गोष्ट महाराष्ट्रातल्या पहिल्या इलेक्शन कॅम्पेनिंगची : किस्से इलेक्शनचे.

महाराष्ट्रात इलेक्शनच बिगुल वाजल आहे. अगदी दहा पंधरा दिवसात आचारसंहिता लागू होतील अस सांगण्यात येतय. बोलभिडूचा रिच डाऊन झाला की ओळखावं आचारसंहिता लागणार अस आमच आपलं गृहितक आहे. असो तर निवडणूकांच्या निमित्ताने आम्ही आपणाला इलेक्शनचे किस्से सांगणार आहोत.

हा पहिला किस्सा. 

आज कोणत्या नेत्याला विजयी करायचं यात महत्वाचा वाटा असतो ते इलेक्शन कॅम्पनिंग करणाऱ्या कंपन्याचा. मतदारसंघातील बुथपातळीवरील सर्व्हे पासून ते एखादी थीम घेवून नेत्याला प्रोजेक्ट करण्यापर्यन्तची हि कामे असतात. उदाहरण द्यायचं झालच तर कोल्हापूरच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गाजलेली “आमचं ठरलय” हि टॅगलाईन देखील इलेक्शन कॅम्पनिंगची हिस्सा होती.

सध्या मोठमोठ्या कंपन्या हि कामे करतात. मोदींच्या २०१४ च्या विजयी होण्यामागे IPAC च्या प्रशांत किशोर यांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आणि पुर्वी कार्यकर्त्यांकडून केली जाणारी हि कामे कंपन्यांच्या हाती आली. पण या कॅम्पनींगला खूप मोठ्ठा इतिहास आहे.

महाराष्ट्रात इलेक्शनच कॅम्पनिंगची सुरवात कोणी केली याचं उत्तर मिळतं, 

कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी.

जार्ज फर्नांडिस हे दक्षिणेतले. लहानपणी ते पाद्री होणार होते. त्यांच्या आईने त्यांना ख्रिश्चन मिशनरी स्कुलमध्ये दाखल केलं होतं. पण जार्ज तिथून पळून आले. कामाच्या शोधात मुंबईत आले. 

मुंबईत आल्यानंतर ते चौपाटीच्या बेंन्चवर झोपायचे. काम करत करत ते ट्रेड युनियन आणि सोशॅलिस्ट पार्टीच्या आंदोलनात सहभागी होवू लागले. विद्रोह रक्तात भिनलेले जॉर्ज १९५० च्या काळात टॅक्सी युनियनचे प्रमुख झाले. 

कामगारांची एकत्रित ताकद इतकी वाढली की त्यांच्या एका हाकेवर मुंबई बंद होवू लागली. मुंबई बंद होवू शकते हे मुंबईकरांना पहिल्यांदा जार्ज फर्नांडिस यांच्यामुळेच समजल.

मुंबईच्या बाप माणसाला हरवण्याची गोष्ट.. 

कामगार नेता हि नवी ओळख जार्ज फर्नांडिस यांची झाली होती, पण तेव्हा मुंबईचा बाप माणूस म्हणून स.का. पाटील यांची ओळख होती. स.का. पाटील हे मुंबईचं मोठ्ठ प्रस्थ होतं. संयुक्त महाराष्ट्राला विरोध करुन देखील त्यांच्या लोकप्रियतेत कोणतीच कमतरता नव्हती.

अशा बाप माणसापुढे मुंबईच्या बाहेरच्या कामगार नेत्याने निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला होता. 

याच निवडणुकीत कदाचित भारतातील पहिली इलेक्शन कॅम्पेनिंग आखण्यात आलं.

२०४ चर्नी रोड या बिल्डींगमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्या मिटींग होत होत्या. प्रचार कसा करता येईल हा मुख्य मुद्दा असायचा. याच काळात जॉर्ज फर्नांडिस यांच नाव देश आणि जगाच्या पातळीवर गाजत होतं. बिल्डींगमध्ये मुलाखती देणारे जॉर्ज बिनबाह्याच्या बनियनमध्येच मुलाखती देत असतं. 

त्या काळात सका पाटलांच्या विरोधात प्रचाराची रणनिती अशी ठरवण्यात आली. दक्षिण मुंबईत पोस्टर लावण्यात आले त्यावर लिहण्यात आलं होतं की, 

होय तुम्ही स.का. पाटलांना हरवू शकता. 

हे वाक्य सामान्य माणसाच्या मनातला विद्रोह पेटवणार होतं. पोस्टर फाडण्याची हिंम्मत ज्याच्याकडून होईल त्याला प्रसाद देण्याच काम देखील कामगारांनी केलं. फेसबुक, वॉट्सएपवर निवडणुकांची रणनिती आखणाऱ्यांच्या कित्येक पुढचं हे निवडणुक कॅम्पेन होतं. याचा अपेक्षीत असा परिणाम झाला आणि सका पाटलांसारख्या मात्तब्बर व्यक्तीचा पराभव जार्ज सारख्या कामगारा नेत्याने करुन दाखवलां. 

हे हि वाच भिडू.