मुलबाळ होण्यासाठी हा बाबा बायांना गोळ्या खायला द्यायचा पण मोबाईलमधल्या क्लिप्समुळे अडकला

मध्य प्रदेशाच्या राजकारणात एक नाव फेमस आहे आहे ते मिर्ची बाबा. महामंडलेश्वर स्वामी वैराग्यानंद गिरी जी महाराज उर्फ ​​मिर्ची बाबा उर्फ नागा बाबा

ज्याच्यापुढे मोठे नेते नतमस्तक व्हायचे, या बाबाने मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात असं काही वजन निर्माण केलं होतं की, मध्य प्रदेशातील फक्त सामान्य जनताच नाही तर मध्य-प्रदेशातील  मोठं-मोठे राजकारणी नेते देखील त्याच्या पायाशी लोळण घेत होते. 

अगदी ४-५ दिवसांपर्यंत संपूर्ण मध्य प्रदेशात हे नाव पुरेसं आदरानं आणि श्रद्धेने घेतलं जात होतं. त्याने स्वत:ला नागा बाबा म्हणूनही घोषित केलेलं, इतकंच नाही तर महामंडलेश्वर म्हणूनही स्वतःच घोषित केले. 

एखाद्या भोंदू बाबाचं पितळ कसं रातोरात कसं उघडं पडतं याचं उदाहरण म्हणजे भोपाळचा मिर्ची बाबा. 

या मिर्ची बाबाचं पितळ उघडं त्याच्या मोबाईलमुळे अन आज जेलची हवा खातोय. 

त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. या मिर्ची बाबाला भोपाळ पोलिसांनी ग्वाल्हेर येथून ताब्यात घेऊन भोपाळमध्ये अटक करण्यात आली आणि अखेर न्यायालयाने बाबाला २२ ऑगस्टपर्यंत तुरुंगात टाकण्याचे आदेश दिले आहेत. 

मिर्ची बाबा तुरुंगात पोहोचताच ढसाढसा रडू लागला. तुरुंगातील कर्मचाऱ्यांपासून ते सोबतच्या कैद्यांपर्यंत सर्वानाच तो आपण कसं निर्दोष आहोत हे सांगत बसलाय. पण कितीही आरडा-ओरड केली तरीही त्याचा घाणरेडा गुन्हा हा पुराव्यांच्या आधारे सिद्ध झाला आहे. 

मिर्ची बाबाच्या फोनमध्ये पॉर्न व्हिडिओ सापडले होते. एक-दोन नव्हे तर अनेक घाणेरड्या व्हिडिओ क्लिप सापडल्या. कितीतरी महिलांचे फोन नंबर, नावासहित त्यांचे नग्नवस्थेत फोटो सापडले.

हा बाबा स्थानिक राजकारणी नेत्यांमध्ये फार प्रसिद्ध आहे. 

हा मिर्ची बाबा कधी काँग्रेस तर कधी भाजप असं उलटसुलट राजकारण करत असतो. मध्य प्रदेशात अशीही चर्चा आहे की, २०१८ च्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत हा बाबा उघड-उघडपणे काँग्रेसच्या समर्थनात प्रचार करत असायचा. तेंव्हपासूनच या बाबाची काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांशी मैत्री झाली.

मिर्ची बाबा हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांचे खास मानले जातात. कमलनाथ सरकारमध्ये त्या बाबाला राज्यमंत्रिपदाचा दर्जाही मिळाला होता.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या विजयासाठी या बाबाने पाच क्विंटल लाल मिरचीचं हवन केलं होतं आणि प्रसिद्धीच्या झोतात आले. दिग्विजय सिंह निवडणूक जिंकले नाही तर जलसमाधी घेऊ अशी घोषणा देखील या मिर्ची बाबाने केली होती मात्र त्या समाधीची बातमी काय आली तर जेंव्हा या बाबाने भोपाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जलसमाधीची परवानगी मागितली जी त्याला परवानगी मिळाली नाही.

काँग्रेसचे नेतेच नाही तर मिर्ची बाबाचे अनेक फोटो भाजपचे राजनाथ सिंह असो वा इतर स्थानिक नेते असो त्यांच्यासोबत बातम्यांमध्ये दिसून आले आहेत.

तर याचं खरं कांड कधी समोर आलं ?

वादग्रस्त बाबावर बलात्काराचा आरोप आहे. पीडित महिला ही विवाहित असून तिला ४ वर्षांपासून मूलबाळ होत नव्हतं. सासरचे तिला वांझोटी म्हणून टोमणे मारायचे. बिचारी अस्वस्थ असलेल्या अस्वस्थेत तिने मिर्ची बाबाची भेट घेतली.

ती ऐकून होती की, हा मिर्ची बाबा काय तर औषध देतो आणि त्याच्या त्या औषधाने बाईला मुलबाळ होतं.

आता सगळ्या राज्यात नेत्यापासून मंत्रीसंत्री पर्यंत सगळे या मिर्ची बाबांपुढे नतमस्तक व्हायचे. त्यामुळे बाबाकडे काहीतरी चमत्कारी शक्ती असेल असं तिला वाटलं आणि तिने त्या बाबाच्या फोटो बॅनरवर दिलेल्या नंबरवर फोन केला. 

ती बाबांना भेटली. बाबांनी तीला मंत्रोच्चार आणि पूजा करण्याचा सल्ला दिला. सोबत भाताची आणि साबुदाण्याची गोळी दिली. त्यानंतर भेटायला बोलावलं आणि गोळ्यातून नशेचे औषध दिले. 

त्यानंतर त्या पिडीतेसोबत काय झालं तिच्याच भाषेत वाचा,

महिलेने मिर्ची बाबांविरुद्ध केलेल्या एफआयआरमध्ये लिहिले आहे की, 

“एके दिवशी बाबांच्या सांगण्यावरून ती बाबांना भेटायला गेली. बाबांनी खोलीत बोलावून वीभूती आणि साबुदाण्याच्या गोळ्या खायला दिल्या. ते खाल्ल्यानंतर काही मिनिटांनी मला चक्कर येऊ लागली. त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत गेली. बाबांनी मला बेडवर बसवले. दरवाजा बंद केला. मग त्याने मला आपल्या मिठीत घेतले. घाणेरडे काम करू लागले. थोडी हिंमत एकवटून मी बाबांना ढकलले. पण चक्कर येत असल्यामुळे तिला जास्त प्रतिकार करता आला नाही. तसेच मोठ्या आवाजात मदत मागता येत नव्हती”

“मिर्ची बाबाने माझ्यावर बलात्कार केला. मला चक्कर आली. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मला खूप वेदना होत होत्या. जवळच बाबा बसले होते. मी नग्नावस्थेत होता. बाबाही पूर्ण नग्नावस्थेत होता. मी बाबांना विचारले की त्यांनी असे का केले? मी तक्रार करीन. मी सोडणार नाही”.

पीडितेने पुढे सांगितले की, बाबा म्हणाले की, पूजेने मुले होत नाहीत. मुले अशीच जन्माला येतात. तू गुबगुबीत बाळाचा जन्म घेशील. यावर ती आरडाओरडा करू लागली असता बाबा म्हणाले कोणाकडे तक्रार करायची ते कर, मला काही होणार नाही. कारण मी नागा बाबा आहे. मी चूक केली यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही”.

जेलची हवा खाऊन या बाबाचा अहंकार आता पुरता गळला. 

महिलेने महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर रात्री उशिरा मिर्ची बाबाला ग्वाल्हेरमधून अटक करून भोपाळला आणण्यात आले, जिथे त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्या चौकशीत त्याच्या मोबाईलमध्ये ज्या क्लिप्स आढळल्या त्यावरून त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध होण्यास मदत झाली.

आता कैदी नंबर १९४९ असलेला मिर्ची बाबा रोजच्या रात्रा जेलमध्ये जागून काढतोय. बाबांना तुरुंगात झोपण्यासाठी दोन चादरी आणि तीन ब्लँकेट देण्यात आले. पण जो माणूस कालपर्यंत मखमली-गादीच्या पलंगावर झोपत होता तोच आज तुरुंगाच्या खडबडीत फरशी आणि काटेरी, कुजलेली घोंगडीवर त्याला आता कित्येक रात्र काढाव्या लागणार आहेत.

पण कितीही पश्चाताप झाला असला तरीही त्याचा गुन्हा काय माफ होण्याच्या पात्रतेचा नाही. 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.