बाईनं १५ मुलांना जन्म दिला अन सरकारकडून लाखोंचा इनाम मिळवला.

मागे जून मध्ये एक बातमी आली होती बघा, की ज्यांना जास्त मुलं त्यांना लाखोंचे इनाम मिळणार.

होय..होय सांगणार..सांगणार..शासनाची काय योजना आहे तुम्हाला नक्की सांगणार. 

आता ज्यांनी ही बातमी वाचली असेल त्यांना हे काय फॅड आहे ते समजेल. पण ज्या भिडूंना याविषयी काहीच माहिती नाही त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. तुम्हाला आम्ही सांगणार ही योजना. पण त्या योजनेचा तुम्हाला फायदा मिळणार का नाही हे मात्र मिझोराम सरकार डिसाईड करणार.

तर मिझोराम क्रीडा, युवक व्यवहार आणि पर्यटन मंत्री रॉबर्ट रोमाविया रॉयटे यांनी लोकसंख्याशास्त्रीयदृष्ट्या लहान मिझो समुदायांमध्ये लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक मुले असलेल्या पालकांना १ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केल होत. त्यांच्या या योजनेला बेबी बूम योजना म्हंटल गेलं.

आता त्यांना हा पुरस्कार का जाहीर करावा लागला होता ? 

तर मिझोराम मध्ये वंध्यत्वाचा दर आणि मिझो लोकसंख्येचा घटता दर हा अनेक वर्षांपासून गंभीर चिंतेचा विषय आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटमध्ये सामील झालेले रॉयटे म्हणाले होते की,

कमी लोकसंख्या ही अतिशय गंभीर बाब आहे. लहान समुदाय किंवा जमातींच्या अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी हा एक मोठा अडथळा आहे.

११ लाख लोकसंख्या (२०११ जनगणना), मिझोराम हे भारतातील दुसरे कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. म्यानमार आणि बांगलादेशला लागून असलेले हे ख्रिश्चन आणि आदिवासी बहुल राज्य सुमारे २१,०८७ किमी क्षेत्र व्यापते.

जगातील सर्वात मोठ्या कुटुंबांपैकी एक समजल्या जाणाऱ्या ३८ बायका, ८९ मुले आणि ३३ नातवंडे असलेल्या जियोना चाना यांच्या निधनानंतर एका आठवड्यानंतर या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. ७६ वर्षीय चाना १००० पेक्षा जास्त सदस्यांच्या कुटुंबाचे प्रमुख होते. त्यांचं मोठं कुटुंब बघून रॉयटे यांना प्रोत्साहन मिळालं आणि त्यांनी हा पुरस्कार जाहीर केला.

बरं फक्त पुरस्कार जाहीर करूनच रॉयटे थांबले नाहीत बरं का, तर खरंच त्यांनी या पुरस्काराच्या रकमा जास्त मुलं असणाऱ्या स्त्रियांना  दिल्या आहेत. 

तुईथियांग भागातील विधवा असलेल्या न्गुराउवी यांना हे १ लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि सन्मानपत्र मिळाले आहे. तिला १५ मुल आहेत. आहे, आणि तिने प्रथम क्रमांक पटकवला चिंगा वेंग परिसरातील आणखी एक विधवा लियान्थांगीला ३० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. लियान्थांगीला १३  मुले आहेत.

बघा कसलं भारीय मिझो सरकार. इतकी मुलं आणि वरून पैसे पण. नाहीतर आपल्या महाराष्ट्रात तीनच्या वर मुलं झाली तर रेशनींगच तांदूळ मिळत नाहीत, सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे मिझोराम मध्ये जाऊन राहायला हरकत नाही. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.