गेली पन्नास वर्षे पॉश आणि बेस्ट राईडचा अनुभव म्हणून मिनी कूपरकडे बघितलं जातं….
कार शौकीन लोकांचा एक वेगळाच किस्सा असतो, कार क्षेत्रात नक्की काय घडतंय यावर त्यांचं बारीक लक्ष असतं. गाड्यांची आवड त्याही भारी कंपनीच्या कुठल्या,कुठल्या गाडीला डिमांड आहे त्यांना माहिती असतं. रोल्स रॉयल्स, मर्सिडीज कितीतरी गाड्या आपण ऐकत पाहत असतो. एखादी भारीतली गाडी जरी आपल्याला पास दहा लोक त्या युनिक गाडीकडे बघत असतात. आजचा किस्सा अशाच एका पॉश गाडीचा आहे.
मिनी कूपर कार म्हणजे गाड्यांच्या जगातली सगळ्यात जास्त लोकप्रिय कार. या कूपर कारने एकेकाळी भारी भारी कंपनीच्या गाड्यांचं मार्केट डाऊन केलं होतं.
या गाडीचा जन्म कसा झाला, कोणी हि गाडी बनवली, हि गाडी जगभरात कशी फेमस झाली त्याबद्दल जाणून घेऊया.
चार्ल्स कूपर आणि जॉन कूपर या बाप मुलांनी मिळून कूपर कारची निर्मिती केली. चार्ल्स कूपरचं सरबिटनमध्ये गॅरेज होतं ज्यात कार आणि त्यांची देखभाल केली जायची. जॉनने वयाच्या १५ व्या वर्षी शाळा सोडली आणि वडिलांसोबत तो काम करू लागला. कूपर कार दुसऱ्या वर्ल्ड वॉरच्या काळात निर्मिती प्रक्रियेत व्यस्त होती.
जॉन कूपर हा सुरवातीपासूनच स्पोर्ट कारचा चाहता होता. तो कायम असा विचार करायचा कि रेसिंग कारच्या मागे जर इंजिन बसवले तर ते जास्त सोयीचं राहील. मोटारसायकलच इंजिन जे चेनच्या स्वरूपात होत त्याप्रमाणे त्यांनी रेसिंग कारच्या मागे ते इंजिन बसवलं. असा प्रयोग करणं हे तेव्हा दुर्मिळच होतं. जॉन कूपरने हे सांगितलं होतं कि आम्ही मोठा काहीतरी वैज्ञानिक प्रयोग करत आहोत.
१९५०च्या काळात कुपरच्या गाड्या फॉर्म्युला वनच्या रेसिंगमध्ये उतरल्या. त्यावेळचे दिग्गज ड्रायव्हर जॅक ब्रॅहम, स्टर्लिंग मॉस अशा बड्या मंडळींनी कूपरचा कार चालवल्या. कूपर कारची गोष्ट अशी होती कि टर्नवर हि गाडी इतक्या सॉफ्ट पद्धतीने वळायची कि यावरच लोकं खुश व्हायचे. हायवेवर मिनी कूपरचा वेग तुफ्फान असायचा.
मिनी कूपर कारने रेसिंग क्षेत्रात क्रांती आणली होती. १९६४ ते १९६७ च्या काळात या गाडीतुन रॅली निघायची. इतकी लोकप्रियता अपवादानेच एखाद्या गाडीला मिळाली असेल. दिसायला एकदम कुल, ४ सीटर असलेली हि गाडी १९६९ मध्ये जगभरात २ मिलियन लोकांनी विकत घेतली होती. इथूनच हि गाडी जगभरात पोहचली. काळानुसार या गाडीत बरेच बदल होत गेले. ब्रिटिश लोकांनी हि फॅशन गाडी म्हणून प्रचलित केली.
युरोपात या कारने जबरदस्त व्यवसाय केला. अगदी जर्नलिस्ट लोकंसुद्धा या कारची जाहिरात करू लागले होते इतकी पॉप्युलर हि मिनी कूपर कार झाली होती. फॉर्म्युला वनमुळे खरी हि कूपर कार उजेडात आली तिथून तिची वेगाने विक्री होऊ लागली. जॉन कूपरचा मृत्यूअगोदर बीएमडब्ल्यू कंपनीत हि कार विलीन झाली पण तीच नाव मात्र मूळ मिनी कूपर कार हेच ठेवण्यात आलं.
सोशल मीडियावर आजसुद्धा जॉन कूपरने तयार केलेल्या डॉक्युमेंट्रीचे दाखले हे बेस्ट कार म्हणजे काय असतं यासाठी दिले जातात.
हॉलिवूडमध्ये २००३ साली या कार्व्हर सिनेमा आला होता तो म्हणजे इटालियन जॉब. हा सिनेमा खरा गाजला तो मिनी कूपरमुळे. यातील वेगाने पळणारी मिनी कूपर प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली.
पुढे बॉलिवूडमध्येही प्लेयर्स सिनेमा आला होता. अभिषेक बच्चन आणि इतर बडी मंडळी या सिनेमात होती. यातही कूपर गाडीचं जे मार्केट होतं ते इतर कुठेही पाहायला मिळालं नाही. सिनेमांमधून मिनी कूपर बऱ्याच लोकांपर्यंत पोहचली. आजही पॉश आणि बेस्ट राईडचा अनुभव म्हणून मिनी कूपर कारकडे बघितलं जातं. जॉन कूपरने तयार केलेली हि मिनी कूपर जगभर आजसुद्धा आपली लोकप्रियता टिकवून आहे.
हे हि वाच भिडू :
- म्हणून मोहम्मद रफींनी ब्रँड न्यू फियाट गाडी ड्रायव्हरला गिफ्ट देऊन टाकली होती.
- घरदार सोडून एका गाडीत राहणाऱ्या लोकांच्या स्टोरीने काल ऑस्कर जिंकलाय..
- याह्या खानने गाडीचे १००० रुपये दिले नाहीत आणि त्याला अर्धा देश देऊन किंमत चुकवावी लागली..
- बैलगाडीतल्या माणसाला विमानाची स्वप्न दाखवणाऱ्या कॅप्टनचा सिनेमा ऑस्करच्या रेसमध्ये गेलाय