सत्तेत परत येण्यासाठी फडणवीसांनी केलेला “मिर्ची बगळामुखी यज्ञ” हा काय प्रकार होता..?

पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांचे Checkmet : How the BJP Won and Lost Maharastra हे पुस्तक राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याचा घटनाक्रम सांगते. महाविकास आघाडीचा सत्ताकार्यक्रम कसा ठरला. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी कसा घेतला अशा अनेक घडामोडींबाबत या पुस्तकात सांगण्यात आलं आहे.

याच पुस्तकात सुधीर सुर्यवंशी यांनी बगळामुखी यज्ञाचा दाखळा दिला होता.

या पुस्तकात,

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी सरकार स्थापनेच्या दिवशी पहाटे उत्तर भारतातून तांत्रिक पूजारी आणून बगळामुखी देवीला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केल्याचं सांगण्यात आलं आहे.

त्याचसोबत ज्योतिष्यांच ऐकून देवेंद्र फडणवीसांनी निळ्या कोटाऐवजी काळा कोट शपथविधी दरम्यान घातल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

त्याच सोबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीष रावत यांची सत्ता देखील याच यज्ञामुळे वाचल्याचा संदर्भ या पुस्तकात देण्यात आलेला आहे.

मिर्ची बगळामुखी देवीचा यज्ञ व ही तांत्रिक पूजा नेमकी काय असते याबाबत प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांची फेसबुक पोस्ट लिहून माहिती दिली होती.

त्यांनी आपल्या या फेसबुक पोस्टमध्ये मिर्ची बगळामुखी यज्ञ नेमका काय असतो हे विस्ताराने मांडले होतं.

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या फेसबुक पोस्टमधील काही अंश,

ज्यामध्ये ते मिर्झा राजा जयसिंग याने देखील असा यज्ञ केला असल्याचा संदर्भ देतात. 

खरे तर उत्तर भारतात बगळामुखी देवतेची अशी आराधना करण्याचे फ्याड खूप शतके सुरू आहे. शिव काळात औरंगजेबाने रजपूत सरदार मिर्झाराजा जयसिंगयाला शिवाजी महाराजांच्या विरुद्ध पाठवले. त्यावेळी ही या जयसिंगाने असाच धावा बगळामुखीचा केला होता.

या संदर्भात शिवरायांची कारकीर्द ज्यांने पाहिली होती त्या आद्य शिवचरिञकार कृष्णाजी अनंत सभासदाने आपल्या बखरीत या जयसिंगाच्या बगळामुखी व इतर यज्ञा बद्दल लिहले आहे सभासद लिहतो,

जेव्हां ते दिल्लीहून निघाले तेव्हां पूर्वी शाहिस्ताखान चालला त्याप्रमाणे दळभार निघाला. भूमी आकाशापर्यंत एकच धुरळा उडाला. ऐसा सेनासमुद्र दक्षिणेस चालला. मजला दर मजला चालिले. मुक्काम होय तेथे दीड गांव लांब व एक गांव रुंद लष्कर राहात असे.

तेव्हां जयसिंग राजा यानीं मनांत विचार केला की, शिवाजी मोठा दगेबाज, मोठा हुन्नरवंत आणि मर्दाना शिपाई, आंगाचा खासा आहे. अफजलखान अंगें मारिला. शास्ताखानाच्या डेऱ्यात शिरून मारामारी केली. आपणास यश कसे होईल? म्हणून चिंता केली.

तेव्हां मोठे मोठे ब्राह्मण पुरोहित यांनी उपाय सांगितला.

देवी प्रयोगी अनुष्ठाने करावी आणि अकरा कोट लिंगे करावी. म्हणजे यश येईल, असें सांगितले.

मग मिर्जा राजा बोलिला की, कोटीचंडी कामनाथ बगळामुखी कालरात्रीप्रीत्यर्थ जप करावा. असें अनुष्ठान करावें. चारशें ब्राह्मण अनुष्ठानास घातले. प्रत्यहीं अनुष्ठान चालले. अनुष्ठानास दोन कोटी रुपये अलाहिदा काढून ठेविलें. आणि तीन मास अनुष्ठान चालून सिद्ध केलें. अनुष्ठानाची पूर्णाहुती होऊन , ब्राह्मणांस दान दक्षिणा देऊन संतर्पण केले. मग मजला चालिले.

मिर्झाने एवढे उपाय करुनही त्याला यश आले नाही. उलट मिर्झाचाच वर्ष दिडवर्षातच विषबाधेने मृत्यू झाला.

इंद्रजित सावंत,
कोल्हापूर,
21 मे 2020.

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांची पोस्ट आपण खालील लिंकवर क्लिक करुन विस्ताराने वाचू शकता. 

——————————–

बगलामुखी देवी बाबत माहिती. 

बगलामुखी देवीची पूजा साधारणं उत्तर भारतात केली जाते. विशेषत: मध्यप्रदेश व उत्तरभारत या ठिकाणी देवीची आराधना चालत असल्याचं सांगण्यात येते. दहामहाविद्यांपैकी आठवी महाविद्या म्हणून बगलादेवी ओळखली जाते. या देवीला पीताम्बरा म्हणून देखील ओळखतात.

देवीवर श्रद्धा असणारे लोक सांगतात की,

संपुर्ण ब्रंम्हाण्डाची शक्ती एकत्र आली तरी बगलादेवीच्या शक्तीचा सामना करू शकत नाही. शत्रूनाश करणे, वाकसिद्धी, वाद विवादामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी या देवीची उपासना केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.