मुंबईच्या मंत्र्यांना पार्टीचे निमंत्रण देऊन ड्रग्स प्रकरणात अडकवण्याचा प्लॅन होता का ?

“होय, मुंबईत झालेल्या ड्रग्ज पार्टीत मलादेखील काशिफ खानकडून निमंत्रण आले होते; मात्र मी त्या पार्टीत गेलो नाही. पण क्रुझवरील पार्टीची मला कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. त्या पार्टीच्या माध्यमातून काही तरी षड्यंत्र रचण्याचा डाव होता काय, हे मला माहिती नाही. त्याचा खुलासा तपास एजन्सीने करावा,’  असा धक्कादायक खुलासा मंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

अस्लम शेख यांनी असंही म्हणलं आहे कि, “काशिफ खानला मी काही ओळखत नाही ना याआधी मी त्याला भेटलेलो नाहीये. त्याने मला या क्रुझवरील पार्टीला आमंत्रित केले होते. मी मुंबई शहराचा पालकमंत्री म्हणून मला अनेक आमंत्रणे येत असतात. त्यातल्याच काही निमंत्रणांमध्ये हे देखील एक निमंत्रण होते, याप्रकरणी फार काही माहीत नाही, मी फारसं याला सिरीयसली घेतलं नाही आणि जाणार देखील नव्हतो. जिथे मला जायचंच नाही त्याबाबत त्या व्यक्‍तीचा नंबर घेणे किंवा त्याची माहिती घेणे हे मला काही उचित वाटलं नाही. पण जसं हे प्रकरण वाढत आहे तसं  पण आता यामागे नेमके काय षड्यंत्र होते हे दोन-दोन एजन्सी आता तपासतीलच”, असे म्हणत अस्लम शेख यांनी आपल्याला याप्रकरणी फार काही माहीत नसल्याचे सांगितलेय. 

अस्लम शेख यांना देखील अडकवण्याचं षडयंत्र होतं का ?

अस्लम शेख यांनी ज्याप्रकारे त्यांच्या सोबत घडलेल्या गोष्टी सांगितल्या त्यावरून असं बोललं जातंय कि या पार्टीचे निमंत्रण अस्लम शेख यांना देऊन त्यांना पार्टीला बोलावून त्यांना या ड्रग्स प्रकरणात गोवण्याचा प्लॅन होता कि काय ?

अस्लम शेख यांनी सांगितल्याप्रमाणे, काशिफ खानकडे अस्लम शेखचा मोबाईल नंबर आहे की नाही हे अस्लम शेख यांना माहीत देखील नव्हतं. त्यांनी सांगितलं कि, माझा मोबाईल हा जास्तीत जास्त वेळ हा माझ्या पीएकडेच असतो. काशिफने मला बोलावले होते. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी तो भेटला, त्याने या पार्टीसाठी आमंत्रण दिले होते. त्या ठिकाणी तो कसा आला ते मला माहीत नाही, त्याची माझी ओळख देखील नाही असेही ते म्हणाले.

आणखी काय म्हणाले अस्लम शेख?

होय, मला क्रूझ पार्टीचं आमंत्रण होतं ड्रग्ज प्रकरणातील सर्व पुरावे नवाब मलिक यांनी मीडियासमोर ठेवलेले आहेत. काशिफ खानने मला फोन केला होता; पण मी त्याला ओळखत नाही आमंत्रणापाठीमागचा कट काय, हे शोधनं तपास यंत्रणांनी शोध घ्यावा या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे.

क्रूझ पार्टीला परवानगी देण्याचे काम राज्य सरकारचे नाही, असेही त्यांनी म्हंटल आहे.

या वर नवाब मलिक यांनी दावा केला की, “काशिफ खानने आमचे मंत्री अस्लम शेख यांना पक्षात येण्यास भाग पाडले होते आणि आमच्या सरकारमधील विविध मंत्र्यांच्या मुलांना पक्षात आणण्याची योजना आखली होती. अस्लम शेख तिथे गेले असते तर उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र झाला असता, आणि हेच भाजपच्या नेत्यांची योजना होती.”

भाजप नेत्यांनी असा आरोप केला की, अस्लम शेख एका ड्रग्ज तस्कर काशिफला ओळखतात, त्यांचा फोनवर संपर्क होत असतो. तर नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांवर अनेक आरोप केले. प्रकरणाला मोहित कंबोज भरकटवत आहेत, खरं तर मोहित कंबोज हेच आर्यन खान प्रकरणातील “मास्टरमाइंड” असल्याचा आणि अभिनेता शाहरुख खानच्या मुलाचे खंडणीसाठी “अपहरण” करण्याच्या कटात सहभाग असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय.

 हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.