गोल्डनमॅन बप्पीदाच्या गाण्याने मायकल जॅक्सनला सुद्धा वेड लावल होतं

आजकाल आपण गावोगावी सोनेरी पॅटर्न बघतो. अंगावर ढिगभर सोन्याच्या चेन्स, बोटात सोन्याच्या अंगठ्या पाठोपाठ सोन्याच्या शर्ट, सोन्याचा चष्मा इथपर्यंत भाई लोकांची मजल गेली. पण या स्टाईलचा जन्मदाता होता,

“बप्पी लाहरी”

लाखो लोकांच्या गर्दीत ही बप्पीदांना ओळखणे अवघड नव्हतं. त्यांची गाणी आवडो अगर न आवडो पण बप्पीदाच्या पर्सनॅलिटीचा प्रत्येकजण फॅन होता.

मायकल जॅक्सनसुद्धा होता.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. माननीय राज ठाकरे यांनी मायकल जॅक्सनचा शो मुंबईमध्ये आयोजित केला होता. सगळ्या देशात धूम उडाली होती. जगातला सर्वात मोठा सुपरस्टार, म्युजिकचा बादशाह भारतात आला. त्याचा प्रचंड मोठ स्वागत झालं. त्याचा शो सुद्धा हिट होता.

शो संपल्यानंतर मायकल जॅक्सनसाठी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. मुंबईचे मोठमोठे सितारे या पार्टीमध्ये हजर होते. सगळे मायकल जॅक्सनशी ओळख करून घेण्यासाठी धडपडत होते.

मायकलच लक्ष मात्र एका माणसाकडे गेलं.

गोल मटोल बप्पीदा, बुटकी उंची, लांब केस, डोळ्यावर गॉगल, अंगात रंगेबीरंगी कपडे व त्यावर किलोकिलो सोने. मायकलला खूप आश्चर्य वाटलं आणि गंमत वाटली. तो मोठ्या स्टार्स ना चुकवून थेट बप्पी लहरी यांच्या जवळ गेला. त्यांच्या गळ्यातली गणपती बाप्पाची मूर्ती असलेली चेन बघून लागला.

त्याने बप्पीदा यांची चौकशी केली. बप्पी लाहरी यांनी आपणसुद्धा म्युजिक कंपोजर असल्याचं आणि डिस्को डान्सर सिनेमाच संगीत दिल्याच सांगितल. मायकल जॅक्सनचे डोळे चमकले. तो म्हणाला,

आय नो यु. आय लाईक युवर सॉंग जिमी जिमी

बप्पी लहरीला आकाश ठेंगण वाटू लागलं होता. त्याने मायकलला मिठी मारली. जगभरातल्या पॉपसंगीताचा दैवत, करोडो हृदयांचा सम्राट मायकल जॅक्सनला आपलं गाण माहित आहे. इतकेच नाही तर तो आपला मोठा फॅन आहे ही बप्पीदा साठी मोठी गोष्ट होती.

खर तर मायकल जॅक्सन आणि बप्पीदा यांचा उगम एकदमच झाला.

बप्पी लाहरी मुळचे बंगालचे. त्यांचे आईवडील दोघेही शास्त्रीय संगीताचे मोठे सिंगर. सुप्रसिद्ध गायक किशोरकुमार हे त्यांचे दूरचे नातेवाईक. अस संगीतमय वातावरण जन्मल्यामुळे अवघ्या तिसऱ्या वर्षी बप्पी लाहरी तबला वाजवायला शिकले.

एल्व्हिस प्रिस्लेचे ते भक्त होते. म्हणूनच आईवडील शास्त्रीय संगीतले दिग्गज असूनही बप्पीदा पॉप संगीताकडे वळले.

अठरा वर्षाचे असताना बॉलीवूडमध्ये नशीब काढायचं म्हणून मुंबईत आले.

काजोलचे वडील, तनुजा यांचे पती शोमु मुखर्जी यांनी त्यांना नन्हा शिकारी या सिनेमात पहिली संधी दिली. सुनील दत्त यांचा जखमी हा बप्पी लाहरी यांचा पहिला हिट सिनेमा.

हिंदीमध्ये बप्पीदा यांना चांगला संगीतकार म्हणून ओळख मिळू लागली होती मात्र त्यांना अजूनही हवा तसा ब्रेक मिळाला नव्हता. त्यांना जे काम करायचं होत ते मिळाल नव्हत.

अशातच १९८३ साली त्यांना हवा तो सिनेमा मिळाला, डिस्को डान्सर.

बी.सुभाष या सिनेमाचे दिग्दर्शक होते. आज पर्यंत आधुनिक संगीताचा प्रयोग कोणत्याच सिनेमात केला नव्हता तो बप्पी लाहरी यांनी डिस्को डान्सरमध्ये केला. बाप्पी लहरी यांचं संगीत, मिथुनदाचा डान्स याने प्रेक्षकांना वेड लावलं.

डिस्को डान्सर फक्त भारतातच नाही तर रशिया, चीन वगैरे देशातही प्रचंड हिट होता. त्याकाळी १०० कोटी रुपये कमवण्याचा विक्रम या सिनेमाने केला.

आय एम ए डिस्को डान्सर, गोरोंको की ना कालो की ही गाणी परदेशातही प्रचंड गाजली.  विशेषतः जिम्मी जिम्मी आजा आजा या गाण्याने जगभरातले चार्टबस्टरमध्ये विक्रम मोडले.

डिस्को डान्सर रिलीज झाला त्याच काळात म्हणजे अगदी दहा दिवसाच्या अंतरावर मायकल जॅक्सनचा थ्रिलर हा अल्बम रिलीज झाला.

लहानपणापासून जबरदस्त टॅलेंटेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायकलला या अल्बममुळे जगात ओळख मिळाली. थ्रिलर हा एकाअर्थे मायकल जॅक्सनचा पहिला सुपरहिट अल्बम म्हणता येईल.

मायकल आणि बप्पी दा यांची गाणी एकाच वेळी जगात हवा करत होती. दोघांचही वय जवळपास सेम होतं. मायकलने याच काळात जिम्मी जिम्मी ऐकलेलं आणि तेव्हापासून तो या गाण्याचा चाहता बनला होता.

पुढे दुर्दैवाने भारतात बप्पी लाहरी यांच्या टॅलेंटला योग्य वाव मिळाला नाही.

पुढची दहावर्षे त्यांना सक्सेस भरपूर मिळाल पण बॉलीवूडमध्ये त्यांच्याकडून एकसारखी गाणी बनवून घेतली गेली. पुढे बप्पीदा आपला गोल्डन टच विसरून गेले. पण दुसरीकडे मायकल मात्र अमेरिकाच नाही तर जगभरात धुमाकूळ घालत राहिला.

मायकलसारखी प्रतिभा असलेला बप्पीदा मात्र भारतात मागे पडत राहिला.

मात्र आजही अनेकदा परदेशी म्युजिक शो मध्ये जिमी जिमी आजा आजा तिथले सिंगर गाताना दिसतात. आफ्रिकामधले तरुण गायक गोरोंकी ना कालोंकी हे गाणे आवडीने म्हणताना दिसतात. डिस्को डान्सरवर आजही आपले पाय थिरकतात. हे सगळ बप्पीदामुळ यात शंका नाही.

 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.