मुस्लिम निकाहमध्ये मोठा बदल होतोय, काझींनीसुद्धा कबुल केला मॉर्डन निकाहनामा

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा क्षण. त्यामुळे प्रत्येक धर्मात त्या संबंधित विशिष्ठ पद्धती आणि रूढी आहेत. आता गरजेनुसार आणि वेळेनुसार त्यात बदल होत गेले. जे स्वीकारले देखील जातायेत.  यातच आता मुस्लिम धर्माच्या निकाहमध्येही बदल पाहायला मिळणार आहे.

म्हणजे काय तर निकाहनामा सुद्धा मॉर्डन झालायं.

आता निकाहनामा म्हणजे काय  तर मॅरेज सर्टिफिकेट. मुस्लिम धर्मात निकाहनाम्यात त्या निकाहचा सगळं तपशील दिला जातो. ज्यात आता काही बदल पाहायला मिळणार आहे. म्हणजे आधी कसा निकाहनाम्यात फक्त एका भाषेपुरता म्हणजेच उर्दू भाषेपुरता मर्यादित होता. पण आता त्यात हिंदी आणि इंग्रजी भाषेचा सुद्धा वापर होणार आहे.

एवढंच नाही तर आधी कसं निकाहनाम्यात फक्त दुल्हा- दुल्हनची नाव असायची आणि त्यांच्या निकाहची बाकी माहिती असायची पण त्यांची ओळख अर्थात फोटो लावले जात नसायचे. पण आता तसं होणार नाही. या मॉर्डन निकाहमध्ये दुल्हा आणि दुल्हनचे फोटो सुद्धा लावले जातील. त्यामुळे एखादी वादग्रस्त परिस्थिती निर्माण झालीचं तर हे तरी क्लियर होईल कि, हे तेच जोडपं आहे, ज्यांचं काझींनी लग्न लावून दिलंय. 

या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदी आणि इंग्रजीमध्ये निकाहनामा झाल्यामुळे सरकारी कामांमध्ये किंवा परदेशी जाण्यावेळी त्याचे भाषांतर करण्याची कटकट राहणार नाही. आता हे जास्त सोईस्कर असल्यामुळं काझींनी त्याचा वापर सुद्धा सुरू केला आहे.

आताचा मॉर्डन निकाहनामा आधीच्या निकाहनाम्यापेक्षा बऱ्यापैकी वेगळा असणार आहे. म्हणजे याआधी दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत काझी लग्नाची कबुली देत ​​असत. निकाहनामा कागदपत्राच्या स्वरूपात नव्हता. नंतर अनेक वेळा वादाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा काझी आणि मुफ्तींनी ठरवले की, विवाहाची नोंद तहरीरच्या स्वरूपात करावी. 

त्यासाठी निकाहनामा तयार करण्यात आला. जो फक्त उर्दू भाषेमध्ये असायचा. आता बाकी ठिकाणी नाही पण कोणत्याही सरकारी कामाच्या वेळी किंवा संबंधित पती- पत्नीला विदेशात जायचं असेल तर ते अवघड होऊन बसायचं. 

त्यानंतरची प्रोसेससुद्धा लांबलचक असायची. म्हणजे निकाच्या वेल्सची सगळी कागदपत्र गोळा करा, त्यांनतर उर्दू भाषेत असलेला निकाहनामा हिंदीमध्ये नाहीतर इंग्रजीत भाषांतर करा त्यावर काझींचा शिक्का मारायला लागायचा. यात महत्वाचं म्हणजे दुल्हा- दुल्हनची नाव तर असायची पण फोटो नसल्यामुळे ते दोघे तेच आहेत का यात गोंधळ उडायचा. 

पण आताच्या मॉर्डन निकाहनाम्यामुळे हे सगळंच टेन्शन संपणार आहे. यामुळे किरकोळ काम असूदेत किंवा कोणतं सरकारी काम नाहीतर परदेशी सफर ५० वेळा ऑफिसच्या खेटा घायची वेळ येणार नाही. 

आता या बदलामागे बरीच कारण देखील आहेत. जसं कि, आजकालच्या टेक्निकल जगात इंग्रजीवर भर दिला जातोय. आणि मुस्लिम तरुणांमध्ये उर्दू भाषा येणाऱ्यांची संख्या कमी होत चाललीये. त्यामुळे आपल्याचं निकाहच्या वेळी तयार केलेला निकाहनामा दुल्हा- दुल्हनलाचं वाचता येत नाही. त्यामुळे पुढचं सगळं अवघड होऊन बसायचं. पण आता हिंदी आणि इंग्रजी सगळ्यांनाच येतंय म्हंटल्यावर गोष्टी सोप्या होणार आहेत.  

या मॉर्डननिकाहनाम्यात वधू-वरांच्या फोटोवर निकाह स्वीकारणाऱ्या काझीचा शिक्का असेल. यामुळे वधू-वरांची ओळख पटवणे तर सोपे होईलचं, पण फोटो सुद्धा बदलता येणार नाहीत. साक्षीदारांच्या उपस्थितीत, वधू आणि वरच्या फोटोची ओळख पटवली जाईल. यामुळे साक्षीदारांमध्ये सुद्धा ज्यांना उर्दू येत नाही त्यांनाही निकाहनाम्यात काय नोंदवले आहे ते समजेल.

असे म्हंटले जातेय कि, निकाहनाम्यात गरजेनुसार आणखी बदल होऊ शकतात.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.