माईक टायसनचा विजय देवरकोंडासोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू होतोय…….

टॉलिवूडच्या हिरोलोकांची भुरळ फक्त बॉलिवुडवाल्या लोकांनाच पडते असं नाही तर हॉलिवूडमध्ये सुद्धा त्यांची क्रेझ आहे. नुकताच टॉलिवूडचा सुपरस्टार असलेल्या विजय देवरकोंडाने लायगर या आपल्या सिनेमाचं पोस्टर आणि टिझर शेअर केलाय ज्यात जगातला सगळ्यात मोठा बॉक्सर असलेला माईक टायसन सुद्धा झळकतोय. हा टिझर बऱ्याच वेगाने व्हायरलसुद्धा होत आहे.

अभिनेता विजय देवरकोंडा हा लायगर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. विजयच्या चाहत्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे. या सिनेमात विजय एका मिक्स्ड मार्शल आर्ट प्लेअरची भूमिका साकारतोय. स्टंटने हि फिल्म खचाखच भरलेली असून ऍक्शन फिल्म बघणाऱ्या चाहत्यांना लायगर हा सिनेमा पर्वणीच असणार आहे. सध्या हा बिग बजेट सिनेमा गोव्यामध्ये शूट होत आहे आणि काही दिवसातच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

लायगर सिनेमाचा टिझर व्हिडिओ सोशल मीडियावर विजय देवरकोंडाने पोस्ट केला. या व्हिडिओत जगातला टॉपचा बॉक्सर अशी ओळख असलेला माईक टायसनलासुद्धा यातून इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. लायगर या सिनेमात विजय देवरकोंडासोबत माईक टायसन झळकणार आहे खरा पण या सिनेमात त्याचा कॅमिओ रोल असल्याचं सांगण्यात येतंय.

विजय देवरकोंडाची हि पहिलीच बॉलिवूड फिल्म आहे आणि हा त्याचा बॉलिवूड डेब्यू आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनर खाली हा सिनेमा बनत आहे. हिंदी सोबतच हा सिनेमा तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळममध्ये सुद्धा हा सिनेमा रिलीज होणार आहे. लायगर सिनेमात विजय देवरकोंडासोबत अभिनेत्री अनन्या पांडेसुद्धा झळकणार आहे. विजय देवरकोंडासोबत लीड रोलमध्ये अनन्या पांडे दिसणार आहे. 

विजय देवरकोंडाचा अर्जुन रेड्डी बघूनच बॉलिवूडमध्ये वारं बदललं होतं. पुढे अर्जुन रेड्डीचा रिमेक कबीर सिंग झाला. लायगर सिनेमातले महत्वाचे व्यक्ती म्हणजे पुरी जगन्नाथ या सिनेमाबद्दल आणि माईक टायसनच्या डेब्यूबद्दल म्हणताय कि,

आम्हाला हि घोषणा करताना आनंद वाटतोय कि ज्या माणसाने जगातले सगळे विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवले आहेत, ज्याला जगभरातील तरुणाई आयकॉन मानते अशा एकमेवाद्वितीय माईक टायसनला आम्ही बॉलिवूडमध्ये भारताच्या थेटरात तुमच्यासाठी घेऊन येत आहोत लायगरच्या निमित्ताने.

स्टंट आणि ऍक्शनने पुरेपूर असलेला हा सिनेमा लायगर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माईक टायसनसारखा जब्राट माणूस यात आहे म्हणल्यावर राडा होणार हे नक्कीच दिसतंय. टॉलिवूडची जादू आता बॉलिवूडमध्ये येणार आहे आणि माईक टायसन आणि विजय देवरकोंडा काय धमाल करणार हे बघणं जास्त मजेशीर असणार आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.