लफडं म्हणजे लफडं असत शाम्मीच आणि आपलं सेम असत !!!

प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असत, फक्त स्क्रिनशाॅट सोडून. गेल्या काही वर्षात संपुर्ण जगापुढे असणारा ज्वलंत प्रश्न म्हणून स्क्रिनशाॅटचा केला जाणारा दुरूपयोग हा चर्चेचा विषय ठरत आहे.

आज शाम्मी सापडला असला तरी येणाऱ्या काळात आपण देखील याचे शिकार होवू शकतो अशी खळबळ सर्वच पुरूषजातींमध्ये निर्माण होणं साहजिक आहे. त्याच्या धर्मपत्नीने त्याचे स्क्रिनशाॅट जगजाहिर केले तेव्हा हाच प्रश्न आमच्याही मनात निर्माण झाला की, प्रेमाच्या पुढच्या पातळीवर सर्व जगभरातल्या लफड्यांची भाषा एकच कशी काय असू शकते. हा स्क्रिनशाॅटचा सखोल अभ्यास आम्ही तुमच्यापुढे मांडत असून तुम्ही फावल्या वेळेत त्यावर दिर्धचिंतन करावे अशी आमची इच्छा आहे.

  • स्क्रिनशाॅट क्रमांक एक –
shami
FB- HASIN JAHAN
लफड्यात विचारला जाणारा पहिला प्रश्न म्हणजे रंग. कोरड्या रुक्ष दुनियेत माणसांना आजही रंग अपील करतात ही समाधानकारक गोष्ट मानावी लागेल. शाम्मीचा स्क्रिनशाॅट देखील रंग विचारणारा आहे. लफड्यात केला जाणारा किमान संस्कृतीचा आदर देखील मनाला आनंद करणारा आहे. म्हणजे पहिल्या टप्यात योग्य इमोजीचा वापर करत संस्कृतीच भान ठेवण्याचा प्रयत्न देखील याठिकाणी करण्यात आला आहे.

 

 

  • स्क्रिनशाॅट क्रमांक दोन –
shami1
FB- HASIN JAHAN
दूधाची बाटली या जागतिक चिन्हाचा केलेला वापर याठिकाणी विशेष लक्षवेधक ठरत आहे. आमच्या अभ्यासानुसार एक दोनदा शारिरिक संबंध तयार झाल्यानंतर या चिन्हाचा मुक्तपणे वापर केला जातो. आपण नात्यात किती गुतूंलोय हे पाहण्याच अचूक मोजमाप म्हणून हे चिन्ह आजही तितक्याच ताकदिने वापरलं जात आहे याचा आनंद होतोय.

 

  • स्क्रिनशाॅट क्रमांक तीन –
shami2
FB- HASIN JAHAN
“रुम आहे तर ती नाही आणि ती आहे तर रुम नाही” हा जागतिक प्रश्न शाम्मीला देखील भेडसावत असल्याचा दिसतो.
यावर उपाय म्हणून मॅसेजच्या भावना उच्चतम्म पातळीवर घेवून जाण्याच कौशल्य शाम्मीन याठिकाणी लिलया पेललं आहे. शेवटी सॅटिसफेक्शन महत्वाच असून ते पुर्ण करणं कोणत्याही लफड्याची खासीयत असते. शाम्मी याठिकाणी देखील एका अष्टपैलू खेळाडूसारखा वागला आहे याचा मनस्वी आनंद वाटतो.

तर हे झालं संपुर्ण विश्लेषण. येत्या काही दिवसात आपल्याही स्क्रिनशाॅटच अस वर्णन करावे लागू नये म्हणून आपण फक्त J1 झाले का ? इतक्यावर भागवावे हिच सदिच्छा !!!

1 Comment
  1. Anonymous says

    hahaah…epic

Leave A Reply

Your email address will not be published.