इंजिनिअरिंग ड्रॉप आउट केलं आणि विना लाईटचं वॉटर फिल्टर बनवलं…

ज्या ज्या वेळी एखादी भीषण नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा तिथं पीडित लोकांना स्वच्छ पाणी कसं मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष असतं पण ते गाव घटनेतून नीट होतं पण स्वच्छ पाणी त्या लोकांना पिण्यासाठी मिळत नाही. जेव्हा जेव्हा नैसर्गिक घटना घडते तेव्हा तिथल्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया, केमिकल, पशूंची विष्ठा यामुळे ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे आजार फोफावण्याची संधी वाढते. यावर उपाय म्हणून मागच्या 17 वर्षांपासून एक कंपनी यावर वॉटर फिल्टरचा उपाय राबवत आहे तर जाणून घेऊया या कंपनी विषयी.

पुण्यामध्ये aqua plus water purifier private limited ही कंपनी मागच्या 17 वर्षांपासून असे वॉटर फिल्टर बनवत आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी काही मिनिटातच शुद्ध होतं. हे वॉटर फिल्टर दूरच्या देशात इन्स्टॉल करण्यात कामी येणार आहेत. आजवर 50 पेक्षा जास्त आपत्तीच्या ठिकाणी हे वॉटर फिल्टर्स कामी आले आहेत.

पण इतक्या युनिक आयडियाची सुरवात नक्की झाली कुठून ? ते जाणून घेऊया.

या कंपनीचे संस्थापक राहुल पाठक हे पुण्यात इंजिनिअरिंग करत होते. थेरीज आणि कॅल्क्युलेशन मध्ये ते गुंतून गेलेले होते आणि त्यांना यातून बाहेर पडून नवीन काहीतरी करायचं होतं. याच काळात त्यांनी इंजिनिअरिंग ड्रॉप आउट केलं आणि 1993 साली वॉटर प्युरीफायरची मार्केटिंग करायला सुरुवात केली. हे करण्यामागे त्यांचं प्रेरणास्थान त्यांचे वडील होते. त्यांचे वडील सिरॅमिक फिल्टर्स बनवून विकत असे. पण 90 च्या दशकात आलेल्या मंदीमुळे त्यांचा व्यवसाय बंद पडला होता.

राहुल पाठक यांनी वडिलांच्या या व्यवसायाला नवीन रूप देण्याचं ठरवलं आणि वॉटर फिल्टर बनवायला सुरवात केली. 1994-95 साली कंपनी सुरू केली आणि स्वतः तिथं ते वॉटर फिल्टर बनवू लागले. आता वॉटर फिल्टर बनवणारे तेव्हा बरेच होते म्हणून राहुल पाठक यांनी मोबाईल वॉटर फिल्टर बनवायला सुरवात केली. राहुल पाठक या मोबाईल फिल्टर विषयी सांगतात की

वॉटर फिल्टरमध्ये वापरण्यात येणारी मेम्बरेन, एका पातळ कागदाची शीट असते जी चार भागात मायक्रोफिल्टरेशन, अल्ट्राफिल्टरेशन, नॅनोफिल्टरेशन आणि रिव्हर्स ऑसमॉसिस मध्ये विभागली गेली आहे जे पाणी शुद्ध करतात. यात पाण्यात असलेली बॅक्टेरिया, व्हायरस, किटाणू, क्षार 99 टक्के शुद्ध करतात.

अगोदर ह्या मेम्बरेन चीनमधून आयात केल्या जात होत्या नंतर राहुल पाठक यांनी त्याचं तंत्र समजावून घेतले आणि स्वतः बनवायला चालू केलं. द काउंसिल ऑफ साइंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR ) च्या वैज्ञानिक लोकांसोबत मिळून त्यांनी एक मशीन तयार केली जी पूर्णपणे स्वदेशी ठरली. 2005 साली जम्मू काश्मीर मध्ये आलेल्या भूकंपात राहुल पाठक यांनी बनवलेले मोबाईल वॉटर फिल्टर्स वापरले गेले. आज घडीला भारत भरात हे वॉटर फिल्टर्स वापरले जातात.

एक स्टार्टअप म्हणून सुरवात केली तेही इंजिनिअरिंग ड्रॉप आउट करून आणि आज घडीला एका नव्या स्वरूपात लोकोपयोगी वस्तू राहुल पाठक यांनी बनवली आहे आणि देशभरात तिचा बोलबाला आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.