बाकीचे युट्युबर सोडा खुद्द दळणवळण मंत्री नितीन गडकरीसुद्धा युट्युब वापरून ४ लाख कमावतायत…

म्हणजे ज्याला काही येत नाही असा माजी टिकटॉकर व्यक्ती व्हिडिओ टाकून पैसे कमावतो. तर एखादा भिडू भारी भारी कंटेंट बनवून पैसे कमावतो. अशांमध्ये BB ke vines, Carry Minati असे विनोदवीर आहेत. तर संजीव कपूर, कुणाल कपूर सारखे शेफ आहेत. 

पण कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये तर खूप सारे लोक शेफ झाले. खूप साऱ्या रेसिपी फेसबुक, इंस्टा, युट्यूब वर टाकू लागले. हे कमी की काय म्हणून ट्विटरचा वापर पण या लॉकडाऊन कालीन शेफ लोकांनी करुन घेतला होता.

या सगळ्यात आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पण मागे नव्हते. त्यांनीच याविषयीचा किस्सा सांगितला होता. 

नितीन गडकरी म्हणजे दिलखुलास माणूस. मनात एक पोटात एक असं काही त्यांचं नसतं. मूळचे नागपूरचे असल्यामुळे अघळपघळ व्यक्तिमत्व. कधी स्कुटरवरून बाहेर पडतील कधी पाणीपुरीच्या ठेल्यावर दिसतील सांगता येत नाही. म्हणूनच दिल्लीत मोठमोठ्या पदावर पोहचले असले तरी त्यांचा ग्रासरूट लेव्हलवर सर्वसामान्य माणसांशी कनेक्ट तुटलेला नाही.

हेच कारण आहे की त्यांनी सांगितलेलेले किस्से तुफान फेमस होतात.    

तर दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वे निमित्ताने घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी उपस्थित होते. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने त्यांना त्यांच्या युट्यूब च्या व्हिडिओ विषयी विचारलं. त्यावर उत्तर देताना गडकरी म्हंटले

आजकाल मी युट्युबच्या माध्यमातून महिना चार लाख रुपये कमावतो.

कोरोनामुळे मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लावलं होत. त्याकाळात गडकरी यांनी युट्यूब वरचे व्हिडिओ बघून कुकिंग करायला सुरुवात केली. त्यातून त्यांना असं वाटलं की आपलं पण एखादं चॅनेल युट्यूबवर हवं. जेणेकरून लोकांना सरकारी धोरणांची उपयोगी अशी माहिती मिळत राहील.

त्याकाळात त्यांनी बऱ्याच देशांच्या प्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. त्यांनी या संबंधीचे व्हिडिओ त्यांच्या नव्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केले. 

परिणाम असा झाला की, व्हिडिओ लोक बघायला लागले. व्हिडिओंचा रीच वाढायला लागला. आणि मोनिटायजेशन ऑन झालं. त्यामुळे नितीन गडकरी यांना नाही म्हणलं तरी महिन्याला चार लाख रुपये यायला लागले. 

गोष्टीवेल्हाळ नितीन गडकरी यांनी युट्युबच्या माध्यमातून पैसे कमावले. भिडूनो तुम्ही ही कमवायला हरकत नाही. तसं तर आम्ही पण युट्यूबच्या चॅनेलवर आहोत. ‘बोल भिडू‘ याच नावानं. भन्नाट असतात आमचे पण व्हिडिओ. जरा बघत चला मराठी मातीतल्या गोष्टी. आणि होय सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे झालं.

हे ही वाच भिडू:

 

Web title : Minister of Road Transport and Highways of India Nitin Gadkari  is earning 4 lakhs per month from YouTube

Leave A Reply

Your email address will not be published.