बार्सिलोनाला का परवडेना मेस्सी ?

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉल प्लेयर लिओनेल मेस्सीला आपला बार्सिलोना क्लब सोडताना खूप रडू आलं. रडता रडत तो म्हणत होता,

मी इथे राहण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले. मी माझ मानधन अर्ध करा असं ही म्हंटल. या क्लबला जगातील सर्वोत्तम क्लब बनवण्यासाठी मी काहीही करू शकतो. पण सध्या माझ्याकडे सांगण्यासाठी शब्द नाहीत. 

स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोना मध्ये मेस्सीने दोन दशकांहून अधिक काळ व्यतीत केला आहे आणि तो क्लबचा सर्वात अग्रेसिव्ह असा खेळाडू होता.

२०२०-२१ च्या हंगामापूर्वी मेस्सीमध्ये आणि क्लब मध्ये अनेक कडवटपणाचे प्रसंग आले. क्लबचे तत्कालीन अध्यक्ष जोसेप बार्टोम्यू यांच्याशी मेस्सीचं वाजलं होत. पण नंतर जेव्हा बार्टोम्यूच्या जागी जोआन लापोर्टा आले, तेव्हा मात्र क्लब आणि मेस्सीमध्ये असलेलं तणावपूर्वक वातावरण निवळलं. थोडक्यात मेस्सीने बार्सिलोनाला भविष्य दिले.

मेस्सी क्लब मधून बाहेर पडल्यावर बार्सिलोनाने काय म्हंटल ?

5 ऑगस्टला , बार्सिलोना क्लबने एका निवेदन जरी केलं. यात क्लबच्या जोआन लापोर्टा यांनी म्हंटल की, मेस्सीला क्लबसोबत आपला करार मोडायचा नव्हता, किंबहुना क्लबला पण लिओसोबत राहायचे होते. पण मग LaLiga च्या नियमांमुळे ते शक्य झाले नाही.

क्लबला ३४ वर्षीय लिओसोबतचा करार दोन वर्षांनी वाढवायचा होता. परंतु लालिगाच्या फायनान्शिअल फेअर प्ले (एफएफपी) नियमांनी त्याला प्रतिबंध केलय. LaLiga च्या नियमानुसार, बार्सिलोनाची वेतन-ते-उलाढाल टक्केवारी ७० टक्के असणे आवश्यक आहे. पण सध्या बार्सिलोना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. त्यांच्यावर १.१८ बिलियन डॉलर्सचे (सुमारे ८००० कोटी रुपये) कर्ज आहे.

बार्सिलोनाला का परवडेना मेस्सी ?

बार्सिलोनासाठी लिओ जरी फुकट खेळला असता तरी त्यांना तो परवडणारा नव्हता. सहा वेळा Ballon d’Or विजेता लिओ का करार करू शकणार नव्हता याबाबत लापोर्टा यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे,

मेस्सीला जर आम्ही फुकट जरी खेळवल तरी क्लबची वेतन-ते-उलाढाल टक्केवारी ११० टक्के होती. आणि जर त्याच्याशिवाय आम्ही खेळलो तर ते ९५ टक्केच्या घरात जाते. आणि हेच एफएफपी कट-ऑफ मार्कपेक्षा पण जास्त आहे. ताज्या आर्थिक अहवालानुसार, क्लबने आपले कर्ज GBP १अब्ज पर्यंत ओलांडले आहे. ज्यात फिलिप कौटिन्हो आणि फ्रेन्की डी जोंग यांच्यासाठीच्या कराराच्या रकमेचा समावेश आहे. त्यांच्या फर्स्ट टीम स्क्वाडचे वेतन बिल सुमारे २३५ दशलक्ष डॉलर प्रति वर्ष आहे.

“काहीही सांगण्यापूर्वी, मला हे स्पष्ट करायचे आहे की आम्हाला मागील मंडळाकडून भयंकर असा मनस्ताप आणि कर्ज मिळालंय. इथं आम्हाला काही करायला चान्सच नाही. कारण (FFP) नियम मर्यादा मध्ये येतायंत. आम्हाला एक करार स्वीकारावा लागला ज्याने क्लबचे टीव्ही अधिकार ५० वर्षांसाठी  गहाण ठेवले आहेत. पण FC बार्सिलोना इतर सर्व गोष्टींपेक्षा वर आहे.”

मग बार्सिलोनामध्ये मेस्सीचा हा शेवटच आहे का?

म्हणजे मेस्सीच्या रडण्याने तरी तसंच वाटतंय. पण व्यावसायिक सौदे आणि टीव्ही हक्कांच्या बाबतीत मेस्सी स्पॅनिश लीगचा सर्वात किफायतशीर खेळाडू आहे. काहींच्या मते, LaLiga ला त्याच्या एफएफपीच्या असणाऱ्या कठोर नियमांना आळा घालण्यासाठी बार्सिलोनाकडून दबाव आणण्याची ही युक्ती असू शकते. विशेष म्हणजे, रिअल माद्रिदनेही एक निवेदन प्रसिद्ध केले, ज्यात बार्सिलोनाने  मेस्सीचा करार संपण्यासाठी LaLigaला जबाबदार धरलंय.

आता मेस्सी पॅरिस सेंट जर्मनसोबत खेळणार का ?

मेस्सी त्याच्या पुढच्या वाटचालीवर खंबीर आहे. त्याने पीएसजीचे प्रशिक्षक मॉरिसिओ पोचेटिनो यांच्याशी चर्चा केली आहे. क्लब मेस्सीच्या एंट्रीसाठी आयफेल टॉवरवर व्यवस्था करत आहे. PSG हे काही मोजक्या क्लबपैकी एक आहे जे लिओला अफोर्ड करू शकतील. तसेच, PSG कडे कतारी गुंतवणूकदार असल्याने पैशाला काही तोटा नाही.

त्यामुळे बार्साला आता फ्रंट स्ट्रायकरवर खेळणारा कोणीतरी शोधावा लागणार. क्योंकी मेस्सी तो अब गयो..

हे ही भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.