बारकाईनं पाहिलं तर यात पाकिस्तानचा हात सुद्धा दिसून येईल. 

सध्या एक न्यूज जोरात चर्चेला आहे. कर्नाटकली हुबळी तालुक्यातील लकावली गावातील शेतकऱ्याने आपल्या शेताच्या संरक्षणासाठी अमित शहा आणि मोदींचे कटआउट वापरले आहेत. त्याच्या या उपायामुळे शेतीच संरक्षण झालं की नाही सांगता येत नसलं तरी हा शेतकरी त्याच्या या कलाकारीमुळे फोकसमध्ये आला आहे हे फिक्स.  

हि झाली आत्ताची ब्रेकिंग न्यूज. 

असच एक कांड मार्च महिन्यात देखील झालं होतं. मार्च महिन्यामध्ये चिंचू रेड्डी या आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यानं शेतीच्या संरक्षणासाठी सनी लिओनीचा कटआउट वापरला होता. त्यानंतर तो देखील फोकसमध्ये आला होता. पण त्यानं हा देखील दावा केला होता की आत्ता माझ्या शेतातील अन्नधान्य चोरीला जात नाही. याच कारण त्यांन खूप साध्या आणि सोप्या प्रकारे स्पष्ट केलं होतं. त्याच्या मते शेतापासून जाणारी माणसं अगोदर शेतात काय आहे ते पहायची. मग वांगी केली की वांगी, काकडी केली की काकडी अस दिसेल ते चोरून घेवून जातं. जेव्हापासून मी सनीचा फोटो लावला तेव्हापासून लोकं फक्त आणि फक्त सनीकडेच पाहू लागले. लोकांच लक्ष शेताकडे गेलच नाही. परिणामी उत्पन्न वाढलं.

सनीचा फोटो लावणाऱ्या शेतकऱ्यानं स्पष्ट केलं की त्याला किती फायदा झाला पण मोदी आणि अमित शहांचा फोटो लावणाऱ्या शेतकऱ्यानं अजून मुग गिळून शांत राहणच पसंत केल आहे. आत्ता यावर उपाय म्हणून आम्हीच आमचा मेंदू चालवून गृहितकं मांडायची ठरवली. सनी लिओनीनं रिझल्ट दिलाय. आत्ता या दोन्ही नेत्यांचा काय रिझल्ट लागू शकतो याचा एक अंदाज. 

१) अमित शहा यांची सध्याची इमेज राष्ट्रीय लोहचुंबक प्रमाणे झाली आहे. दिसेल त्या गोष्टीला आपल्याकडे आकर्षित करुन घेण्याचं अजब स्कील त्यांनी निर्माण केल आहे. कदाचित याच गोष्टीमुळे लोकांच्या नजरा फक्त अमित शहांवरती खिळून रहाव्यात असा अंदाज शेतकऱ्यांने बांधला असावा. 

२) मोदींच्या बाबतीत सांगायचं झालं तर मोदींचा फोटो शाळा आणि कॉलेजात सुद्धा बंधनकारक आहे. शाळा, कॉलेजात फोटो असेल तर शाळा अनुदानित असते. मोदींचा फोटो असेल तर सिस्टीमचा भाग होवून जातं. आत्ता अनुदान मिळवायच असेल तर आपण देखील सिस्टिममध्ये येतो हे सांगण्यासाठी देखील मोदिंचा फोटो लावला असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

३) तिसरा तर्क असा आहे की हा शेतकरी कॉंग्रेसचा असावा. त्याने काय केलं, ज्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बुजगावणं म्हणून चिडवण्यात येत होत त्याचा सविस्तर बदला घ्यावा म्हणून हे कांड केलं असाव. पण याची शक्यता खूप कमी कारण भाजपच्या मते आत्ता देशात कॉंग्रेसच अस्तित्व नाही. 

४) लावण्यात आलेली बुजगावणी अर्थात आदरार्थी कटआउट हि जोडीनं आहेत. त्या मागच्या भावना कोणत्या राग कि लोभ या गोष्टीलाच शेतकऱ्यांने वाचा न फोडल्यामुळे हे अंदाज बांधावे लागत आहेत. सदरील कटआउट वापरण्याची पद्धत पाहिली तर मोदी वरच्या स्थानावर आहे तर शहा त्यानंतर थेट दूसऱ्या क्रमांकावर याचा अर्थ शेतकरी राजकिय जाण असणारा आहे. दूसरी गोष्ट अशी की, शेतावर कोणत्याही पद्धतीने आक्रमण झालं तर पहिला शहांना त्यांचा सामना करावा लागणार आहे. कारण मोदी सुरक्षीत ठिकाणी आहेत. 

याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की, देशातील राजकिय परस्थितीचा सखोल अभ्यास करुनच हि कटआउट लावण्यात आली आहेत. 

झालं, आमची बुद्धी इथपर्यन्तच विचार करुन दमली यापुढेचं काही कारण सापडलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा.

टिप – आमची कोणतिही क्राईम ब्रॅन्च नाही. 

2 Comments
  1. Abhi Phadtare says

    यात titleचा काय संबंध आहे

Leave A Reply

Your email address will not be published.