषांना होणाऱ्या कॅन्सर मध्ये २ टक्के कॅन्सर हा ब्रेस्ट कॅन्सरमुळे होतो.

पुरुषांना हि ब्रेस्ट कॅन्सर होतो हे माहित नसल्यामुळे यामध्ये पुरूष दगावण्याचे प्रमाण जास्त असते. 

 पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची कारण. 

  • अनुवांशिकतेमुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त असते.
  • मुलांमध्ये इस्ट्रोजेनचे म्हणजेच फिमेल हार्मोन्सचे प्रमाण जन्मापासून नॉर्मलपेक्षा जास्त असल्यास.
  • अती प्रमाणात दारूचे व्यसन केल्याने.
  • अशा काही गोळ्या-औषधे ज्यामुळे पुरुषाच्या हार्मोन्सवर परिणाम होतो.

पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची लक्षणे काय असतात ? 

  •  स्तनाग्रे आकुंचन पावले असेल किंवा आतमध्ये गेलं असेल.
  • स्तनाग्रे कडक होत असतील, सुज येत असेल.
  • स्तनाग्रांमधून स्त्राव येणे, रक्त येणे, चिकट द्रव पदार्थ बाहेर येणे.
  • स्तनांग्रे आजूबाजूला (गोलाकार) डाग दिसणे, चट्टे येणे किव्हा त्वचेचा रंग बदलणे.
  • स्तनांग्रे दुखणे.

पण हे लक्षात घेतलं पाहिजे कि पुरुषांचे दोन्ही स्तन एकत्र वाढले असतील तर ते ब्रेस्ट कॅन्सर असेलच असे नाही. जेव्हा असं होत तेव्हा त्याला गांयकोमास्टिया असं म्हंटले जाते आणि ते वजन वाढल्यामुळे किंवा औषधांच्या परिणामामुळे होऊ शकते. तसेच पुरुषानं मधील फिमेल हार्मोन्समध्ये वाढ झाल्यास गांयकोमास्टिया होण्याची होण्याची शक्यता असते. पुरुषांचं वय जसे वाढत जाते तसे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाणही वाढत जाते साधारण पन्नाशी नंतर याचे धोके जास्त वाढतात. 

ब्रेस्ट कॅन्सरवर ऑपरेशन करून कॅन्सर झालेले सेल काढले जातात. तसेच इस्टोजन म्हणजेच फिमेल हार्मोन्सच प्रमाण वाढलं असेल तर ते कमी केले जाते.

पुरुषांच्या ब्रेस्ट कॅन्सरवर उपाय म्हणून आपल्याला काय करता येईल ? 

लवकर तपासणी करून घेणे. 

समजा एखाद्या पुरुषाच्या कुटुंबात या आधी कोणाला हि ब्रेस्ट कॅन्सर असेल तर त्याने आपली तपासणी लवकर करून घेणे त्याच्यासाठी उपायकारक ठरेल. लवकर तपासणी केली तर त्यामुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. कारण ब्रेस्ट कॅन्सर चे निदान जर उशिरा झाले तर त्यातून त्या पुरुषाला वाचवणे थोडे अवघड असते.

नियमित व्यायाम केल्यामुळे लठ्ठपणा येत नाही, शरीराचं वजन संतुलित ठेवता येते आणि चांगले आरोग्य जपता येते त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर वर मत करता येते.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.