त्यादिवशी ‘एमजीआर’ यांच्या अंत्ययात्रेत जयललितांना जखमी होईपर्यंत मारलं होतं..

२४ डिसेंबर १९८७, चेन्नईमधील राजाजी हॉल, तिथे तामिळनाडूच्या अभिनेता, राजकारणातील सर्वोच्च नेता आणि तत्कालीन मुख्यमंत्री ‘एम.जी.आर’ अर्थात मरुथुर गोपालन रामचंद्रन यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं होत.

त्यावेळी झालेल्या तोबा गर्दीत एक ३८ वर्षीय महिला देखील उपस्थित होत्या. त्या राज्यसभेच्या खासदार आणि सोबतच अण्णा द्रमुक मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या प्रचार सचिव होत्या.

जयललिता जयराम.

जयललिता तिथे फक्त उपस्थित नव्हत्या, तर तब्बल २१ तासांपासून त्या मृतदेहाच्या डोक्याजवळ उभ्या होत्या. 

जेव्हा एमजीआर यांचं पार्थिव राजाजी हॉलमधून बाहेर अंत्ययात्रेसाठी गाडीवर ठेवण्यात आले तेव्हा जयललिता देखील त्या गाडीवर चढू लागल्या. पण तेव्हाच एमजीआर यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांचा भाचा दीपन त्याठिकाणी आला.

दीपनने त्यावेळी जयललिता यांच्या डोक्यात जोरात मारलं आणि त्यांना अपमानास्पद वागणूक देवून खाली उतरवलं. पण जयललिता यांनी पुन्हा वर चढण्याचा प्रयत्न केला, मात्र दीपनने त्यांना पुन्हा मारलं. आणि यावेळी फक्त मारलचं नाही तर धक्के मारत त्यांना खाली उतरवलं.

या घटनेद्दल जयललिता सांगतात,

या सगळ्या नंतर देखील मी पुन्हा वर चढतं होती, मला एमजीआर यांच्यासोबत थांबायचं होतं. पण दीपनने मला पुन्हा ढकललं, मी जोरात गाडीच्या बाहेर पडले. त्यामुळे माझ्या शरीरावर जखमा होऊन रक्त देखील येवू लागले होते.

अण्णाद्रमुकचे आणखी एक आमदार देखील जयललिता यांना मारण्यासाठी दीपनची मदत करत. डॉ. के. पी. रामलिंगम.

जयललिता यांचं म्हणणं असं ही होत की,

जेव्हा मी तिथे उभी होती, तेव्हा ७-८ महिला माझ्या जवळ येऊन उभ्या राहिल्या आणि सतत पायांवरती पाय देऊन पायाची बोट तुडवत होत्या. माझ्या शरीरावर नखांनी ओरखडे करू लागल्या.

चेहरा सोडून त्यांनी माझ्या पूर्ण शरीरावर जखमा केल्या होत्या.

खरंतर १९८७ मध्ये एमजीआर यांच्या मृत्यूनंतर अण्णा द्रमुक पक्ष दोन गटात विभागला गेला. एक जयललिता समर्थक गट आणि दुसरा जानकी रामचंद्रन समर्थक गट.

याच मुख्य कारण होत, १९८४ मध्ये ब्रेन स्ट्रोक्समुळे रामचंद्रन काही दिवस मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळू शकत नव्हते तेव्हा जयललिता यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती. पण रामचंद्रन यांनी पक्षाच्या उप नेते पदावरून हटवलं होत. तेव्हा पासूनच पक्षात दोन गट तयार होऊ लागले होते.

या विभागणीमुळे एमजीआर यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती की, जयललिता यांनी या अंत्ययात्रेत सहभागी होऊ नये, पण तरीही जयललिता तिथे उपस्थित होत्या.

अखेरीस जयललिता आपल्या गटाच्या लोकांमध्ये येऊन उभ्या राहिल्या.

या सगळ्या घटनांनंतर एमजीआर यांचा उत्तराधिकारी कोण? असा प्रश्न जयललिता यांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी एखाद्या कसलेल्या राजकारण्यासारखं उत्तर दिल होत.

“लोकशाहीमध्ये उत्तराधिकाऱ्याची निवड जनता करत असते”

त्या अपमानास्पद वागणुकीनंतर जयललिता यांचं नेतृत्व लगेच मान्य करण्यात आलं नव्हतं. पक्षात तब्ब्ल ३ वर्ष हा संघर्ष चालू होता. जानकी रामचंद्रन हंगामी मुख्यमंत्री देखील झाल्या, पण पुढे त्यांनी जयललिता यांचं नेतृत्व मान्य केलं.

केवळ जानकी रामचंद्रन यांनीच मान्य नाही केलं तर पक्षानं आणि तामिळनाडूच्या जनतेने देखील मान्य केलं.

१९९१ मध्ये त्या पहिल्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. 

पुढे तब्बल ५ वेळा त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या, त्यांच्या संमती शिवाय पक्षात पान देखील हालत नव्हतं. राज्यातीलच नव्हे तर देशातील सगळ्यात शक्तिशाली महिलांपैकी एक बनल्या. नाटक मंडळी मधील काम ते सुप्रसिद्ध अभिनेता ते लोकप्रिय नेता असलेल्या एमजीआर यांनीच जयललिता यांना राजकारणात आणलं होत.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.