म्हणून दुसऱ्या महायुद्धावेळी हवामान विभागाचे हेड ऑफिस पुण्यावरून दिल्लीला हलविले

भारतीय हवामान विभाग आणि इथल्या मान्सूनचा ३६ आकडा आहे. ज्यावर्षी हवामान विभाग यंदा सरासरी एवढा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करत त्यावर्षी नेमका पाऊस कमी पडतो. यामुळे अनेकवेळा हवामान विभागावर टिका सुद्धा करण्यात येते.

बुधवारच उदाहरण घ्या ना. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात रेड अर्लट घोषित केल्याने शाळा, कॉलेज यांना ४ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र, गुरुवारी पावसाने उघडीप घेतली आणि त्यानंतर हवामान विभागावर पुन्हा एकदा निशाण्यावर आला.

कधी काळी देशाच्या हवामान विभागाचे मुख्य ऑफिस पुण्यात होते. मात्र, ते दुसऱ्या महायुद्धावेळी दिल्लीत हलविण्यात आले. त्याची ही गोष्ट. 

हवामान विभागाच्या अंदाजावर किती जरी टिका केली तरीही त्यावर अनेक गोष्ट अवलंबून आहेत. मुख्य म्हणजे हवामान विभागाच्या अंदाजानुसारच शेतकरी पेरण्याचे नियोजन करत असतात. वार्षिक मान्सूनचा अंदाज तयार, भारतातील प्रत्येक मोसमात मान्सूनच्या प्रगतीचा मागोवा घेण्यात येतो त्यामुळे हवामान विभाग हा महत्वाचा समजला जातो.ब्रिटिश काळापासून देशातील ७४ ठिकाणी हवामान निरीक्षण केंद्र होती.  त्यातील मुंबई, चेन्नई, कलकत्ता येथे जगातील सगळ्यात जुने निरीक्षण केंद्रांपैकी एक होते. 

ब्रिटिश काळात भारतात हवामान शास्त्राचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जात होते.

अशावेळी भारत राज्याच्या सचिवांनी इंग्लंडमधील अनेक हवामानशास्त्रज्ञांशी चर्चा केल्यानंतर भारतभरातील हवामानविषयक उपक्रमांवर देखरेख ठेवण्याचे कामासाठी इम्पिरियल रिपोर्टर नेमण्याचा निर्णय घेतला होता. 

या पदासाठी इंग्लड येथील हवामानशास्त्रज्ञ एच. एफ. ब्लॅनफोर्ड यांची  १५ जानेवारी १८७५ रोजी नियुक्ती करण्यात आली. जुलै १९७५ मध्ये त्यांनी एक विस्तुत अहवाल सादर केला. महसूल, कृषी आणि वित्त मंत्रालयाने याला मान्यता दिली आणि सप्टेंबर १८७५ रोजी  भारतात हवामान विभाग (आयएमडी)  सुरु करण्यात आला. 

कोलकत्ता येथे आयएमडीचे मुख्य ऑफिस सुरु करण्यात आले.

 त्यावेळी आयएमडी मध्ये फक्त ब्लॅनफोर्ड हे एकमेव अधिकारी होते. यानंतर हवामान विभागाचे कार्यालय शिमला येथील केनेडी बिल्डिंग मध्ये हलविले. मात्र शास्त्रज्ञांना अधिक चांगल्या सुविधांसह पावसाचे संशोधन करता यावे, यासाठी मुख्यालय सिमल्याबाहेरून मैदानी प्रदेशात कुठेतरी हलवण्याचा विचार आयएमडीच्या वतीने करण्यात आला. 

यासाठी एच. एफ. ब्लॅनफोर्ड यांनी भारतीय हवामान विभागासाठी चांगली जागा मिळावी देशभरात दौरा केला. हवामान विभागाच्या वतीने मुख्य कार्यालयासाठी १९२४ मध्ये पुण्याची निवड करण्यात आली. १९२६ मध्ये याला बॉम्बे सरकराची परवानगी मिळाली. बिल्डींगच्या बांधकामासाठी १९२६-२७ च्या अर्थसंकल्पात २ लाखांची तरतूद करण्यात आली होती. 

भारतीय हवामान विभागाच्या वतीने पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर १० एकर जमीन खरेदी करण्यात आली. १९२८ मध्ये ही बिल्डिंग बांधून पूर्ण झाली. यासाठी ९ लाख ५० हजारांचा खर्च आला.

यानंतर मार्च १९२८ मध्ये शिमल्यावरून हवामान विभागाचे कर्मचारी पुण्यातील कार्यालयात शिफ्ट झाले. १ एप्रिल १९२८ मध्ये भारतीय हवामान विभागाचा पहिला अहवाल प्रकाशित करण्यात आला. तर मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली आर्मे विलसन यांनी १९ जुलै रोजी कार्यालयाचे उद्घाटन केले.

दररोज देशातील हवामान कसे राहील त्याचा अहवाल तयार करणे, तसेच दैनंदिन, साप्ताहिक आणि महिन्याचा अहवाल प्रकाशित करणे आणि पश्चिम किनारपट्टी, अरबी समुद्र आणि इतर भागातील  प्रदेशात वादळाचा इशारा देणे हे हवामान विभागास बंधनकारक करण्यात आले होते.

१८७५ ते १९२८ दरम्यान हवामान विभागाच्या सर्व इन्स्ट्रुमेंटची दुरुस्ती करणे, त्यांचा पुरवठा करण्याचे काम कोलकत्ता येथील अलीपूर वेधशाळा करत होती. पुणे येथे हवामान विभागाचे मुख्य कार्यालय सुरु झाल्यानंतरर हे सगळे काम सुद्धा इथूनच होऊ लागले होते. 

पुण्यातील हवामान विभागाचे कामकाज १९३९ पर्यंत सुरळीत सुरु होते. १९२८ मध्ये आयएमडीचा वार्षिक खर्च ६ लाख रुपये होता. १९३९ मध्ये तो वाढून २१ लाखांवर पोहचला होता.

१९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्याने भारतीय हवामान विभागाचे कामकाज वाढले. विशेषत: विमानसेवेसाठी आवश्यक असलेल्या, आणि दिल्लीत विमान वाहतुकीसाठी हवामान तज्ञांची जवळची उपस्थिती आवश्यक होती. यासाठी  दिल्लीतील वेलिंग्टन विमानतळावर (आता त्याचे नाव बदलून सफदरजंग करण्यात आले) येथे एक ऑफिस सुरु करण्यात आले होते.

युद्धा दरम्यान हवामान विषयी अधिक माहिती व्हावी यासाठी हवाई दलाच्या मुख्य कार्यालय जवळ हे ऑफिस सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ज्यामुळे युद्ध दरम्यान हवामान विषयक माहिती हवाई दलाला मिळेल आणि त्यांना आपले ऑपरेशन पार पाडण्यासाठी मदत होईल यासाठी भारतीय हवामान विभागाचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे हलविले होते.

यासाठी १९३९ मध्ये दिल्लीतील लोधी रस्त्यावर हवामान विभागाच्या हेड ऑफिससाठी ३० एकर जमीन घेण्यात आली होती. आणि तेथेच हवामान विभागाचे मुख्य कार्यालय सुरु झाले. तेव्हापासून हे कार्यालय दिल्ली येथे आहेत. 

भारताला १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, त्यानंतरही भारतीय हवामान विभागाचे ऑफिस दिल्लीयेथून पुण्यात परत सुरु करण्यात आले नाही.  

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.