शेअर मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवालाही या दोघांना वस्ताद मानतोय

शेअर मार्केटचा किंग कोण? असं म्हटलं का सध्या एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे राकेश झुनझुनवाला. शेअर बाजारात नवीन उतरलेली पोरं झुनझुनवालाचा एवढा महिमा सांगतात की त्याला आता फक्त देवाऱ्यात ठेवायचं बाकी आहे. पण पोरांमध्ये झुनझुनवालाची एवढी क्रेझ असण्यामागं कारणही तसंच आहे. 

फोर्ब्स मासिकाच्या म्हणण्यानुसार नुसत्या ५००० रुपयांपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे झुनझुनवाला यांच्याकडे आज  २.२ अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास १६,४०० कोटीची संपत्ती आहे. 

 

शेअर बाजारात ट्रेडिंग आणि इन्वेस्टींग हे घरवाली आणि बाहेरवाली असण्यासारखं आहे. तुम्ही दोघींना मॅनेज करू शकत नाही. त्यामुळं त्यांना वेगळं ठेवा. एकीला दुसरीबद्दल काहीच माहिती होऊ देऊ नका’ अशा चाबऱ्या शब्दात सल्ले देणाऱ्या या बिग बुलला पोरांनी  चांगलेच डोक्यावर घेतलंय.

मात्र भारताचा वॉरेन बफेट म्हणून ओळखला जाणारे झुनझुनवाला मग कुणाकडून सल्ला घेत असतील हे जाणून घ्यायची भिडूला उगीच हौस. तसं उगीच हौस नाही म्हणता येइल कारण ज्यांच्याकडून झुनझुनवाला सल्ला घेतात ती पण बाप माणसं निघाली. 

शांतीत क्रांती करण्यावर विश्वास ठेवणारे राधाकिशन दमाणी

त्यातलं पाहिलं नाव आहे राधाकिशन दमाणी . शांतीत क्रांती करण्यावर विश्वास ठेवणारे दमाणी मीडियाच्या झगमगाटापासून दूर असतात त्यामुळं तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे नाव ऐकलं नसेल. पण त्यांच्या कामावरून तुम्ही त्यांना बरोबर ओळखाल. आपलं स्वस्तात मस्त D-mart हाय ना ते ह्याच माणसाचं आहे. 

पण D-mart उघडायच्या आधीपासूनच हा माणूस शेअरबाजारात आहे. 

दमाणी यांनी यांची अव्हेन्यू सुपरमार्ट्स कंपनी जेव्हा शेअर बाजारात लिस्टिंग झाली होती तेव्हा अवघ्या दोन दिवसात त्यांनी ६१०० कोटी कमावले होते. दलाल स्ट्रीटवर दमाणींचा मोठा दबदबा आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी तब्बल एक हजार कोटी खर्च करून मलबार हिल्समध्ये भारतातलं आतापर्यंतच सगळ्यात महागडं घर घेतलं होतं.

नवाब ऑफ दलाल स्ट्रीट राकेश दमाणी

झुनझुनवाला यांच्या मेंटॉर लिस्ट मध्ये दुसरं नाव आहे नवाब ऑफ दलाल स्ट्रीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश दमाणी यांचं. 

सेन्सेक्सचा ८०० पासून सुरु होऊन आता ५००००च्या पार गेलेला संपूर्ण प्रवास या माणसानं पाहिलाय. 

 गेल्या 30 वर्षात अशा सर्व प्रकारच्या घटना घडल्या ज्यानं  शेअर मार्केटचा बाजार उठला — कारगिल ते नोटाबंदी ते करोना संकटापर्यंत. तरी निर्देशांक नेहमीच वर चढण्याचा मार्ग शोधतोच हि त्यांची फिलॉसॉफी. राकेश दमाणी आजही झुनझुनवाला यांच्या इनर सर्कलचा भाग आहेत. 

झुनझुनवाला आपल्या वडिलांनंतर या दोन माणसांना आपला मेंटॉर मानतात. बाकी शेअर बाजारात जे रेग्युलर आहेत ते या तिघांनापण शेअर मार्केटचे बादशाह मानतात. या तिघांचाही पोर्टफोलिओबद्दल एखादी खबर जरी बाहेर आली, तरी रिटेल इन्व्हेस्टर त्यावर तुटून पडतात.

बाकी तुमच्यापैकी कोणी शेअर मार्केटमध्ये असेल तर भावांनो मोक्कार कमवा म्हणजे आम्हाला पण आपली मराठी नावं स्टोरी मध्ये लिहता येतील.

 हे ही वॉच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.